अंकलेश्वर बऱ्हाणपूर मार्गाला राष्ट्रीय महामार्ग दर्जा द्या,,,, रक्षताई खडसे यांची मागणी

अंकलेश्वर बऱ्हाणपूर राज्य महामार्गाचे रूपांतर राष्ट्रीय महामार्गात करण्यात यावे यासाठी रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री ना.नितीनजी गडकरी यांच्याकडे मागणी.खासदार रक्षा खड़से.

अंकलेश्वर-बऱ्हाणपूर राज्य महामार्गाचे भाग्य उजळणार.. 
-बऱ्हाणपूर हा रावेर लोकसभा क्षेत्रातील शेती पट्ट्यातील अत्यंत महत्वपूर्ण मार्ग असून  गुजरात, महाराष्ट्र, मध्यप्रदेश राज्यातील वाहतूक सुरू असते. केळी व कापूस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या जास्त असल्याने या मालाची वाहतूक मोठ्या प्रमाणावर होते. 
तळोदा  शहादा तालुक्यातील शेतकरी ना सुद्धा याचा फटका बसत असून त्याच सोबत खाजगी वाहन चालकांना  बसेस यांचे देखील हाल होत आहेत
 निधीची कमतरता भासत असल्यामुळे नियमित दुरुस्ती व देखभाल होत नाही. ज्यामुळे रस्त्याची दुर्दशा होत आहे. गंभीर अपघात झाल्यामुळे जीवितहानी सोबत मालाचे नुकसान होते. खराब रस्त्यांमुळे वाहनांचे नुकसान होते आहे. हा राज्य महामार्ग जर राष्ट्रीय महामार्गात रूपांतर करण्यात आल्यास केंद्राकडून नवीन पद्धतीने व आधुनिक मशिनरीच्या साहाय्याने चौपदरीकरण बांधकाम करण्यासाठी निधी उपलब्ध होईल. 
 
हे निवेदन रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयचे सचिव श्री गिरधर अरमाने यांनी स्वीकारले व अंकलेश्वर - बऱ्हाणपूर राज्य महामार्गाचे अवलोकन करून कमीत कमी दोनपदरी सिमेंट काँक्रीटीकरण करण्याचे आश्वासन खासदार रक्षाताई खडसे यांना दिले.

Comments

Popular posts from this blog

शहादा मतदार संघात 69.01 टक्के मतदान

शहादा-तळोदा मतदार संघाचा निवडणूक अंदाज लावणे अवघड निकालाची उत्सुकता शिगेला...!

शहर अध्यक्ष म्हणतात भाजप मध्ये आता सर्व दुकान एकत्रित.....,पण भाजप मध्ये असलेल्या चार दुकानांचे काय ?