सरपंच निवडणूक कडे लक्ष लागून
ग्राम पंचायत निवडणुकी नंतर सदस्य अज्ञात स्थळी रवाना
नुकत्याच पार पडलेल्या तळोदा तालुक्यातील ग्राम पंचायत निवडणुकी मध्ये विजयी झालेले काही ग्राम पंचायत चे सदस्य सरपंच पदाचे आरक्षण सोडत (पुरुष) (महिला) कोणती राहिल हे उघण्यापूर्वीच पूर्वी अज्ञात स्थळी रवाना झाले असून सरपंच पदाची निवड कधी होईल हे अद्याप स्पष्ट नसले तरी आता पासून वरिष्ठ पातळीवरून या बाबत दक्षता बाळगली जात आहे,
तळोदा तालुक्यातील सात ग्राम पंचायत च्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून
*सरदार नगर* *राणीपुर*
*पाडळपूर* *नर्मदानगर*
*रोझवा पुनर्वसन*
*ग्रामपंचायत रेवानगर*
*बंधारा* या ग्राम पंचायत मध्ये सरपंच कोण बसतो या कडे लक्ष लागून आहे,
*चार ग्रामपंचायतीवर काँग्रेसचा दावा*
तळोदा तालुक्यात काँग्रेसने नर्मदानगर, रेवानगर, बंधारा, पाडळपुर या चार ग्रामपंचायतीवर काँग्रेसने दावा केला आहे. निकाल नंतर माजी मंत्री पद्माकर वळवी अ काँग्रेसला बहुमत दिले आहे व इतर ग्राम पंचायतीत काही फरकाने उमेदवार पराभव झाला आहेत तर काही सदस्य निवडून आले आहेत. तर भाजप कडून देखील या बाबतीत दावा करण्यात आला असून पाडळपूर ग्राम पंचायत सह चार ग्राम पंचायत वर भाजपचा दावा आहे
दावे प्रतिदावे
या बाबतीत काँग्रेस व भाजप कडून विविध ग्राम पंचायत वर दावे केलं जातं असून सरपंच आरक्षण सोडती नंतर सरपंच कोण बसत यांवर सर्व दावे प्रतिदावे कोणाचे किती तसेच सरपंच निवडून आल्या नंतर ते कोणत्या नेत्याचा आशीर्वाद घेण्यासाठी जातात व फोटो काढतात त्या नंतर चित्र स्पष्ट होणार आहे,
आरक्षण कडे लक्ष लागून -
तालुक्यातील सात हि ग्राम पंचायत मध्ये अगोदर पासूनच एस,टी, राखीव आरक्षण असले तरीही पुरुष व महिला असे आरक्षण अजुन निघाले नसून येत्या चार तारखेला ते उघडणार आहे, त्या नंतर विजेत्या सदस्य पैकी कोणत्या सदस्याला उमेदवारी दाखल करावयाची याच नोयोजन केलं जाणार आहे
प्रमुख पक्ष काँग्रेस भाजपच -
दरम्यान निवडणूक होत असताना एकंदरीत पाहता भाजप काँग्रेस प्रमुख पक्ष लढताना दिसून आले आहेत,
म,हा,विकास आघाडी बद्दल जरी सांगतील जात असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना चा व इतर पक्षाचा प्रभाव या सात ग्राम पांचायत मध्ये दिसून आलेला नाही,
त्यामुळे आता भाजप काँग्रेस यांच्यात वरचढ कोण हे सरपंच निवडणुकी नंतरच कळेल सध्या तरी सर्वांचे लक्ष आरक्षण कडे लागून आहे
: पाडळपूर ग्राम पंचायत सदस्य अज्ञात स्थळी रवाना -
दरम्यान निवडणुकी निकाल नंतर पाडळपूर ग्राम पंचायत निवडणुकी नंतर भाजप व काँग्रेस कडून दावा केला जात असल्याने सदस्य अज्ञात स्थळी रवाना असल्याचे बोलले जाते ,
त्यामुळं ग्रामीण भागात चर्चेस उधाण आले आहे
Comments
Post a Comment