तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार राजेश पाडवी सभापती तर राष्ट्रवादी काँग्रेस चे हितेंद्र क्षत्रिय उप सभापतीपदी

तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार राजेश पाडवी सभापती तर राष्ट्रवादी काँग्रेस चे हितेंद्र क्षत्रिय उप सभापतीपदी

तळोदा : कृषी उत्पन्न बाजार समिती बिनविरोध झाली असून आज सभापती व उपसभापती बाबत  निवडणूक घेण्यात आली .  
दरम्यान  भाजप व राष्ट्रवादी यांची युती या ठिकाणी पाहायला मिळाली बिनविरोध पार पडलेल्या या निवडणुकीत आमदार राजेश पाडवी व माजी आमदार उदेसिंग पाडवी यांच्यात राजकीय समन्वय प्रथमच पाहायला मिळाला असल्याने दोघ पिता व पुत्र मधील राजकीय तणाव संपले असल्याचे उघड झाले आहे .
या निवडणुकीत आमदार राजेश पाडवी सभापती तर राष्ट्रवादी काँग्रेसचे हितेंद्र क्षत्रिय उप सभापती पदावर निवड करण्यात आली. बाजार समितीची इमारतीत या वेळी संचालक मंडळ उपस्थित होते.




 सर्व पक्षीय फॉर्म्युला असा ठरला -
भाजप ९ राष्ट्रवादी काँग्रेस ६ शिवसेना १ ठाकरे सेना १   काँग्रेस १
या निर्णयात  आमदार राजेश पाडवी माजी आमदार उदेसिंग पाडवी माजी मंत्री पदमाकर वळवी.  आमदार आमश्या पाडवी  माजी नगरअध्यक्ष भरत माळी अश्या सर्व पक्षीय नेत्यांची भूमिका अत्यंत महत्वाची होती. असे असले तरी बाजार समितीचा  मागील इतिहास पाहता माजी आमदार उदेसिंग पाडवी आमदार राजेश पाडवी यांच्या सोबतच भरत माळी यांनी नुकताच भाजप प्रवेश केल्याने त्याचा फायदा भाजप गटला झाल्याने निवडणूक बिनविरोध झाली.

 अनेक ज्येष्ठांना डावलून हितेंद्र क्षत्रिय यांना उप सभापती पद ? - 
तळोदा  बाजार समिती निवडणुकीत संचालक पदी वर्णी लागावी यासाठी अनेक दिग्गजांनी फिल्डीग लावली होती . असे असताना तरुणाला उप सभापती पद देण्याचा मागील   करणे पाहता माजी आमदार उदेसिंग पाडवी यांचा नंदुरबार विधानसभा पराभव झाल्या नंतर भाजप सोडल्याने ते एकाकी पडले होते अश्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचा माध्यमातून संदीप परदेशी. हितेंद्र क्षत्रिय. योगेश मराठे यांनी  त्यांना मोलाची साथ देत राजकीय  वर्तुळ टिकवून ठेवले याची जाण ठेवत उदेसिंग पाडवी यांनी राष्ट्रवादी कोट्यातून त्यांना उपसभापती पद देवून त्यांची साथ देणाऱ्याची ते साथ सोडत नाहीत हे दाखवून दिले.

 भाजपचे सहकारी संस्था सर्वसाधारण प्रवर्गातून  
योगेश प्रभाकर चौधरी, 
कल्पेश धरमदास माळी, 
प्रकाश श्रीराम माळी, 
मराठे अमृत तुकाराम
महिला राखीव प्रवर्गातून कल्पनाबेन रघुवीर चौधरी
सहकारी संस्था इतर मागास प्रवर्गातून 
शशिकांत जगन्नाथ वाणी, 
अनुसूचित जमाती प्रवर्गातून आमदार राजेश उदेसिंग पाडवी
ग्रामपंचायत गटातून सर्वसाधारण प्रवर्गातून 
नीरज सुरेश पाटील 
ग्रामपंचायत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातून 
सत्तरसिंग भीमसिंग राजपूत असे ९ तरराष्ट्रवादी काँग्रेसचे सहकारी संस्था सर्वसाधारण प्रवर्गातून  सुरेश झगडू इंद्रजित,
हितेंद्र सरवनसिंग क्षत्रिय, 
सहकारी संस्था महिला राखीव प्रवर्गातून 
लताबाई प्रल्हाद मराठे,
ग्रामपंचायत सर्वसाधारण प्रवर्गातून 
अमोल प्रल्हाद भारती
आडते प्रवर्गातून -
निखीलकुमार नेमीचंद तुरखीया
हमाल व तोलारी प्रवर्गातून 
रविंद्र सदाशिव गाडे
शिवसेना उद्धव गट -
रेखा रमेश माळी
शिवसेना शिंदे गट -
गौतमचंद अनोपंचंद जैन
काँग्रेस -अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून 
रोहिदास शामा पाडवी

 तळोदा पालिकेतील राजकीय समीकरण बदलणार ?
बाजार समिती  बिनविरोध नंतर आता पालिका देखील बिनविरोध करणार असल्याचे माजी आमदार उदेसिंग पाडवी यांनी सांगितले असल्याने भाजप मधील काही इचुकांचा पोटात गोळा उठला असून त्याला कारण देखील तसेच असून भाजप कडे विविध नेत्यांचा यादी पाहिल्यास ६० उमेदवार पेक्षा नगरसेवक पदासाठी इच्छुक असतील तळोदा बाजार समिती आणि पालिका राजकारण खूप वेगळे असून आजची स्थिती पाहता निवडणूक होणारच असे असले तरी भाजप राष्ट्रवादी सोबत जाण्याचे संकेत प्राप्त होत आहेत.

Comments

Popular posts from this blog

शहादा-तळोदा मतदार संघाचा निवडणूक अंदाज लावणे अवघड निकालाची उत्सुकता शिगेला...!

शहादा मतदार संघात 69.01 टक्के मतदान