भाजपपेक्षा काँग्रेसचे नेते राष्ट्रवादीत जाण्यासाठी उत्साही....?
तळोदा / प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा सह तळोदा शहर व तालुक्यातील मधील भाजप अंतर्गत लाथाळ्या सर्वश्रुत असतांना खान्देश मधील भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ राव खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश नंतर पक्षाचे सर्व्हसर्वा पवार साहेबांनी उत्तर महाराष्ट्रात मरगळ आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस ला गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी स्वतः एकनाथराव खडसे प्रत्येक तालुक्यात भेटी देऊन भाजप मधील जुन्या कार्यकर्ते व काही काँग्रेस मधील नाराज स्थानिक नेते बडे नेते आपल्या कडे कसे येतील या करिता प्रयत्न करतील मात्र त्या पूर्वीच काहींनी स्वतः नाथाभाऊंशी तळोदा इथं भव्य कार्यक्रम लवकरच होणार असल्याचे खात्रीशीर वृत्त असून डिसेंबर जानेवारीत नंदुरबार , शहादा ,तळोदा, मोलगी, अक्कलकुवा, या ठिकाणी मेळावे घेऊन यावेळी राष्ट्रवादीत अनेकांचे प्रवेश होणार आहेत, यात तलोद्यातील
भाजाप पदाधिकारी, काँग्रेस पदाधिकारी, प्रवेश करणार आहेत,
त्यात फक्ट खडसे साहेबां बद्दल प्रेम हे कारण नसून अनेकांचे विविध कारण आहेत,
काँग्रेस संघटन पूर्वी प्रमाणे सक्रिय नसून त्याचा फटका विधानसभा निवडणुकीत काँग्रेस ला बसला आहे, त्यामुळं एकंदीतर तालुक्यातील काही नेते पक्ष बद्दल नाराज आहेत, तर भाजप मधील नवीन व जुने संघर्ष मूळ पोळले गेलेले काही भाजप चे दुर्लक्षित नेते यांचा प्रवेश निश्चित समजला जात आहे,
दादा हि टर्म होऊन जाऊ द्या बस -
तलोद्यातील काही नगरसेवकांचा गुप्त भेटी झाल्याची चर्चा असून माजी आमदार उदयसिंग पाडवी यांची भेट घेऊन प्राथमिक चर्चा केली आहे, पालिका निवडणुकीत उदयसिंग पाडवी यांच्या नेतृत्वात निवडून आलेले व जवळीक असलेले काही नगरसेवक पक्ष चिन्हवर निवडणुक लढवली असल्याने गट स्थापन करून प्रवेश करावा की टर्म पूर्ण करावी याची खलबते सुरू आहेत,
शहाद्यातील दोन दिगग्ज संपर्कात ? -
दरम्यान नेहमी सोयी प्रमाणे प्रवेश सर्वत्र सुरू असतांना सध्या आहे त्या पक्षात आपलं अस्तित्व शोधत असताना आपला व्यक्तिगत फायदा कुठं होईल का ? या उद्देशाने व शहादा पालिका निवडणूक पाहता या दिगग्ज नेत्यांनी राष्ट्रवादी शी संपर्क ठेवायला सुरवात केली असून,
एकंदिरत हा प्रवेश खडसे साहेबांचा प्रेम पोटी की स्वतःचा अस्तित्वा साठी या बाबत आता चर्चेस उत आले आहे ? याची देखील चर्चा रंगत आहे,
काँग्रेस पदअधिकारी कडून सोशल मीडियावर नाथाभाऊ बद्दल प्रेम ओसंडून वाहू लागले-
नाथाभावूचा प्रवेश पूर्वी व प्रवेश नंतर व अपघाताच्या दिवशी एकंदीतर तलोद्यातील नगरसेवकांनी तिन्ही वेळा संवेदना व्यक्त केला या बाबत त्यांनी राज्यसरकार मधील आघाडीचा दुवा समोर ठेवला असे असले तरी कुठंतरी सुप्त इच्छा राष्ट्रवादीत जाण्याची अगोदर पासून काही नगरसेवकांची इच्छा असून विधानसभा निवडणुकीत व पालिकेतील निवडणुकीत काँग्रेस पक्षश्रेष्ठीं कडून झालेलं दुर्लक्ष तसेच जिल्हातील गटबाजी यामुळे आवश्यक त्या वेळी सांम, दाम ,दंड,भेद, या विविध पातळीवर स्थानिक काँग्रेस च्या काही नेत्यांची नाराजी दिसून येते त्यामुळे भाजपात नाही तर त्या पेक्षा अधिक काँग्रेस पक्षला येणाऱ्या काळात मोठे भगदाड पडण्याची चिन्ह आहे, निमित्त मात्र एकनाथराव खडसे राहतील.गृहमंत्री यांचा शहादा येथील दोरा हा शासकीय असल्याने प्रवेश कार्यक्रम पूढे ढकलन्यात आला असल्याचेही समजते....
सोशल मीडिया प्रेम😀😀
ReplyDelete