पानांचा सोबत दुसऱ्यांच्या जीवनात रंग भरणारा मित्रांचा सदैव स्मृतीराहणारा स्व, राजेश उर्फ बंडू पाटील ,,,आज सहावा स्मृतिदिन

एक आठवण बंडू ची !
     तळोदे शहरातील मुख्य बाजारपेठे तील स्मारक चौकात असणारी   पानदुकान,  " राजेश पान सेंटर "
आजही , अनेक तळोदेकरांचा मनात घर करून आहे...ते फक्त बंडूमुळेच..
        शाळकरी वयातच बंडू ने पानटपरी  चालवणे सुरू केले .आणि थोड्या च कालावधीत , आपली मेहनत, जिद्द, चिकाटीने टपरी चा विस्तार केला.....
        हातमजूर ते ठेकेदार, काँट्रॅक्टर, राजकीय,  सामाजिक क्षेत्रातील अनेक लोकांची ती एक हक्काची पान टपरी होती .   अनेकांना रात्री बंडूच्या  हातून पान, घुटका खाल्ल्या शिवाय झोप लागत नसे.
   बंडू च्या टपरी वरील कलकत्ता मिठा पान खाने म्हणजे प्रतिष्ठेचे लक्षण होत...
        बंडू ची स्मरणशक्ती जबर होती ..गिर्हाइकाची पंसद माहित असे, नुसती  सावली बघून  मनासारखे पान, घुटका समोर मांडत असे .
      नंदुरबार ते सुरत पट्ट्यातील अनेक पान गादी वाले बंडू चे मित्र होते त्यांच्या कडून टपरीवर लागणाररी उच्च दर्जाची  पाने मागवित असत.
        मधल्या काळात . बंडूने पान टपरी सांभाळतच आँडीयो कँसेट, अगरबत्ती विक्री चा जोडधंदा सुरू केला .सकाळी व सायंकाळी 7 च्या सुमारास सुगंधित अगरबत्ती लावून दुकाना चा परिसर पवित्र करुन मंद सुरात भक्तीगीते, भावगीते लावण्या चा बंडूस छंद होता...
       सिनेमा गीत, सुफी संताची कव्वाली, येणारे सण- उत्सव, ..होळी , नवरात्र, गणेशोत्सव यांची गीते आधी वाजवून वातावरण निर्माण करी.
   लावणी साम्राज्ञी सुरेखा पुणेकरांची  ...  ..".या रावजी बसा भावजी ..." ही लावणी ऐकावी तर बंडूकडेच   ! रात्री आपल्या अनेक प्रेमात पडलेल्या मित्रांना' ' मुकेश के  दर्द भरे गीत ' ऐकवीत असे.
   बंडू ला व्यायामाची  आवड होती..
कसदार शरीर लाभलेला बंडू इतरांना व्यायामाचे महत्व पटवून देत असे..तसेच.शहरातील अनेक क्रिडा स्पर्धां ना बक्षिसे देत असे...
     अनेक लोकांना ,रस्त्यावर पायी  चालत येणारा बंडू ओळखला जात नसे ; इतकी सवय लाकडाच्या कोनाड्यात पाय टाकून बसलेला बंडू पाहण्याची झाली होती ...
          आपल्या पाना ने लोकांची तोंडे  लाल करणारा बंडू प्रत्यक्षात हळव्या मना चा होता , कधी ही कोणाला वाइट उद्देशून बोलत नसे..दोन दोन वर्षे उधारी थकवणारे, बुडवणारे किंवा पान खाऊन पहिली पिचकारी त्याचाच दुकाना समोर मारणारे याचांशी  साधी हुज्जत ही घालत नसे....

       तळोदेकरांचा बंडू ला अखेरचा प्रणाम..

Comments

Popular posts from this blog

शहादा मतदार संघात 69.01 टक्के मतदान

शहादा-तळोदा मतदार संघाचा निवडणूक अंदाज लावणे अवघड निकालाची उत्सुकता शिगेला...!

शहर अध्यक्ष म्हणतात भाजप मध्ये आता सर्व दुकान एकत्रित.....,पण भाजप मध्ये असलेल्या चार दुकानांचे काय ?