सातपुड्याच्या उंच टेकड्यामध्ये प्यारागेयडिंगचा प्रयोग !!!

 सातपुड्याच्या उंच टेकड्यामध्ये प्यारागेयडिंगचा प्रयोग !!!


 ते कोण होते ते अजूनही गुलदस्तात ?




कालिचरण सूर्यवंशी/तळोदा :  

                  सातपुड्याच्या दुर्गम भागात  धडगाव  तालुक्यातील राजबर्डी भागात   काकरदा च्या एक उंच टेकडीवरून  सोबत काही साहित्य  घेऊन एक माणूस   खोल दरीत  अचानक उडी घेतो हे पाहताच तरुणांचा एकच गल्ला होतो,  मात्र क्षणार्थत दिसेनासा होणारा तो माणूस हवेत पक्षी सारखा उडू लागतो हे पाहताच तरुण बुचळल्यात पडतात  हळूहळू पक्षा प्रमाणे उडणारा तो  माणूस खाली उतरतो  त्यांचा  वैमानिक  सारखा ड्रेस पाहून काही वेळ कोणीही त्याचा जवळपास जात नाही, मात्र सदर व्यक्ती हिंदी तुन बोलू लागल्या नंतर मात्र सवांदास सुरुवात होते.


 हा प्रसंग आहे  धडगाव

तालुक्यातील  दुर्गम राजबर्डी भागातील  या ठिकाणी  काही  हौशी प्यारा ग्लाआईड करणारे व्यक्ती या ठिकाणी आले होते सोबत तीन चार लोक होते. याचा व्हिडीओ शूट एक तरुणाने केला असून त्याने तो सोशल मीडियावर व्हायरल केला होता या बाबतीत अधिक तपास काढला असता प्रत्यक्ष दर्शी कडून हि माहिती देण्यात आली असून त्याने सांगितले  की  काही व्यक्ती आले होते  ते पंजाब भागातून आले होते त्यांचा उद्देश काय ते माहीत नाही मात्र त्यांच्याशी चर्चा केल्यावर त्या व्यक्तींनी सांगतील की आम्ही पंजाब  मधील असून   पंचगणी महाबळेश्वर, सापुतारा भागात  प्यारा ग्लाआईड करतो  मात्र सदर व्यक्तीचे नाव व संस्थेचे नाव कळू शकले नाही मात्र सातपुड्याच्या दुर्गम भागात उंच टेकड्या असून तिकडे कसा अनुभव असेल या दृष्टीने ते या ठिकाणी आल्याचे समजते.



ते कोण होते ते अजूनही गुलदस्त्यात ? 

            दरम्यान,अतिदुर्गम भागात  सातपुड्याच आकर्षण असल्यामुळे ते या ठिकाणी आले की  या भागात प्रशिक्षण केंद्र उभारणीसाठी काही नियोजन  सुरू आहे याची प्राथमिक चाचणी घेण्यासाठी ते आलेत हे दुर्देवाने कळू शकले नाही कारण की ज्या गावात ते उतरले त्या ठिकाणी तरुणांनी फक्ट व्हिडीओ काढला ना त्यांचा नंबर घेतला न इतर विचारपूस अर्थात  त्यांचा साठी तो एक फक्ट बाहेरून कोणीतरी आलेला व्यक्ती असेल  म्हणून इतर विचारपूस केली नाही.मात्र, सदर व्यक्ती हिंदीत बोलत असताना व्हिडिओत बोलत आहेत की.

  

.........पहिली बार देखा क्या ?

        त्यावर व्हिडीओ शूट करणारा तरुण म्हणतो टीव्ही मे देखा हे लेकींन वास्तव  मे नही 

 त्यावर पाहुणा उत्तरला की  महाबळेश्वर, पांचगणी, व  सापुतारा या ठिकाणी नेहमी  हे सूरु असत   तसेच त्या अनाहूत पाहुण्याने विचारले की हे कोणतं राज्य आहे यावर तरुण उत्तर दिल की महाराष्ट  इतका संवाद दोघा मध्ये झाला आहे,

  त्यामुळे नेमकं उद्देश काय हे समजू शकल नाही तरीही सदर व्यक्ती प्रौढ दिसत असून अभ्यासू उच्च शिक्षित व होशी दिसून येतो , व  उत्कंठा पोटी सातपुड्याच्या दुर्गम भागात आलेला दिसतो या ठिकानी त्याने  हवेत फेरी घेतल्या नंतर त्यांन या भागात निवास साठी जागा वैगरे आहे का ? आम्हला मुक्काम करायाचा आहे याबद्दल विचारलं व इतर उंच टेकड्या कुठं आहेत अशी विचारणा केली यावर तरुणाने त्यांना तीनस माळ बद्दल माहिती दिली त्या नंतर ते एक जीप मध्ये दोघ तिघे जणांनी धडगाव कडे कूच केली,


 तोरणमाळ ते धडगाव पट्टा या खेळासाठी आदर्श ठिकाण - 

दरम्यान  सातपुड्याच्या विस्तीर्ण भागात धडगाव तालुक्यातील तोरणमाळ ते धडगाव भागत अनेक ठिकाणी उंच टेकड्या असून ज्या ठिकाणी या साहसी खेळ साठी आदर्श अशी जागा आहे हवेचा अधिक दाब व अफाट उंची हे या भागाचे वैशिष्ठ आहे कदाचित त्या मुळेच प्राप्त माहिती घेऊन ते या भागात साहसी उडी चा अनुभव घेण्यासाठी आले असावेत असा कयास लावला जात आहे.


  या खेळ बद्दल माहिती -

हवेचा दाब या खेळाच्या महत्त्वाचा दुवा असून  हवा या खेळाची रंगत अधिक वाढतो च कसलेला खेळाडूंना तोंल सांभाळून कौशल्य दाखवावे लागते हवेची दिशा वेग आणि वातावरण तापमान यावर किती उंचीवर उडवायचे हे ठरवत असतो समुद्रसपाटीपासून दीड हजार मीटर  उंचावर जाता येत दहा ते पंधरा मिनिटांचे हवेतील ही सफर घेता येते प्रशिक्षक खेळाडू दोन ते चार तास ही सफर करू शकतो हा खेळ असून तितकाच धोकेदायक देखील आहे, अनेकांना या जीव देखील गमवावा लागला आहे

           एकटय़ाने पॅराग्लायडिंगच्या साहाय्याने आकाशात उड्डाण घेणो (सोलो फ्लाइंग), प्रशिक्षकासोबत दुस:या व्यक्तीला घेऊन आकाशात उड्डाण घेणो (टॅडम फ्लाइंग) अशा दोन प्रकारचे प्रशिक्षण घेतले जाते.पॅराग्लायडिंगच्या स्पर्धा विविध देशांत घेतल्या जात असून, भारतात हिमाचल प्रदेशात दर वर्षी ऑक्टोबर व नोव्हेंबरमध्ये स्पर्धा घेण्यात येतात. ठरावीक अंतरावर पॅराग्लायडिंगच्या साहाय्याने उतरणो. आकाशात गिरक्या घेणो व ठरावीक जागेवर उतरणो या तीन प्रकारच्या स्पर्धा घेण्यात येतात.पॅराग्लायडिंग प्रशिक्षिण  वायुदलाचे जवान प्रशिक्षण ठिकाणी  देखील महत्वाचे असते...





          या ठिकाणी  राजबर्डी ग्राम पंचायत अंतर्गत येणाऱ्या काकरदा भागातील उंच टेकडीवर  त्यांनी हा साहसी खेळ केला असून  सदर व्यक्ती हिंदी भाषिक होते व  पंजाब प्रांत मधून आले असल्याचे सांगत होते , भाषेची अडचण मूळ अधिक संवाद होवू शकला नाही, 

                        प्रवीण पावरा,धडगाव

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

शहादा मतदार संघात 69.01 टक्के मतदान

शहादा-तळोदा मतदार संघाचा निवडणूक अंदाज लावणे अवघड निकालाची उत्सुकता शिगेला...!

शहर अध्यक्ष म्हणतात भाजप मध्ये आता सर्व दुकान एकत्रित.....,पण भाजप मध्ये असलेल्या चार दुकानांचे काय ?