अनेकांचा अरुणोदय करणारे आदरणीय भाऊ,,,
आजात शत्रू
मृदुस्वाभाव, मितभाषी ,अजातशत्रू ,आबालवृद्धांना हवेहवेसे ,सर्वस्पर्शी ,सामाजिक बांधिलकी असणारे ,निसर्गमित्र,प्राण्यांवर भूतदया असणारे,हौशी व मित्रांमध्ये रमणारे भाऊ अशी ज्यांची ओळख असे आमचे आधारस्तंभ, पाठीवर कौतुकाची थाप मारून लढ म्हणणारे व जिंकण्यासाठी सतत बळ वाढवून प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणजेच श्री अरुण कुमार गोरखनाथ महाजन तारुण्यात अपार कष्ट व लोकसंपर्क वाढवून ,आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अनुभवातून आम्हाला मार्गदर्शन करताना भाऊ आम्हाला एक दीपस्तंभ भासतात व दिशाहीन व निराश जहालेल्या ना यशाचा मार्ग दाखवतात हेच त्यांचे मोठेपण
*आदरणीय आमचे भाऊ*
अध्यापक शिक्षक मंडळ धुळे - नंदुरबार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिक्षण महर्षी प्राचार्य भाई साहेब गो,हू,महाजन यांच्या कुटुंबातील जेष्ठ सदस्य म्हणून त्यांची ओळख असली तरी
भाई साहेबांच अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी विद्यमान अध्यक्षा सौ, मंगलाताई महाजन यांच्या पाठीमागे नव्हे तर सोबत उभं राहून या वटवृक्षाचा विस्तार अधिक मोठा करण्यात भाऊंचा सिहांचा वाटा आहे,
सहा शाखेचा मोठा व्याप असला तरी भाऊंनी स्व,भाई साहेबांचा आदर्श ठेवत मुख्यद्यापक असो शिक्षक लिपिक असो अगदी शिपाई जवळ देखील संस्थेच्या कोणत्याही शाखेला भेट दिली तरी आस्थेने त्यांची व त्यांचा कुटुंबातील जेष्ठ सदस्यांची तब्येतीची विचारपूस करणे हा त्यांची स्थायी स्वभाव त्यामुळेच कर्मचारीचे देखील त्यांच्याशी भावनिक नात जुळलं आहे,
आदरणीय भाई साहेबांचा संघर्षाचा काळात म्हणजेच संस्था उभारणी व विस्तार करतांना अरुण भाऊ सतत त्यांचा सोबत सावली सारखे असायचे त्यामुळे भाऊंना प्रत्येक शाखेचे बालपण व विस्तार यांचा संपूर्ण इतिहास माहीत आहे नव्हे तर ते संस्थेच्या उभारणीत ज्यांनी ज्यांनी स्थानिक पातळीवर सहकार्य केले परिश्रम घेतले यांचे ते स्वतः साक्षीदार आहेत,
असंख्य आजी माजी कर्मचारी आजही भाऊंना भेटतात जुन्या आठवनी ना उजाळा देतात,
आज संस्थेच्या विकास आणि विस्तार धुळे व नंदुरबार जिल्हात झाला आहे, त्यात विद्यमान अध्यक्षा सौ, मंगलाताई महाजन यांच्या सोबतच भाऊंचा देखील मार्गदर्शन मोलाचे ठरले आहे
भाऊंनी अनेक निराधार लोकांना आधार दिला असून अश्या आधारस्तंभास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा,,,,
कालीचरण सूर्यवंशी
Comments
Post a Comment