राजकारण बाजूला अगोदर मैत्री

तलोद्यात पोलिसांनी निभावली वन विभागाची भुमीका बिबट्याला पळविले राजकारण बाजूला अगोदर मैत्री बिबट्याला घाबरून झाडावर चढेलेल्या माजी नगरसेवकाना उतरविण्यासाठी गेले नगराध्यक्ष कालीचरण सूर्यवंशी/तळोदा धडगाव तालुक्यातील येथील कुंबी येथील नातेवाईक तळोदात आल्याने त्यांना भेटण्यासाठी चिनोदा शिवारातील शेतात गेलेल्या तळोद्याचे माजी नगरसेवक तथा शिवसेनेचे जेष्ठ नेते रूपसिंग पाडवी यांना चक्क तीन बिबट्याचे दर्शन झाले. तीघा बिबट्याना पाहून भेदरलेल्या पाडवी यांनी स्वतःच्या व नातेवाईकांच्या बचावासाठी झाडावर तयार केलेल्या मचाणावर चढले. त्यांना उतरविण्यासाठी थेट तळोद्याचे नगरसेवक अजय परदेशी व इतर यंत्रणा घटनास्थळी पोहचले व त्यानंतर पाडवी यांना झाडावरून खाली उतरले. याबाबत सविस्तर माहिती अशी की तळोद्याचे माजी नगरसेवक तथा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रुपसिंग बिरबा पाडवी याचे मूळ गाव धडगाव तालुक्यातील कुंबी येथील नातेवाईकाना मजुरांना व इतर नातेवाईकांना भेटण्यासाठी तालुक्यातील चिनोदा येथे संध्याकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान गेले होते. दरम्यान...