शिक्षण क्षेत्रातील आदर्श संस्थेच्या ५५ वर्धापनदिन


 *अध्यापक शिक्षण मंडळ ५५वा  वर्धापन दिनाचा शुभेच्छा..!!*


         *आज ५ सप्टेंबर*

   *डाँ सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती*,

     *"राष्ट्रीय शिक्षक दिन"*

            आणि 

  *अध्यापक शिक्षण मंडळ या संस्थेच्या स्थापना दिवस*

*कै. प्राचार्य भाईसाहेब गो.हु. महाजन* यांनी याच शुभ दिवशी

   म्हणजेच *५ सप्टेंबर १९६५* रोजी थोर शिक्षणतज्ञ श्री.बा.ग जगताप यांच्या हस्ते      अध्यापक शिक्षण मंडळ या शिक्षण संस्थेची स्थापना केली. "कसेल त्याची जमीन, पिकवेल त्याच्या मळा आणि शिकवेल त्याची शाळा" या आगळ्यावेगळ्या तत्वानुसार शिक्षण संस्था स्थापन करून शिक्षणाची ज्ञानगंगा गरिबांच्या दारापर्यंत पोहोचवण्याचे महान कार्य करणाऱ्या भाईसाहेबांना विनम्र वंदन.

       कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 'कमवा आणि शिका' तत्त्वातून प्रेरणा घेऊन सातपुडा पर्वताच्या परिसरातील दीनदलित,आदिवासी मुलांची शिक्षणाची सोय भाईसाहेबांनी करून दिली. एकीकडे शिक्षणाचा बाजार मांडणाऱ्या संस्थाचालक आणि संस्थांच्या भाऊगर्दीत प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जिद्दीने जाण्याचा प्रयत्न भाईसाहेबांनी यशस्वी करून उभ्या महाराष्ट्रासमोर शिक्षण प्रसाराच्या आदर्श उभा केला.       अशा थोर शिक्षणमहर्षी व संस्थापक अध्यक्ष यांच्या अल्पशा परिचय करून द्यावासा वाटतो.

    कै.भाईसाहेबांच्या जन्म सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या तळोदे या गावी एका साधारण शेतकरी कुटुंबात ६ जुलै १९२३ रोजी झाला. सामान्य परिस्थितीवर मात करून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. १९४४ मध्ये बी.ए.,१९४८ मध्ये नागपूर विद्यापीठातून एम. ए. (इतिहास) तसेच १९५४ मध्ये पुणे विद्यापीठातून एम.ए. (राज्यशास्त्र) ही पदवी विशेष प्राविण्यासह संपादन केली.भाईसाहेबांचे व्यक्तिमत्त्व अतिशय शालिन,सोज्वळ, निर्गवी,संयमी आणि विनम्र पण निग्रही असे होते. 'दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती' या उक्तीप्रमाणे आज सर्वांचे कर भाईसाहेबांशी जुळतात.

   अध्यापक शिक्षण मंडळाची स्थापना करून धुळे,वर्षी,सांगवी,तळोदे ,काथर्दे।आंबाबारी येथे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालये सुरू केली.अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी संस्था चालवली. ज्या जन्मभूमीत आपण जन्माला आलो त्या जन्मभूमीचे ऋण फेडण्यासाठी भाईसाहेबांनी ज्ञानदानाच्या मार्ग निवडला. तत्कालीन पिढीचे ते जणू दीपस्तंभच होते. महात्मा ज्योतीबा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, आचार्य विनोबा भावे,कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांचा प्रभाव भाईसाहेबांवर असल्याने ज्ञानप्रसाराच्या कार्यातील येणाऱ्या प्रत्येक अडथळ्याला  धीरोदात्तपणे सामोरे गेले.

भाईसाहेबांनी लावलेला रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे.भाईसाहेबांनी आपल्या शिक्षण क्षेत्रातील साठ वर्षाच्या सेवेत अनेक स्थित्यंतरे अनुभवली, प्रसंगी कुटुंबाकडे दुर्लक्ष करून संस्थेची काळजी वाहिली.        त्यांच्याबद्दल असे म्हणावेसे वाटते.

   *"देह झिजविला तुम्ही सत्कर्माच्या अनंत     फुलांनी,

 जाणवते उणिव आपली क्षणोक्षणी.."*

   आपली प्रकृती आजारपण याकडे दुर्लक्ष करून सतत ध्येयाकडे झेपवणाऱ्या भाईसाहेबांनी दिनांक १० जून २००१ रोजी या जगाचा अखेरचा निरोप घेतला. 

     भाईसाहेबांच्या निर्वाणामुळे अध्यापक शिक्षण मंडळात कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली.        अध्यापक शिक्षण मंडळाला विशाल वटवृक्षात रूपांतरीत करण्याचे शिवधनुष्य पेलण्याची जबाबदारी आदरणीय ताईसाहेब मंगलाताई अरुणकुमार महाजन यांच्यावर आली व ती जबाबदारी सर्वार्थाने पूर्ण करण्यासाठी आदरणीय श्री. अरुणभाऊंच्या  महाजन समर्थ साथीने सदैव परिश्रम करत आहेत.            भाईसाहेबांच्या संपूर्ण परिवार भाईसाहेबांच्या वसा आणि वारसा घेऊन ज्ञानदानाच्या व शिक्षण प्रसाराच्या दिव्य कार्यात आज सहभागी आहे.

 'कै.भाईसाहेबांना पुन:श्च शतदा वंदन..!!'*


मा.सौ. मंगलाताई अरुणकुमार महाजन 

( अध्यक्षा) अ. शि.मंडळ धुळे,नंदुरबार
मा.श्री. अरुणकुमार गोरखनाथ महाजन (चेयरमन) स्थानिक स्कुल कमिटी धुळे नंदुरबार

 मा.श्री.आर व्हि सुर्यवंशी (सचिव)

प्राचार्य श्री.अजित टवाळे( संचालक )

प्रा.श्री.अमरदिप अरुणकुमार महाजन

 (सांस्कृतिक विभाग प्रमुख)

प्राचार्य सौ.शितल अमरदीप महाजन

 प्राथमिक मुख्याध्यापिका श्रीम.वंदना माळी

उपमुख्याध्यापिका
 श्रीम. एस.एम.रामीकर

पर्यवेक्षक श्री.एस.एम.महिरे

पर्यवेक्षक प्रा.श्री.आर.सी.माळी

कार्यलीयन अधीक्षक श्री डी.पी.महाले

सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद
      

Comments

  1. वर्धापनदिनाच्या हार्दिक शुभेच्छा💐

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

शहादा मतदार संघात 69.01 टक्के मतदान

शहादा-तळोदा मतदार संघाचा निवडणूक अंदाज लावणे अवघड निकालाची उत्सुकता शिगेला...!

शहर अध्यक्ष म्हणतात भाजप मध्ये आता सर्व दुकान एकत्रित.....,पण भाजप मध्ये असलेल्या चार दुकानांचे काय ?