तालुक्यातील तरुण व अभ्यासू नेते दाज्या पावरा यांची अशासकीय सदस्य म्हणून निवड

प्रतिनिधी तळोदा

उपविभागीय अधिकारी(प्रांत )कार्यालय तळोदा येथे *वनहक्क समिती* मध्ये श्री *दाज्या चामड्या पावरा* यांची अशासकीय सदस्य म्हणून निवड करण्यात आली. 
यापूर्वी दाज्या पावरा हे ग्रामपंचायत रेवानगर येथे उपसरपंच म्हणून काम पाहिले, 2016 पासून जिल्हा पुनर्वसन समितीत अशासकीय सदस्य म्हणून काम पाहिले. जानेवारी 2020 पासून पंचायत समिती सदस्य तळोदा येथे काम पाहत आहे.
 दाज्या पावरा यांचा सामाजिक कामात 2006 विध्यार्थी दशेपासूनच आवड आहे ते केंद्रीय योजना प्रधान मंत्री जनकल्याण कारी योजना प्रचार प्रसार अभियानाच्या राज्य समितीत चिटणीस म्हणून ही काम पाहिले.
 सदर निवड ही जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड सरांच्या आदेशानुसार निवासी जिल्हाधिकारी यांनी घोषित केले.

वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या वनपट्टे या आदिवासी जनतेच्या प्रश्नावर जवळून अभ्यास करण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले आहेत

Comments

Popular posts from this blog

शहादा-तळोदा मतदार संघाचा निवडणूक अंदाज लावणे अवघड निकालाची उत्सुकता शिगेला...!

शहादा मतदार संघात 69.01 टक्के मतदान

तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार राजेश पाडवी सभापती तर राष्ट्रवादी काँग्रेस चे हितेंद्र क्षत्रिय उप सभापतीपदी