तलोद्यात बिबटया कडून बकरीचा फडश्या बंदोबस्त ची मागणी
तळोदा-- तळोदा शहरातील बायपास रस्त्यावर भवर चौफुली जवळील मळ्यात गेल्या दोन तीन दिवसापासून बिंबटया वाघाचा मुक्त संचार सुरु असुन या बाबतीत परिसरातील शेतकऱ्यांनी वनविभागाला कळविले असुन पिंजरा लावण्याची मागणी केली आहे. याठिकाणी रखवालदार मेथा दगू पाडवी यांच्या दोन बकऱ्या चा फडशा पाडला असुन त्यांच्या परिवारामधे दहशतीचे वातावरणात पसरले आहे. सदर बिंबटया चा वावर शेतकरी भरत दगडू सुर्यवंशी, रमेश बबन चौधरी, दगुलाल रमण सुर्यवंशी सुनील भालचंद्र सुर्यवंशी, आदी शेतकऱ्यांचा मळ्यात असुन शेतकऱ्यांनी या बाबतीत वन विभागाला कळविले आहे.
Comments
Post a Comment