वाळू वाहतुकीबाबत प्रशासन व लोकप्रतिनिधीयांनी चिंतन करून निर्णय घेण्याची गरज

वाळू वाहतुकीबाबत प्रशासन व लोकप्रतिनिधीयांनी चिंतन करून निर्णय घेण्याची गरज कालीचरण सूर्यवंशी/ तळोदा: तळोदा नंदुरबार रस्त्यावर वाळू वाह तूक विषय आता नवीन राहिला नसून अनेक तक्रार होऊन देखील हि वाहतूक काही केल्या शिस्तबद्ध होत नाही. प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी याबाबत चिंतन करून निर्णय घेण्याची गरज निर्माण झाली आहे. तळोदा कडून नंदुरबार जात असतांना नंदुरबार प्रांत अधिकारी वसुमना पंत यांच्या शासकीय वाहनाला एका मद्यपी ट्रक चालकाने कट मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे, मंगळवारी सकाळी १०,३० वाजेच्या सुमारास तळोदा येथून नंदुरबारकडे आपल्या शासकीय वाहनातून जात असताना वाळू वाहतूक करणारा एक खाली ट्रक नंदुरबार कडून हातोडा कडे येत होता. के.डी.गावीत हायस्कूलच्या अलीकडे वाहन चालकाने अचानकपणे या शासकीय वाहनावर वाहन टाकले.. वसुमना पंत यांचे वाहन चालक रोशन मोरे याने समोरील वाहनास सिग्नल दिला मात्र त्याच्या त्यावर परिणाम झाला नाही व त्याने वाहन पंत मॅडम यांच्या वाहनांवर आणले. दरम्यान वाहन चा...