झोळी करून रुग्णाचा जीवघेणा प्रवास कधी थांबेल
तळोदा : तालुक्यातील गृ.ग्रा.पं. इच्छागव्हाण कार्यक्षेत्रात येणाऱ्या 70 कुटुंब व 370 लोकसंख्या असलेलं नयामाळ या गावात मागील महिन्यात घडलेल्या घटनेची वारंवार पुनरावृत्ती होत आहे. वेळोवेळी याबाबत लोकप्रतिनिधी अथवा प्रशापुढे गाऱ्हाने माडूनही कोणीही या ठिकाणी साधे सांत्वन करण्यासाठी सुद्धा पोहचले नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
दि 22 सप्टेंबर रोजी जोसाबाई सोन्या वसावे वय 40 वर्षीय महिलेला अचानक थँडी ताप भरल्याने ती आजारी पडली, तिची प्रकृती एवढी खालावली की तिला चालणे सुद्धा अवघड झाले. दरम्यान स्वातंत्र्याच्या 75 नंतरही या भागात रस्ते नसल्याने या भागात वाहन येत नसल्याने या भागातील नागरिक मरण यातना सोसत आहेत.
दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी लाकडाच्या दांडीला झोळीत बांधून रुग्णास 8-10 की मी पाय-पाय चालत उपचारासाठी जाऊन या महिलेस रुगणालया पावेतो पोहचववावे लागले.
या विषयी मागील महिन्यात संबंधीत विभागास व लोकप्रतिनिधीना निवेदनेही देण्यात आले. मात्र आजपर्यंत कुठलाही लोकप्रतिनिधी किंवा शासकीय कर्मचाऱ्याने या गावात पाय ठेवला नसल्याचे अशोक वसावे यांनी सांगितले. देश महासतेच्या वळणावर असल्याच्या पोकळ गप्पा केल्या जात असल्या तरी स्वातंत्र्य नंतरही या मरण यातना आमच्या नशिबी का? असा सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करीत आहेत. या गावात जाण्यास रस्ता नाही, विज नाही, पाणी पिण्यासाठी सोय नाही, अजून कितीक दिवस या यातना आमच्या नशिबी आहेत. असा प्रश्न स्थानिक नागरिक विचारात आहेत...
Comments
Post a Comment