तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाकडून बक्षीस वितरण संपन्न


तळोदा
            कोरोनामुळे गणेशोत्सवात लहान मुलांच्या हिरमोड झाला होता. सजावट व कार्यक्रम होऊ शकले नाहीत. मात्र तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाने ऑनलाईन व्हिडिओ वक्तृत्व  स्पर्धा घेऊन विद्यार्थ्यांसाठी उपक्रम राबवला व विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव दिला त्यामुळे ऑनलाईन व्हिडीओ वक्तृत्व स्पर्धेचा पत्रकार संघाचा उपक्रम  कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन सहाय्यक जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी केले.
           तळोदा तालुका मराठी पत्रकार संघातर्फे गणेशोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या ऑनलाईन व्हिडिओ वक्तृत्व स्पर्धेच्या पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम तहसील कार्यालयात पार पडला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सहाय्यक जिल्हाधिकारी अविशांत पंडा बोलत होते.  तहसीलदार पंकज लोखंडे ,मुख्याधिकारी सपना वसावा, तालुका वैद्यकीय अधिकारी महेंद्र चव्हाण ,पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर पाकळे ,नायब तहसीलदार शैलेंद्र गवते उपस्थित होते.
      यावेळी पुढे बोलताना सहाय्यक जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी कोरोना महामारी मुळे प्रत्येकाने आपली काळजी घ्यावी. प्रशासनाला सहकार्य करावे व विद्यार्थ्यांकडून विविध उपक्रम राबवून घ्यावे असे आवाहन केले. तालुका वैद्यकीय अधिकारी महेंद्र चव्हाण यांनी माझे कुटुंब माझी जबाबदारी या उपक्रमाची माहिती दिली. या वक्तृत्व स्पर्धेत लहान गटात   नेमसुशील इंग्लिश मिडीयम स्कुलची विद्यार्थिनी मोक्षदा नितीन शिंपी-प्रथम ,नेमसुशील विद्यामंदिराची ओजस्वी आनंद मगरे- द्वितीय ,नेमसुशील इंग्लिश मिडीयम स्कुलची
आनंदी गोपाल कंदगुळे- तृतीय तर आदित्य देवेंद्र शिंपी याने उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवले.
      मोठ्या गटात नेमसुशीलच्या विद्यार्थी सोहम संतोष माळी प्रथम , शेठ के डी हायस्कुलच्या विद्यार्थी सागर मनीष मराठे द्वितीय तर गो हु महाजन हायस्कुलची विद्यार्थिनी मानसी प्रमोद सोनवणे व नेमसुशील च्या विद्यार्थी चेतन नितीन देवरे यांनी संयुक्तपणे तृतीय क्रमांक मिळवला तर विद्यागौरव इंग्लिश मिडीयम स्कुलची विद्यार्थिनी साक्षी पोपट पावरा हिला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.
       ही पारितोषिके पंचायत समिती सदस्य विजय राणा व जेष्ठ पत्रकार प्रकाश भारती यांच्यातर्फे देण्यात आली.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी पत्रकार संघाचे अध्यक्ष फुंदीलाल माळी , उपाध्यक्ष विकास राणे , सचिव किरण पाटील , कोषाध्यक्ष सुशील सूर्यवंशी ,सदस्य प्रा. अशोक वाघ ,भरत भामरे ,मंगेश पाटील ,सुनील सूर्यवंशी ,ईश्वर मराठे ,उल्हास मगरे , सुधाकर मराठे ,महेंद्र लोहार ,चेतन इंगळे ,सम्राट महाजन ,दीपक मराठे  ,राकेश गुरव ,नरेश चौधरी ,नारायण जाधव ,अक्षय जोहरी ,हंसराज महाले ,राहुल शिवदे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन हंसराज महाले यांनी तर प्रास्ताविक सुनील सूर्यवंशी यांनी व आभार सुधाकर मराठे यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

शहादा मतदार संघात 69.01 टक्के मतदान

शहादा-तळोदा मतदार संघाचा निवडणूक अंदाज लावणे अवघड निकालाची उत्सुकता शिगेला...!

शहर अध्यक्ष म्हणतात भाजप मध्ये आता सर्व दुकान एकत्रित.....,पण भाजप मध्ये असलेल्या चार दुकानांचे काय ?