दुर्गम भागात पोहचले तहसीलदार
तहसीलदार दुर्गम भागात स्वतः पोहचले आता
गावातच रोजगार मिळणार तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे यांचे ग्रामस्थांना आश्वासन
प्रतिनिधी तळोदा
दि.21/9/2020रोजी अतिदुर्गम भाग झापी-फलाई या गावात स्थलांतर होऊ नये व गावात जास्तीत जास्त रोजगार कसा देता येईल.याची जाणीवजागृती साठी, ज्ञानेश्वर सपकाळे तहसीलदार अक्रानी, स्वतः गावात भेट देऊन ग्रामस्थां जवळ चर्चा केली,
या कार्यक्रमासाठी कृषी अधिकारी व वन विभागाच्या अधिकाऱ्यांनाही बोलावले होते परंतु कृषी अधिकारी पोहोचले नाही व वन विभागाचे वनरक्षक मिटिंग संपत असताना आले.
गावात याच विभागाकडून रोजगार दिला जातो परंतु तेच वेळेवर उपस्थित नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली
नर्मदा बचाओ आंदोलनाचे चेतन साळवे,लतिका राजपूत व विजय वळवी उपस्थित होते.नर्मदा आंदोलन व तहसीलदार अक्रानी यांनी अशा प्रकारे बिलगाव, फलाई,नंदलवळ, थुवानी व भाबरी या गांवामध्ये रोजगाराच्या जाणीवजागृतीसाठी कार्यक्रम लावले आहेत यात कमीतकमी 30 ते 40 गावाचे प्रतिनिधी उपस्थित राहतील असं नियोजन आहे व जास्तीत जास्त गावात कसा रोजगार उपलब्ध करता येईल व स्थलांतर कमी करता येईल हा उद्देश आहे.
काल फलाई येथे मोठ्या प्रमाणावर, खडकी,झापी, कुंड्या ,
सिंदीदीगर,सावऱ्यालेकडा येथील गांवप्रतिनिधी उपस्थित होते. गांवकऱ्यांनी गांवराण काकड्या देऊन अधिकाऱ्यांचे स्वागत केले.
व सांगितले की आमच्या गावात रोजगार दिला जात नाही त्यामुळे रोजगारासाठी स्थलांतर करावे लागते,लहान लहान लेकरांना घेऊन ऊन पाऊस,थंडीवाऱ्यात उघड्यावर पडावे लागते व लेकरू जर मयत झालं तर तिथेच पुरावं लागतं. असे उपस्थित महिलांनी सांगितले. लोकांनी सांगितले की इंदिरा आवास योजनेत घरकुल बांधले,एकच हप्ता मिळाला.पंतप्रधान निवास योजनेत घरकुल आले दुसऱ्याच्या खात्यावर मजुरी टाकून दिली, काही गावात तर रोजगार सेवकच नाही.गावातच रोजगार दिला पाहिजे आम्ही रोजगार करायला तयार आहोत असे सांगितले. व तोरणमाळ खालच्या कुठल्याही गावात रेशनदुकानदार रेशन आणीत नाही,रेशन घेण्यासाठी पायी तोरणमाळ ला जावे लागते व ज्यादिवशी वाटप आहे त्यादिवशी नाही गेले तर दुकानदार म्हणतो आता धान्य मिळणार नाही,संपले अशी सर्वच गांवप्रतिनिधी ची तक्रारी होत्या.गावात लसीकरण दोनदोन महिने होत नाही, अंगणवाडीत मिळणारा पोषण आहार ही अपूर्ण मिळतो,जननी सुरक्षा,मानव विकास योजने अंतर्गत मिळणारा लाभापासून बऱ्याच महिला वंचित असल्याबाबत सांगितले.
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा त्यांच्या गावात इतकी सविस्तर माहिती द्यायला एक अधिकारी त्यांच्या गावात आले होते.याच्या पूर्वी कमिशनर साहेबांसोबत जिल्हाधिकारी व बरेच अधिकारी एक दोनदा या भागांतून गेले परंतु एक धावती भेट होते. तहसीलदार यापूर्वी तुम्हाला रोजगार न मिळाल्याने तुम्हाला स्थलांतरित व्हावे लागले परंतु यापुढे असे होणार नाही आपण संबंधित यंत्रणेला गावातच रोजगार उपलब्ध करायला लावू.
झापी या गावाचे 200 रेशनकार्ड तयार केले आहेत,तुमच्या गावात कोणी रेशनकार्ड शिवाय असेल तर त्या साठी प्रयत्न करू
तहसीलदार गाडी अडकली जेसीबी ने काढली -
दरम्यान परताना पाऊस आल्याने नदीला पूर आला थांबून दोन तासांच्यावर झाले होते.शेवटी ,बुलडोझर वाल्यान खड्डा भरला दोनतीन वेळा स्वतः बुलडोझर पाण्यात टाकून किती पाणी? कुठे खड्डा याचा अंदाज घेतला .व तहसीलदार यांच्या गाडीला साखळी बांधली, तहसीलदार यांनी सांगितले आता बुलडोझरमध्ये बसून त्या पलीकडे गेले , तहसीलदार गाडी ड्रायव्हर असे गाडीत बसले सर्वांनी एक मोठ्ठा श्वास घेत गाडी पाण्यात टाकली बुलडोझर ने हळूहळू गाडीला सुखरूप बाहेर काढले व सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला.
Comments
Post a Comment