कापूस लागवडीची नोंद कृषी उत्पन्न बाजार समितीत करावी
प्रतिनिधी तळोदा
तळोदा तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना बाजार समितीतर्फे आवाहन करण्यात आले आहे की पणन संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या निर्देशानव्ये सन 2020 -21 च्या खरीप हंगामातील उत्पादित कापूस खरेदी आधारभूत किमतीने तसेच शासनाच्या हमीभाव खरेदी आंतर्गत विक्री करण्यासाठी कामीसाठी ज्या शेतकऱ्यांनी 2020 च्या खरीप हंगामात आपल्या शेतात कापूस लागवड केली आहे. त्यांनी त्याची नोंद कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या दप्तरी करावी. तसेच सदर नोंदणी करण्यासाठी बाजार समितीत शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड सन 2020 च्या पीकपेरा नोंद असल्याला अद्ययावत सातबारा उतारा, बँक पासबुक चे पहिले पानाची झेरॉक्स, मोबाईल नंबर बाजार समितीच्या कार्यालयात जमा करावी. तसेच ज्या शेतकऱ्यांच्या नोंदी बाजार समितीकडे असतील तेच शेतकरी शासन कापूस खरेदी करिता पात्र राहतील याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी.
Comments
Post a Comment