Posts

Showing posts from September, 2020

तलोद्यात बिबटया कडून बकरीचा फडश्या बंदोबस्त ची मागणी

Image
तळोदा-- तळोदा शहरातील बायपास रस्त्यावर भवर चौफुली जवळील मळ्यात गेल्या दोन तीन दिवसापासून बिंबटया वाघाचा मुक्त संचार सुरु असुन या बाबतीत परिसरातील शेतकऱ्यांनी वनविभागाला कळविले असुन पिंजरा लावण्याची मागणी केली आहे. याठिकाणी रखवालदार मेथा दगू पाडवी यांच्या दोन बकऱ्या चा फडशा पाडला असुन त्यांच्या परिवारामधे दहशतीचे वातावरणात पसरले आहे. सदर बिंबटया चा वावर शेतकरी भरत दगडू सुर्यवंशी, रमेश बबन चौधरी, दगुलाल रमण सुर्यवंशी सुनील भालचंद्र सुर्यवंशी,  आदी शेतकऱ्यांचा मळ्यात असुन शेतकऱ्यांनी या बाबतीत वन विभागाला कळविले आहे.

माझ्यावर कितीही गुन्हे दाखल झाले तरी मागे हटणार नाही

Image
माझ्यावर कितीही गुन्हे दाखल झाले तरी मागे हटणार नाही  प्रतिनिधी तळोदा गोपीनाथ मुंडे हे ऊसतोड मजुरांचे दैवत असून बीड जिल्हा जसा मुकादम, मजुरांचा केंद्रबिंदू आहे तसा केंद्रबिंदू आता नंदुरबार जिल्हा होत आहे. मुकादमांना कुठल्याही कारखानाचे कमिशन वेळेवर मिळत नाही. कारखानदार व्याजाने पैसे देवून मुकादम व ऊसतोड मजुरांची लूट करीत आहे. ५० हजार रुपये कोयत्याचे घेतल्याशिवाय कामावर जावू नका. संघटनेचे सभासद होत संघटीत व्हा आणि एकत्र रहा असे प्रतिपादन आमदार सुरेश धस यांनी केले.... ऊसतोड मजूर, मुकादम यांच्या समस्या, अडचणी जाणून घेण्यासाठी सोमावल येथे चर्चा सत्र संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पंचायत समितीचे सभापती यशवंत ठाकरे, नागेश पाडवी, किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस प्रविणसिंह राजपूत, जि. प. सदस्य प्रकाश वळवी, नारायण ठाकरे, सुखदेव सानप, बळीराम पाडवी, दरबार पाडवी, दारासिंग वसावे, हिरामण पाडवी, विरसिंग पाडवी, गणपत वळवी, प्रवीण वळवी, विठ्ठल बागले आदी उपस्थित होते. सुरेश धस पुढे म्हणाले की, मुकादम हा मुका आहे व त्याच्यात दम पण नाही आणि अशी वाईट अवस्था त्यानेच स्वतःची करुन ठेवली आहे. मुक...

तलोद्यात युवक काँग्रेस कडून केंद्र सरकारचा निषेध

Image
आज नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने तळोदा येथे केंद्र सरकार ने   जे शेतकरी विरोधी बिल पास केले त्याच्या निषेध म्हणून जिल्हा युवक काँग्रेस   कडून  स्मारक चोकात  निषेध व्यक्त करण्यात आला  देशाचा अर्थ व्यवस्थेत शेतकरीच प्रमुख असून भारत  हा कृषी प्रधान देश आहे मात्र हा निर्णय पूर्णपणे शेतकरी विरुद्ध असल्याचे मत    उपाध्यक्ष-संदीप परदेशी यांनी व्यक्त केले यावेळी शहर अध्यक्ष -जितेंद्र सूर्यवंशी शहर उपाध्यक्ष -गोविंदा पाडवी तळोदा शहादा विधानसभा सोशल मीडिया योगेश पाडवी,चिंगा पाडवी,योगेश चोधरी,योगेश पाडवी,संजय पाडवी,कांतीलाल पाडवी,रईस कुरेशी, भूषण कलाल,दिनेश पाडवी,जयेश जोहरी,कांत्या पाडवी,मुकेश पाडवी,प्रकाश पाडवी,सोनू सोनवणे युवक काँग्रेस तर्फे स्मारक चौक येथे कँडल लावून केंद्र सरकारने मंजूर केलेल्या शेतकरी बिल विरोधाच्या  निषेधार्त घोषणा बाजी करून निषेध करण्यात आला ..

झोळी करून रुग्णाचा जीवघेणा प्रवास कधी थांबेल

Image
तळोदा : तालुक्यातील गृ.ग्रा.पं. इच्छागव्हाण कार्यक्षेत्रात येणाऱ्या 70 कुटुंब व 370 लोकसंख्या असलेलं नयामाळ या गावात मागील महिन्यात घडलेल्या घटनेची वारंवार पुनरावृत्ती होत आहे. वेळोवेळी याबाबत लोकप्रतिनिधी अथवा प्रशापुढे गाऱ्हाने माडूनही कोणीही या ठिकाणी साधे सांत्वन करण्यासाठी सुद्धा पोहचले नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.           दि 22 सप्टेंबर रोजी जोसाबाई सोन्या वसावे वय 40 वर्षीय महिलेला अचानक थँडी ताप भरल्याने ती आजारी पडली, तिची प्रकृती एवढी खालावली की तिला चालणे सुद्धा अवघड झाले. दरम्यान स्वातंत्र्याच्या 75 नंतरही या भागात रस्ते नसल्याने या भागात वाहन येत नसल्याने या भागातील नागरिक मरण यातना सोसत आहेत.          दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी लाकडाच्या दांडीला झोळीत बांधून रुग्णास 8-10 की मी पाय-पाय चालत उपचारासाठी जाऊन या महिलेस रुगणालया पावेतो पोहचववावे लागले.          या विषयी मागील महिन्यात संबंधीत विभागास व लोकप्रतिनिधीना  निवेदनेही देण्यात आले. मात्र आजपर्यंत कुठलाही लोकप्रतिनिधी किंवा...

ग्राम पंचायतचा दर्जा मिळावा रोशमाळ ग्रामस्थांची मागणी

Image
तळोदा : नगरपंचायत धडगांव वडफळ्या-रोषमाळ बु.!! यामधून रोषमाळ बु.!! गावास वास्तव परिस्थिती लक्षात घेता ग्रामपंचायत दर्जा मिळावा रोषमाळ बु.!! ग्रामस्थांच्या वतीने अक्राणी येथील तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.       या निवेदनात म्हटले आहे की, रोषमाळ बु.!! हे तालुक्याचे गाव म्हणून रोषमाळ बु.!! व वडफळ्या या ग्रुपग्रामपंचायतीचे रुपांतर सन २०१५ साली नगरपंचायत मध्ये करण्यात आले होते. नंदुरबार जिल्हा हा आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि यातच धडगांव (अक्राणी) तालुका १००  टक्के अतिदुर्गम आदिवासी तालुका म्हणून ओळखला जातो. तसेच पेसा (२०१४) कायद्यानुसार देखील रोषमाळ बु.!! संपूर्ण ग्रामपंचायत पेसा क्षेत्रात मोडते. तसेच वडफळ्या ग्रुप ग्रामपंचायत मध्ये येणारे जुने धडगांव आणि वडफळ्या ही गावे देखील पेसा क्षेत्रात येतात. अर्थात यातील ९५ टक्के क्षेत्र हे ग्रामीण व कृषि प्रधान आहे. अनुसूचित क्षेत्रांना लागू असणार्‍या तरतूदी नुसार याठिकाणी नगरपंचायत स्थापन करणे संविधानातील तरतूदींचे उल्लंघन झाल्यासारखे आहे.       पाचवी अनुसूची क्षेत्रात मोडणार्‍या या गावांना श...

लाभार्थी वंचित राहू नये,,,, नागेश पाडवी यांची मागणी

Image
कोरोना महामारीच्या वाढता प्रादुर्भाव पाहता ज्येष्ठ नागरिकांसह सर्व शासकीय अर्थसहाय्य योजना लाभ मिळणेकामी गैरसोय होत असून त्यावर योग्य ती कार्यवाही करून पात्र लाभार्थी वंचित राहू नये यासाठी भाजपचे अनुसूचित जमातीचे प्रदेश उपाध्यक्ष नागेश पाडवी यांनी तहसीलदार अक्कलकुवा यांना निवेदन दिले.          निवेदनात नमूद करण्यात आले आहे की संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना महामारीची परिस्थिती गंभीर होत असताना त्यातच महाराष्ट्र शासन निर्णयानुसार सुरू असलेल्या सर्व अर्थसहाय्य योजनेच्या लाभार्थ्यांना हयातीचे प्रमाणपत्र व उत्पन्नाचा दाखला सादर करणे अनिवार्य केले आहे. परंतु हयातीचे प्रमाणपत्रासाठी बँकेच्या शाखेत तासं तास रांगेत गर्दी मध्ये उभे राहावे लागत आहे. सध्या कोरोनाच्या संपर्कातील रुग्ण संख्या वाढत असल्याने हे वयोवृद्ध लाभार्थी कोरोना रुग्णाच्या संपर्कात येवून धोका निर्माण होऊ शकतो.        तसेच उत्पन्नाच्या दाखल्यासाठी हातमजुरी करणारे, दारिद्र्य रेषेखालील व भूमिहीन असल्यास त्यांना पात्रताकामी 21 हजार  रुपये उत्पन्न दाखला  मिळवण्याकमी अडचणी निर्माण हो...

दुर्गम भागात पोहचले तहसीलदार

Image
तहसीलदार दुर्गम भागात स्वतः पोहचले आता गावातच रोजगार मिळणार तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे यांचे ग्रामस्थांना आश्वासन प्रतिनिधी तळोदा दि.21/9/2020रोजी अतिदुर्गम भाग झापी-फलाई या गावात स्थलांतर होऊ नये व गावात जास्तीत जास्त रोजगार कसा देता येईल.याची जाणीवजागृती साठी, ज्ञानेश्वर सपकाळे तहसीलदार अक्रानी, स्वतः गावात भेट देऊन ग्रामस्थां जवळ चर्चा केली, या कार्यक्रमासाठी कृषी अधिकारी व वन विभागाच्या  अधिकाऱ्यांनाही बोलावले होते परंतु कृषी अधिकारी पोहोचले नाही व वन विभागाचे वनरक्षक मिटिंग संपत असताना आले. गावात याच विभागाकडून रोजगार दिला जातो परंतु तेच वेळेवर उपस्थित नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली नर्मदा बचाओ आंदोलनाचे चेतन साळवे,लतिका राजपूत व विजय वळवी उपस्थित होते.नर्मदा आंदोलन व तहसीलदार अक्रानी यांनी अशा प्रकारे बिलगाव, फलाई,नंदलवळ, थुवानी व भाबरी या गांवामध्ये रोजगाराच्या जाणीवजागृतीसाठी कार्यक्रम लावले आहेत यात कमीतकमी 30 ते 40 गावाचे प्रतिनिधी उपस्थित राहतील असं नियोजन आहे व जास्तीत जास्त गावात कसा रोजगार उपलब्ध करता येईल व स्थलांतर कमी करता येईल हा उद्देश आहे.     ...

तालुक्यातील तरुण व अभ्यासू नेते दाज्या पावरा यांची अशासकीय सदस्य म्हणून निवड

Image
प्रतिनिधी तळोदा उपविभागीय अधिकारी(प्रांत )कार्यालय तळोदा येथे *वनहक्क समिती* मध्ये श्री *दाज्या चामड्या पावरा* यांची अशासकीय सदस्य म्हणून निवड करण्यात आली.  यापूर्वी दाज्या पावरा हे ग्रामपंचायत रेवानगर येथे उपसरपंच म्हणून काम पाहिले, 2016 पासून जिल्हा पुनर्वसन समितीत अशासकीय सदस्य म्हणून काम पाहिले. जानेवारी 2020 पासून पंचायत समिती सदस्य तळोदा येथे काम पाहत आहे.  दाज्या पावरा यांचा सामाजिक कामात 2006 विध्यार्थी दशेपासूनच आवड आहे ते केंद्रीय योजना प्रधान मंत्री जनकल्याण कारी योजना प्रचार प्रसार अभियानाच्या राज्य समितीत चिटणीस म्हणून ही काम पाहिले.  सदर निवड ही जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड सरांच्या आदेशानुसार निवासी जिल्हाधिकारी यांनी घोषित केले. वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या वनपट्टे या आदिवासी जनतेच्या प्रश्नावर जवळून अभ्यास करण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले आहेत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवस निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

Image
*भारतीय जनता पार्टी.....तळोदा शहर..* *आदरणीय पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त तळोदा शहरात *सेवा सप्ताह राबविण्यात येत असून नियोजनानुसार आज शहर संघटन , शहर युवा आघाडी ,आदिवासी युवा आघाडी व नगराध्यक्ष अजय भैय्या परदेशी यांच्या संयुक्त विद्यमाने *दिनांक :-18/09/2020रोजी शहरातील बालाजी वाडा येथे * भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले..यात एकूण 73 दात्यांनी रक्तदान केले. नंदुरबार येथिल जनकल्याण रक्तपेढी यांनी रक्त संकलन केले.  दरम्यान उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळे व पोषण आहार वाटप करण्यात आला. याठिकाणी शहर उपाध्यक्ष दीपक जीवन चौधरी यांनी नियोजन केले....शिबिराचे उद्घाटन आपल्या मतदार संघाचे आमदार श्री.राजेशदादा पाडवी, जिल्हाध्यक्ष मा.विजयभाऊ चौधरी, प्रदेश निमंत्रित सदस्य मा.राजेंद्र गावित, जिल्हा सरचिटणीस मा. राजु गावित, जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष हर्षल पाटील, नगराध्यक्ष श्री.अजयभैया परदेशी , उपनगराध्यक्षा सौ.भाग्यश्री चौधरी , भाजपा शहराध्यक्ष श्री.योगेशभाऊ चौधरी तसेच शहरातील विविध मोर्चां व आघाडी यांचे अध्यक्ष व कार्यकर्ते उपस्थित होते.*     ...

तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाकडून बक्षीस वितरण संपन्न

Image
तळोदा             कोरोनामुळे गणेशोत्सवात लहान मुलांच्या हिरमोड झाला होता. सजावट व कार्यक्रम होऊ शकले नाहीत. मात्र तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाने ऑनलाईन व्हिडिओ वक्तृत्व  स्पर्धा घेऊन विद्यार्थ्यांसाठी उपक्रम राबवला व विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव दिला त्यामुळे ऑनलाईन व्हिडीओ वक्तृत्व स्पर्धेचा पत्रकार संघाचा उपक्रम  कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन सहाय्यक जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी केले.            तळोदा तालुका मराठी पत्रकार संघातर्फे गणेशोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या ऑनलाईन व्हिडिओ वक्तृत्व स्पर्धेच्या पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम तहसील कार्यालयात पार पडला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सहाय्यक जिल्हाधिकारी अविशांत पंडा बोलत होते.  तहसीलदार पंकज लोखंडे ,मुख्याधिकारी सपना वसावा, तालुका वैद्यकीय अधिकारी महेंद्र चव्हाण ,पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर पाकळे ,नायब तहसीलदार शैलेंद्र गवते उपस्थित होते.       यावेळी पुढे बोलताना सहाय्यक जिल्हाधिकारी अविशां...

बऱ्हाणपूर अंकलेश्वर मार्गावर बिबटचा मुक्त संचार

Image
तळोदा  तालुक्यातील गुजरात हद्दीनजीक असणाऱ्या आमलाड ते दसवड खांडसरी दरम्यान काल रविवार संध्याकाळी  ८/२५  वाजेच्या सुमारास बिबटया वाघाच दर्शन झालं असून या दरम्यान  काही तरुण तलोद्याकडून शहादा कडे जात असताना  त्यांनी धाडसीपणा करून काढला  त्या नंतर तिथून ५०० मीटर अंतरावर असलेल्या सिद्धिविनायक पेट्रोल पंप वर ते थांबले असता  या पंप चे मालक संजय चोधरी यांना त्यांनी घडलेली घटना मोबाईल मधील व्हिडिओत दाखवली ,   या बाबत संजय चोधरी यांच्याशी संपर्क केला असतां त्यांनी सांगितले की या अगोदर त्यांनी स्वतः दोन वेळारात्री  बिबट्या ला रस्ता ओलांडताना पाहिले आहे, ज्या ठिकाणी बिबट दिसला तो भाग महाराष्ट्र हद्दीत असला तरी गुजरात हद्द इथून जवळच आहे,  गुजरात महाराष्ट्र हद्दीवर सदर भाग असून या अगोदर अनेकदा बिबटया  उघड्या डोळ्यांनी दिसला असून   आता मोबाईल असल्यामुळे  व्हिडीओ काढून तो सोशल मीडियावर  व्हायरल केला आहे, तळोदा तालुक्यात बिबटया वन्यजीवाची संख्या खूप झपाट्याने वाढत आहे दरम्यान गुजरात महाराष्ट्र राज्याला जोडणाऱ्या...

डी,बी,टी वर सखोल चर्चा

Image
परिसंवादातून  डिबीटीवर सखोल चर्चा शिर्वे : अभ्यास गटाकडून उपक्रम  तळोदा तालुक्यातील शिर्वे येथिल आश्रमशाळेत डीबीटी योजनेवर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी डिबीटी अभ्यास  गटाचे अध्यक्ष  पद्माकर वळवी होते.           डीबीटी योजना बाबत विद्यार्थी, पालक मुख्याध्यापक अधीक्षक व विविध सामाजिक संघटना व लोकप्रतिनिधी यांचे मते जाऊन घेण्यासाठी परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अक्कलकुवा व तळोदा तालुक्यातील 5 आश्रम शाळा व वसतिगृहाच्या विद्यार्थी, पालक यांना परिसंवादात सहभागी करून घेण्यात आले.परिसंवादाला शिर्वे येथील सरपंच अनिता वसावे, शालेय समितीचे अध्यक्ष पितांबर वसावे, उपाध्यक्ष राजेश पाडवी, सहाय्यक प्रकल्प अधिकारी अमोल मेटकर, महादेव जानगर, वसतिगृह शिक्षण सहाय्यक प्रकल्प अधिकारी एस.एम. चौधरी, विस्तार अधिकारी इन.डी.ढोले, जी.डी.आखडमल, बी.आर.मुगळे, बी.एम.कदम यासह शाळेतील मुख्याध्यापक अधीक्षक वसतिगृहातील गृहपाल शिक्षक आदी उपस्थित होते.          डीबीटी अभ्यास धोरण समिती अभ्यासगटाचे...

जिल्हातील अनेक नेते राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात

Image
नंदुरबार जिल्हातील दोन माजी आमदार व जी,प, मधील विद्यमान चार ते पांच सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाटेवर असल्याचे खात्रीशीर वृत्त असून यामुळं जिल्हातील राजकारण पुन्हा एकदा तापायला सुरुवात झाल आहे,  यातील एक माजी आमदार ला महामंडळावर घेण्याचा शब्द देखील दिल्याच बोलले जाते,  राष्ट्रवादी काँग्रेस चे युवक प्रदेश अध्यक्ष मेहबुब शेख व आशिष गोविंदराव आदिक नंदुरबार जिल्ह्याचा संघटन बांधणी निमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक मेळावा निमित्ताने आले असून राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हा अध्यक्ष पद रिक्त असून माजी जिल्हा अध्यक्ष राजेंद्रकुमार गावीत यांनी भाजपात प्रवेश केल्याने जिल्हाध्यक्षपद विधानसभा निवडणूकी पासून रिक्त आहे,   दरम्यान या पदासाठी माजी आमदार शरद गावित,  अभिजित मोरे, सागर तांबोळी इच्छुक आहेत दरम्यान जिल्हाअध्यक्ष पदासाठी इच्छुकांची यादी पाहता हा विषय पक्षचे सर्वेसर्व्हा शरद पवार जिल्हाध्यक्षपदी कोण बसेल या बाबत निर्णय घेणार असल्याचे समजते, दरम्यान मागील   विधानसभा निवडणुकी दरम्यान युतीत राष्ट्रवादी काँग्रेस ला एकही जागा न मिळाल्याने जिल्ह्यातील...

कापूस लागवडीची नोंद कृषी उत्पन्न बाजार समितीत करावी

Image
प्रतिनिधी तळोदा तळोदा तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना बाजार समितीतर्फे आवाहन करण्यात आले आहे की पणन संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या निर्देशानव्ये  सन 2020 -21 च्या खरीप हंगामातील उत्पादित कापूस खरेदी आधारभूत किमतीने तसेच शासनाच्या हमीभाव खरेदी आंतर्गत विक्री करण्यासाठी कामीसाठी ज्या  शेतकऱ्यांनी 2020 च्या खरीप हंगामात आपल्या शेतात कापूस लागवड केली आहे. त्यांनी त्याची नोंद कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या दप्तरी करावी. तसेच सदर नोंदणी करण्यासाठी बाजार समितीत शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड सन 2020 च्या पीकपेरा नोंद असल्याला अद्ययावत सातबारा उतारा, बँक पासबुक चे पहिले पानाची झेरॉक्स, मोबाईल नंबर बाजार समितीच्या कार्यालयात जमा करावी.  तसेच ज्या शेतकऱ्यांच्या नोंदी बाजार समितीकडे असतील  तेच शेतकरी शासन कापूस खरेदी करिता पात्र राहतील याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी. तळोदा तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या कापूस लागवडीची माहिती दिनांक 30/09/2020 सप्टेंबर पर्यंत बाजार समितीच्या दप्तरी नोंद करून शासनाच्या कापूस हमीभाव खरेदीच्या लाभ घ्यावा असे आवाहन तळोदा कृषि उत्पन्न बाजार समित...

शिक्षण क्षेत्रातील आदर्श संस्थेच्या ५५ वर्धापनदिन

Image
  *अध्यापक शिक्षण मंडळ ५५वा  वर्धापन दिनाचा शुभेच्छा..!!*          *आज ५ सप्टेंबर*    *डाँ सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती*,      *"राष्ट्रीय शिक्षक दिन"*             आणि    *अध्यापक शिक्षण मंडळ या संस्थेच्या स्थापना दिवस* *कै. प्राचार्य भाईसाहेब गो.हु. महाजन* यांनी याच शुभ दिवशी    म्हणजेच *५ सप्टेंबर १९६५* रोजी थोर शिक्षणतज्ञ श्री.बा.ग जगताप यांच्या हस्ते      अध्यापक शिक्षण मंडळ या शिक्षण संस्थेची स्थापना केली. "कसेल त्याची जमीन, पिकवेल त्याच्या मळा आणि शिकवेल त्याची शाळा" या आगळ्यावेगळ्या तत्वानुसार शिक्षण संस्था स्थापन करून शिक्षणाची ज्ञानगंगा गरिबांच्या दारापर्यंत पोहोचवण्याचे महान कार्य करणाऱ्या भाईसाहेबांना विनम्र वंदन.        कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 'कमवा आणि शिका' तत्त्वातून प्रेरणा घेऊन सातपुडा पर्वताच्या परिसरातील दीनदलित,आदिवासी मुलांची शिक्षणाची सोय भाईसाहेबांनी करून दिली. एकीकडे शिक्षणाचा बाजार मांडणाऱ्या संस्थाचालक आणि सं...

शिक्षणक्षेत्रात आदर्श संस्था अ,शी, मंडळ धुळे संचलित शिक्षण महर्षी प्रा, भाई साहेब गो,हू, महाजन व शी,ल, माळी कनिष्ठ विद्यालयाचा आज ५५ वा वर्धापनदिन

Image
 *अध्यापक शिक्षण मंडळ  वर्धापन दिनाचा शुभेच्छा..!!*          *आज ५ सप्टेंबर*    *डाँ सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती*,      *"राष्ट्रीय शिक्षक दिन"*             आणि    *अध्यापक शिक्षण मंडळ या संस्थेच्या स्थापना दिवस* *कै. प्राचार्य भाईसाहेब गो.हु. महाजन* यांनी याच शुभ दिवशी    म्हणजेच *५ सप्टेंबर १९६५* रोजी थोर शिक्षणतज्ञ बा.ग जगताप यांच्या हस्ते      अध्यापक शिक्षण मंडळ या शिक्षण संस्थेची स्थापना केली. "कसेल त्याची जमीन, पिकवेल त्याच्या मळा आणि शिकवेल त्याची शाळा" या आगळ्यावेगळ्या तत्वानुसार शिक्षण संस्था स्थापन करून शिक्षणाची ज्ञानगंगा गरिबांच्या दारापर्यंत पोहोचवण्याचे महान कार्य करणाऱ्या भाईसाहेबांना विनम्र वंदन.        कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 'कमवा आणि शिका' तत्त्वातून प्रेरणा घेऊन सातपुडा पर्वताच्या परिसरातील दीनदलित,आदिवासी मुलांची शिक्षणाची सोय भाईसाहेबांनी करून दिली. एकीकडे शिक्षणाचा बाजार मांडणाऱ्या संस्थाचालक आणि सं...