माझ्यावर कितीही गुन्हे दाखल झाले तरी मागे हटणार नाही
माझ्यावर कितीही गुन्हे दाखल झाले तरी मागे हटणार नाही
प्रतिनिधी तळोदा
गोपीनाथ मुंडे हे ऊसतोड मजुरांचे दैवत असून बीड जिल्हा जसा मुकादम, मजुरांचा केंद्रबिंदू आहे तसा केंद्रबिंदू आता नंदुरबार जिल्हा होत आहे. मुकादमांना कुठल्याही कारखानाचे कमिशन वेळेवर मिळत नाही. कारखानदार व्याजाने पैसे देवून मुकादम व ऊसतोड मजुरांची लूट करीत आहे. ५० हजार रुपये कोयत्याचे घेतल्याशिवाय कामावर जावू नका. संघटनेचे सभासद होत संघटीत व्हा आणि एकत्र रहा असे प्रतिपादन आमदार सुरेश धस यांनी केले....
ऊसतोड मजूर, मुकादम यांच्या समस्या, अडचणी जाणून घेण्यासाठी सोमावल येथे चर्चा सत्र संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पंचायत समितीचे सभापती यशवंत ठाकरे, नागेश पाडवी, किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस प्रविणसिंह राजपूत, जि. प. सदस्य प्रकाश वळवी, नारायण ठाकरे, सुखदेव सानप, बळीराम पाडवी, दरबार पाडवी, दारासिंग वसावे, हिरामण पाडवी, विरसिंग पाडवी, गणपत वळवी, प्रवीण वळवी, विठ्ठल बागले आदी उपस्थित होते. सुरेश धस पुढे म्हणाले की, मुकादम हा मुका आहे व त्याच्यात दम पण नाही आणि अशी वाईट अवस्था त्यानेच स्वतःची करुन ठेवली आहे. मुकादम व ऊसतोड मजूर कधीच एकत्र बसत नाही आज मात्र इथे एकत्र बसले याचंच आश्चर्य वाटत आहे. मी माझं भाग्य समजतो की आज या भागातील मुकादम व ऊसतोड मजूर यांचं मला दर्शन लाभले आहे. ऊसतोड कामगारांसाठी कारखान्यात शौचालय असेल पाहिजे. मुकादमाचे कमिशन वेळेवर मिळाले पाहिजे असे सांगत मुकादम व ऊसतोड मजुरांसाठी माझ्यावर हजार गुन्हे दाखल झालेत तरी मी घाबरणार नाही. ५० हजार रुपये व दीडशे टक्के वाढ झाल्याशिवाय हालायचं नाही अस ठरवून घ्या असं आवाहन त्यांनी उपस्थितांना केले....
Comments
Post a Comment