लाभार्थी वंचित राहू नये,,,, नागेश पाडवी यांची मागणी
कोरोना महामारीच्या वाढता प्रादुर्भाव पाहता ज्येष्ठ नागरिकांसह सर्व शासकीय अर्थसहाय्य योजना लाभ मिळणेकामी गैरसोय होत असून त्यावर योग्य ती कार्यवाही करून पात्र लाभार्थी वंचित राहू नये यासाठी भाजपचे अनुसूचित जमातीचे प्रदेश उपाध्यक्ष नागेश पाडवी यांनी तहसीलदार अक्कलकुवा यांना निवेदन दिले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना महामारीची परिस्थिती गंभीर होत असताना त्यातच महाराष्ट्र शासन निर्णयानुसार सुरू असलेल्या सर्व अर्थसहाय्य योजनेच्या लाभार्थ्यांना हयातीचे प्रमाणपत्र व उत्पन्नाचा दाखला सादर करणे अनिवार्य केले आहे. परंतु हयातीचे प्रमाणपत्रासाठी बँकेच्या शाखेत तासं तास रांगेत गर्दी मध्ये उभे राहावे लागत आहे. सध्या कोरोनाच्या संपर्कातील रुग्ण संख्या वाढत असल्याने हे वयोवृद्ध लाभार्थी कोरोना रुग्णाच्या संपर्कात येवून धोका निर्माण होऊ शकतो.
तसेच उत्पन्नाच्या दाखल्यासाठी हातमजुरी करणारे, दारिद्र्य रेषेखालील व भूमिहीन असल्यास त्यांना पात्रताकामी 21 हजार रुपये उत्पन्न दाखला मिळवण्याकमी अडचणी निर्माण होत आहे. सदर दाखला न मिळाल्यास लाभार्थी या योजनेपासून वंचित होईल, तरी शासकीय सर्व अर्थसहाय्य योजनांपासून पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही, याबाबत गांभीर्याने लक्ष घालून आपल्या स्तरावरून योग्य ती कारवाई करणेबाबत तहसीलदार अक्कलकुवा यांना निवेदन देण्यात आले.
Comments
Post a Comment