जिल्हातील अनेक नेते राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात
नंदुरबार जिल्हातील दोन माजी आमदार व जी,प, मधील विद्यमान चार ते पांच सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाटेवर असल्याचे खात्रीशीर वृत्त असून यामुळं जिल्हातील राजकारण पुन्हा एकदा तापायला सुरुवात झाल आहे, यातील एक माजी आमदार ला महामंडळावर घेण्याचा शब्द देखील दिल्याच बोलले जाते,
राष्ट्रवादी काँग्रेस चे युवक प्रदेश अध्यक्ष मेहबुब शेख व आशिष गोविंदराव आदिक नंदुरबार जिल्ह्याचा संघटन बांधणी निमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक मेळावा निमित्ताने आले असून राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हा अध्यक्ष पद रिक्त असून माजी जिल्हा अध्यक्ष राजेंद्रकुमार गावीत यांनी भाजपात प्रवेश केल्याने जिल्हाध्यक्षपद विधानसभा निवडणूकी पासून रिक्त आहे,
दरम्यान या पदासाठी माजी आमदार शरद गावित, अभिजित मोरे, सागर तांबोळी इच्छुक आहेत
दरम्यान जिल्हाअध्यक्ष पदासाठी इच्छुकांची यादी पाहता हा विषय पक्षचे सर्वेसर्व्हा शरद पवार जिल्हाध्यक्षपदी कोण बसेल या बाबत निर्णय घेणार असल्याचे समजते, दरम्यान मागील विधानसभा निवडणुकी दरम्यान युतीत राष्ट्रवादी काँग्रेस ला एकही जागा न मिळाल्याने जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस च्या गोटात मरगळ आली होती, कारण यामुळं आमदार की साठी इच्छुकांचा हिरमोड झाला होता, आता मात्र नंदुरबार व शहादा असे दोन मतदार संघ राष्ट्रवादी ला मिळावे या साठी काहींनी पुन्हा मागणी केली आहे,
जिल्हातील नेत्यांचा राष्ट्रवादी च्या वरिष्ठ नेत्यांचा भेटी गाठी -
युती व आघाडी मूळ जागा वाटपात इतर पक्षचा अनेकांना विधानसभा निवडणुकीत संधी मिळाली नाही, त्यामुळं आपले पुढील राजकीय वाटचाल घड्याळ सोबत सुरू करण्यासाठी जिल्ह्यातील अनेक दिगग्ज नेत्यांनी राष्ट्रवादी च्या बड्या नेत्यांचा भेटी घेतल्या असून स्वतःची राजकीय वाट सुकर करण्यासाठी प्रवेशपूर्वीच पक्ष कडून काही अपेक्षा व अटी ठेवण्यात येत आहेत,
विधानसभा निवडकीत मागील पंचवर्षिक ला एकही जागा राष्ट्रवादी ला मिळाली नसली तरी
त्यापूर्वी या पक्षाने काँग्रेस च्या बालेकिल्ल्यात डॉ विजय कुमार गावित यांचा कणखर नेतृत्वाखाली जी,प, मध्ये सत्ता स्थापन करून दाखवली होती अर्थात गावित यांनी मंत्रिपद च्या माध्यमातून पक्ष सोबतच स्वतः ताकद देखील दाखवून दिली होती,
मात्र त्यांचा भाजप प्रवेश नंतर सर्व गणित बदलली राष्ट्रवादी मधील अनेक दिगग्ज भाजपात गेले व राष्ट्रवादी ची जागा भाजपाने घेतली , त्यामुळे जिल्हात डॉ विजयकुमार गावित स्वतः एक पक्ष व्यतिरिक्त वेगळी ताकद असल्याचे सिद्ध झालं
दरम्यान सध्या विरोधात असलेले काही जी,प ,सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाणार असल्याने पडद्यामागे काहीतरी वेगळे राजकारण सुरू सुरू असल्याचे बोलले जाते, नवीन प्रवेश कधी होतो व जिल्हाध्यक्षपदी कोणाची निवड होते या कडे सर्व राजकीय पक्षचे लक्ष लागून आहे
कालीचरण सुर्यवंशी
9421887715
Comments
Post a Comment