व्यापारी संकुलावर कोणाचा डोळा ?
गाळे लिलावावर कोणाचा डोळा ?"
प्रतिनिधी तळोदा
तळोदा पालिकेचा माध्यमातून बांधण्यात आलेल्या बहुचर्चित व्यापारी संकुलाच्या लिलाव प्रक्रिया पार पडत असून एकूण १२७ गाळे लिलावात राहणार असतील या मूळ तळोदा शहरातील अनेक किरकोळ व्यवसायिकांना हक्काचे दुकान उपलब्द होऊन सोय होणार आहे , या मूळ पालिकेचा उत्पन्नात भर पडणार आहे, असे असले तरी
या गाळ्यांचा लिलाव करत असताना रस्त्याच्या लागून पुढे असणारे काही गाळे लिलावात नसल्याचे सूत्र कडून माहिती मिळाली आहे ,
दरम्यान हे गाळे लिलावात का नाहीत ? या बद्दल आता उलट सुलट चर्चा होत असून पालिका बांधकाम विभागाच्या म्हणयानुसार न्यायालया बद्दल आता कोणतेही अडचण नाही ,
मात्र रस्त्यालगत असणाऱ्या खालच्या मजल्यावर मोक्याच्या जागेचा लिलाव यात नाही या बाबतीत अधिक माहिती घेतली असता एक लाखाचा वर असणाऱ्या गाळ्यांचा असा ऑन लाईन लिलाव होऊ शकतो असे प्रशासन कडून सांगण्यात आले
सदर व्यापारी गाळे ज्या बांधकाम ठेकेदारास काम देण्यात आले होते त्याच बिल अजूनही थकीत असल्याने हस्तांतरण पालिका प्रशासन कडे अजूनही झालेले नाही
लिलावात बोलते धनी दुसरेच असण्याची भीती -
दरम्यान लिलाव प्रक्रियेत मागील अनुभव पाहता शहरातील धन दांडगे व्यापारी व राजकिय पार्श्वभूमी असणारे यांचा या गाळ्यांवर डोळा त्यांचा माध्यमातून कोणातरी दुसराच लिलावात सहभागी होऊन बोली लावेल अशी भीती बेरोजगार किरकोळ व्यवसाय करणारे तरुण बेरोजगार तरुणांना गरज आहे , ते वंचित राहण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे,
पालिका संकुलात अवैध धंद्यांसाठी मोक्याची जागा -
पालिकेचा व्यपारी संकुलात आज देखील अवैध व्यवसाय सुरू असून हा भाग मुख्य बाजारपेठ ला लागून असला तरी कोपऱ्यात असणाऱ्या दुकानात अवैध व्यवसाय सुरू करण्यासाठी अत्यंत मोक्याची जागा आहे त्यामुळं इथं देखील बोलीत त्यांचाच दबदबा राहण्याची चर्चा व्यपारी वर्गात आहे
Comments
Post a Comment