डी,बी,टी वर सखोल चर्चा
परिसंवादातून डिबीटीवर सखोल चर्चा
शिर्वे : अभ्यास गटाकडून उपक्रम
तळोदा तालुक्यातील शिर्वे येथिल आश्रमशाळेत डीबीटी योजनेवर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी डिबीटी अभ्यास गटाचे अध्यक्ष पद्माकर वळवी होते.
डीबीटी योजना बाबत विद्यार्थी, पालक मुख्याध्यापक अधीक्षक व विविध सामाजिक संघटना व लोकप्रतिनिधी यांचे मते जाऊन घेण्यासाठी परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अक्कलकुवा व तळोदा तालुक्यातील 5 आश्रम शाळा व वसतिगृहाच्या विद्यार्थी, पालक यांना परिसंवादात सहभागी करून घेण्यात आले.परिसंवादाला शिर्वे येथील सरपंच अनिता वसावे, शालेय समितीचे अध्यक्ष पितांबर वसावे, उपाध्यक्ष राजेश पाडवी, सहाय्यक प्रकल्प अधिकारी अमोल मेटकर, महादेव जानगर, वसतिगृह शिक्षण सहाय्यक प्रकल्प अधिकारी एस.एम. चौधरी, विस्तार अधिकारी इन.डी.ढोले, जी.डी.आखडमल, बी.आर.मुगळे, बी.एम.कदम यासह शाळेतील मुख्याध्यापक अधीक्षक वसतिगृहातील गृहपाल शिक्षक आदी उपस्थित होते.
डीबीटी अभ्यास धोरण समिती अभ्यासगटाचे अध्यक्ष पद्माकर वळवी यांच्या हस्ते याहा मोगी मातेच्या पूजनाने परिसंवादाला सुरुवात करण्यात आली. पद्माकर वळवी यांनी डीबीटी योजना सुरू झाल्यापासून ते आतापावेतो त्यात झालेल्या बदलाबाबत व निर्माण झालेल्या अडचणी व समस्यांबाबत सखोल चर्चा करून माहिती सांगितली. यासोबतच डीबीटी योजनेमुळे विद्यार्थ्यांच्या वेळ वाया जातो का? त्यांच्या शिक्षणावर परिणाम होतो का अश्या प्रश्न विचारून विद्यार्थ्यांना व पालकांना सहभागी करून घेतले. त्यानंतर उपस्थित पालकांना व विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष भेटून प्रश्नावलीच्या मध्यमातून लेखी स्वरूपात त्यांचे मते जाणून घेतली.
यावेळीं शिर्वे व नाला आश्रम शाळेचे मुख्याध्यापक ए. सी.पाटील, लोभाणी, अलीविहिर आश्रम शाळेचे मुख्याध्यापक पी.एन.पाडवी, लोभणी आश्रम शाळेचे मुख्यध्यापक श्रीमती एस.आर.पाडवी, इच्छागव्हान आश्रमशालेचे मुख्याध्यापक व्ही.एस.चंडोल, आमलाड वसतिगृहाचे गृहपाल इरफान खाटीक, सुनील जीवने, तळोदा मुलींचे वसतिगृह येथील गृहपाल श्रीमती डोंगरे, जाधव आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment