Posts

तलोद्यात बिबटया कडून बकरीचा फडश्या बंदोबस्त ची मागणी

Image
तळोदा-- तळोदा शहरातील बायपास रस्त्यावर भवर चौफुली जवळील मळ्यात गेल्या दोन तीन दिवसापासून बिंबटया वाघाचा मुक्त संचार सुरु असुन या बाबतीत परिसरातील शेतकऱ्यांनी वनविभागाला कळविले असुन पिंजरा लावण्याची मागणी केली आहे. याठिकाणी रखवालदार मेथा दगू पाडवी यांच्या दोन बकऱ्या चा फडशा पाडला असुन त्यांच्या परिवारामधे दहशतीचे वातावरणात पसरले आहे. सदर बिंबटया चा वावर शेतकरी भरत दगडू सुर्यवंशी, रमेश बबन चौधरी, दगुलाल रमण सुर्यवंशी सुनील भालचंद्र सुर्यवंशी,  आदी शेतकऱ्यांचा मळ्यात असुन शेतकऱ्यांनी या बाबतीत वन विभागाला कळविले आहे.

माझ्यावर कितीही गुन्हे दाखल झाले तरी मागे हटणार नाही

Image
माझ्यावर कितीही गुन्हे दाखल झाले तरी मागे हटणार नाही  प्रतिनिधी तळोदा गोपीनाथ मुंडे हे ऊसतोड मजुरांचे दैवत असून बीड जिल्हा जसा मुकादम, मजुरांचा केंद्रबिंदू आहे तसा केंद्रबिंदू आता नंदुरबार जिल्हा होत आहे. मुकादमांना कुठल्याही कारखानाचे कमिशन वेळेवर मिळत नाही. कारखानदार व्याजाने पैसे देवून मुकादम व ऊसतोड मजुरांची लूट करीत आहे. ५० हजार रुपये कोयत्याचे घेतल्याशिवाय कामावर जावू नका. संघटनेचे सभासद होत संघटीत व्हा आणि एकत्र रहा असे प्रतिपादन आमदार सुरेश धस यांनी केले.... ऊसतोड मजूर, मुकादम यांच्या समस्या, अडचणी जाणून घेण्यासाठी सोमावल येथे चर्चा सत्र संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पंचायत समितीचे सभापती यशवंत ठाकरे, नागेश पाडवी, किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस प्रविणसिंह राजपूत, जि. प. सदस्य प्रकाश वळवी, नारायण ठाकरे, सुखदेव सानप, बळीराम पाडवी, दरबार पाडवी, दारासिंग वसावे, हिरामण पाडवी, विरसिंग पाडवी, गणपत वळवी, प्रवीण वळवी, विठ्ठल बागले आदी उपस्थित होते. सुरेश धस पुढे म्हणाले की, मुकादम हा मुका आहे व त्याच्यात दम पण नाही आणि अशी वाईट अवस्था त्यानेच स्वतःची करुन ठेवली आहे. मुक...

तलोद्यात युवक काँग्रेस कडून केंद्र सरकारचा निषेध

Image
आज नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने तळोदा येथे केंद्र सरकार ने   जे शेतकरी विरोधी बिल पास केले त्याच्या निषेध म्हणून जिल्हा युवक काँग्रेस   कडून  स्मारक चोकात  निषेध व्यक्त करण्यात आला  देशाचा अर्थ व्यवस्थेत शेतकरीच प्रमुख असून भारत  हा कृषी प्रधान देश आहे मात्र हा निर्णय पूर्णपणे शेतकरी विरुद्ध असल्याचे मत    उपाध्यक्ष-संदीप परदेशी यांनी व्यक्त केले यावेळी शहर अध्यक्ष -जितेंद्र सूर्यवंशी शहर उपाध्यक्ष -गोविंदा पाडवी तळोदा शहादा विधानसभा सोशल मीडिया योगेश पाडवी,चिंगा पाडवी,योगेश चोधरी,योगेश पाडवी,संजय पाडवी,कांतीलाल पाडवी,रईस कुरेशी, भूषण कलाल,दिनेश पाडवी,जयेश जोहरी,कांत्या पाडवी,मुकेश पाडवी,प्रकाश पाडवी,सोनू सोनवणे युवक काँग्रेस तर्फे स्मारक चौक येथे कँडल लावून केंद्र सरकारने मंजूर केलेल्या शेतकरी बिल विरोधाच्या  निषेधार्त घोषणा बाजी करून निषेध करण्यात आला ..

झोळी करून रुग्णाचा जीवघेणा प्रवास कधी थांबेल

Image
तळोदा : तालुक्यातील गृ.ग्रा.पं. इच्छागव्हाण कार्यक्षेत्रात येणाऱ्या 70 कुटुंब व 370 लोकसंख्या असलेलं नयामाळ या गावात मागील महिन्यात घडलेल्या घटनेची वारंवार पुनरावृत्ती होत आहे. वेळोवेळी याबाबत लोकप्रतिनिधी अथवा प्रशापुढे गाऱ्हाने माडूनही कोणीही या ठिकाणी साधे सांत्वन करण्यासाठी सुद्धा पोहचले नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.           दि 22 सप्टेंबर रोजी जोसाबाई सोन्या वसावे वय 40 वर्षीय महिलेला अचानक थँडी ताप भरल्याने ती आजारी पडली, तिची प्रकृती एवढी खालावली की तिला चालणे सुद्धा अवघड झाले. दरम्यान स्वातंत्र्याच्या 75 नंतरही या भागात रस्ते नसल्याने या भागात वाहन येत नसल्याने या भागातील नागरिक मरण यातना सोसत आहेत.          दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी लाकडाच्या दांडीला झोळीत बांधून रुग्णास 8-10 की मी पाय-पाय चालत उपचारासाठी जाऊन या महिलेस रुगणालया पावेतो पोहचववावे लागले.          या विषयी मागील महिन्यात संबंधीत विभागास व लोकप्रतिनिधीना  निवेदनेही देण्यात आले. मात्र आजपर्यंत कुठलाही लोकप्रतिनिधी किंवा...

ग्राम पंचायतचा दर्जा मिळावा रोशमाळ ग्रामस्थांची मागणी

Image
तळोदा : नगरपंचायत धडगांव वडफळ्या-रोषमाळ बु.!! यामधून रोषमाळ बु.!! गावास वास्तव परिस्थिती लक्षात घेता ग्रामपंचायत दर्जा मिळावा रोषमाळ बु.!! ग्रामस्थांच्या वतीने अक्राणी येथील तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.       या निवेदनात म्हटले आहे की, रोषमाळ बु.!! हे तालुक्याचे गाव म्हणून रोषमाळ बु.!! व वडफळ्या या ग्रुपग्रामपंचायतीचे रुपांतर सन २०१५ साली नगरपंचायत मध्ये करण्यात आले होते. नंदुरबार जिल्हा हा आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि यातच धडगांव (अक्राणी) तालुका १००  टक्के अतिदुर्गम आदिवासी तालुका म्हणून ओळखला जातो. तसेच पेसा (२०१४) कायद्यानुसार देखील रोषमाळ बु.!! संपूर्ण ग्रामपंचायत पेसा क्षेत्रात मोडते. तसेच वडफळ्या ग्रुप ग्रामपंचायत मध्ये येणारे जुने धडगांव आणि वडफळ्या ही गावे देखील पेसा क्षेत्रात येतात. अर्थात यातील ९५ टक्के क्षेत्र हे ग्रामीण व कृषि प्रधान आहे. अनुसूचित क्षेत्रांना लागू असणार्‍या तरतूदी नुसार याठिकाणी नगरपंचायत स्थापन करणे संविधानातील तरतूदींचे उल्लंघन झाल्यासारखे आहे.       पाचवी अनुसूची क्षेत्रात मोडणार्‍या या गावांना श...

लाभार्थी वंचित राहू नये,,,, नागेश पाडवी यांची मागणी

Image
कोरोना महामारीच्या वाढता प्रादुर्भाव पाहता ज्येष्ठ नागरिकांसह सर्व शासकीय अर्थसहाय्य योजना लाभ मिळणेकामी गैरसोय होत असून त्यावर योग्य ती कार्यवाही करून पात्र लाभार्थी वंचित राहू नये यासाठी भाजपचे अनुसूचित जमातीचे प्रदेश उपाध्यक्ष नागेश पाडवी यांनी तहसीलदार अक्कलकुवा यांना निवेदन दिले.          निवेदनात नमूद करण्यात आले आहे की संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना महामारीची परिस्थिती गंभीर होत असताना त्यातच महाराष्ट्र शासन निर्णयानुसार सुरू असलेल्या सर्व अर्थसहाय्य योजनेच्या लाभार्थ्यांना हयातीचे प्रमाणपत्र व उत्पन्नाचा दाखला सादर करणे अनिवार्य केले आहे. परंतु हयातीचे प्रमाणपत्रासाठी बँकेच्या शाखेत तासं तास रांगेत गर्दी मध्ये उभे राहावे लागत आहे. सध्या कोरोनाच्या संपर्कातील रुग्ण संख्या वाढत असल्याने हे वयोवृद्ध लाभार्थी कोरोना रुग्णाच्या संपर्कात येवून धोका निर्माण होऊ शकतो.        तसेच उत्पन्नाच्या दाखल्यासाठी हातमजुरी करणारे, दारिद्र्य रेषेखालील व भूमिहीन असल्यास त्यांना पात्रताकामी 21 हजार  रुपये उत्पन्न दाखला  मिळवण्याकमी अडचणी निर्माण हो...

दुर्गम भागात पोहचले तहसीलदार

Image
तहसीलदार दुर्गम भागात स्वतः पोहचले आता गावातच रोजगार मिळणार तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे यांचे ग्रामस्थांना आश्वासन प्रतिनिधी तळोदा दि.21/9/2020रोजी अतिदुर्गम भाग झापी-फलाई या गावात स्थलांतर होऊ नये व गावात जास्तीत जास्त रोजगार कसा देता येईल.याची जाणीवजागृती साठी, ज्ञानेश्वर सपकाळे तहसीलदार अक्रानी, स्वतः गावात भेट देऊन ग्रामस्थां जवळ चर्चा केली, या कार्यक्रमासाठी कृषी अधिकारी व वन विभागाच्या  अधिकाऱ्यांनाही बोलावले होते परंतु कृषी अधिकारी पोहोचले नाही व वन विभागाचे वनरक्षक मिटिंग संपत असताना आले. गावात याच विभागाकडून रोजगार दिला जातो परंतु तेच वेळेवर उपस्थित नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली नर्मदा बचाओ आंदोलनाचे चेतन साळवे,लतिका राजपूत व विजय वळवी उपस्थित होते.नर्मदा आंदोलन व तहसीलदार अक्रानी यांनी अशा प्रकारे बिलगाव, फलाई,नंदलवळ, थुवानी व भाबरी या गांवामध्ये रोजगाराच्या जाणीवजागृतीसाठी कार्यक्रम लावले आहेत यात कमीतकमी 30 ते 40 गावाचे प्रतिनिधी उपस्थित राहतील असं नियोजन आहे व जास्तीत जास्त गावात कसा रोजगार उपलब्ध करता येईल व स्थलांतर कमी करता येईल हा उद्देश आहे.     ...