तलोद्याचे राजकीय भीष्म भरत भाई
तलोद्याचे राजकीय केंद्रबिंदू भरत माळी -
तळोदा शहराच राजकारणात मागील ३० वर्षपेक्ष्या अधिक काळ राजकीय केंद्रबिंदू म्हणून भरत माळी हे नाव तळोदा शहरात नव्हे तर जिल्ह्यातील नेत्यांमध्ये घेतले जात शहरातील राजकारणात इतरही नेते प्रभावशाली आहेत मात्र भरत माळी या यांचा राजकीय कित्ता कोणालाही कायम स्वरूपी गिरवता आला नाही सतत गेल्या ३० वर्षापासून तळोदा शहरात विविध राजकीय उलथापालथी मध्ये त्यांचा सहभाग हा असतोच
अनेक राजकीय चढउतार त्यांनी बघितले
शहादा येथे विध्यार्थी दशेत असतांना भरत माळी यांनी विद्यार्थी प्रतिनिधी निवडणूकीत सहभाग नोंदविला ,तर तळोदा महाविद्यल्यात देखील विद्यार्थी प्रतिनिधी चा निवडणुका त्यांनी गाजवल्या आहेत ,
पूर्वाश्रमी चे काँग्रेस चा वारसा लाभला असला तरी तळोदा शहर भाजप प्रेमी असल्याने देखील त्यांचा स्वतःचा सर्वसमाजातील दांडगा राजकीय संपर्क मूळ काँग्रेस पक्ष नेहमीच वरचढ दिसून आला आहे याचा अनुभव अनेकदा आला आहे ,
अनेकदा चिन्ह न वापरता स्व बळावर त्यांनी राजकीय ताकद दाखवून दिली आहे,
अतिशय तरुण वयात २४ व्या नगराध्यक्ष झालेत त्यानंतर मात्र स्वतः विजय सहज संपादित करत पूर्ण पेनल आपल्या स्वतःचा नेटवर्क वर निवडण्याचा भीमपराक्रम त्यांनी छत्री चा चिन्हवर करून दाखविला , याच काळात जिल्हाबॅंकचा निवडणुकी दरम्यान शिरपूर चे आमदार अमरिश भाई पटेल या विकास पुरुष जवळ जवळीक वाढली धुळे जिल्हा असताना अमरीश भाई यांचे अगदी निकटवर्तीय म्हणून त्यांची राजकीय ओळख होती ,व आजही कायम आहे,
तळोदा नगर पालिकेचा राजकारणात त्यांची सर्वात घट्ट पकड समजली जाते कारण तळोदा शहराला भरत माळी ६ वेळी नगराध्यक्ष पद भूषवलं आहे व त्यांचा पत्नी सौ, योजना भरत माँळी देखील नगरअध्यक्षा पदावर होत्या यावरून त्यांचे पालिकेतील राजकीय वजन दिसून येते ,
*राजकीय गरुड झेप*
, २००२ चा सार्वत्रिक निवडुकित मात्र त्यांना धक्कादायक निकालांना सामोरे जावे लागले , सत्तेत बाहेर राहुन देखील त्यांनी आपला दबदबा मात्र कायम ठेवला या नंतर काँग्रेस चिन्हावर एकहाती विजय मिळवला व त्यांची ताकद दाखवून दिली
तळोद्याच्या राजकीय आखाड्यकडे नेहमीच जिल्ह्याचे लक्ष असते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, माजी मंत्री पदमाकर वळवी,माजी
मंत्री व विद्यमान आमदार डॉ.विजयकुमार गावित माजीआमदार उदयसिंग पाडवी यांनी देखील तळोद्याच्या राजकीय रिंगणात माळी यांना महत्व दिल आहे .
वयाच्या २४ व्या वर्षी ते तळोदापालिकेचे नगराध्यक्ष झाले. महाराष्ट्रातील सर्वाधिक तरुण नगराध्यक्षाचा मान मिळविणाऱ्या मोजक्याच तरुण नगराध्यक्ष म्हणुन भरत माळी हे नाव घेतलं गेलं
. सन १९९० सालापासून त्यांच्या राजकीय जिवनाची सुरुवात झाली. त्यानंतर त्यांनी मात्र मागे वळून पाहिले नाही. सार्वजनिक जिवनात असंख्य पदे भुषविली. . धुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तळोदा पिपल्स एज्युकेशन संस्थेचे संचालक, माळी समाज सुधारणा मंडळचे अध्यक्ष, तळोदा न.पा.चे प्रतोद आदी पदांच्या माध्यमातून भरतभाईंचा राजकीय प्रवास मोठ्या संघर्षांनी भरलेला आहे.
२००७ साली त्यांना सत्ते पासून लांब ठेवण्यासाठी जिल्ह्यातील सर्व दिगग्ज नेत्यांना एकत्रित यावं लागलं होत यातच त्यांची राजकीय ताकद सिद्ध होते,
त्या वेळी अडीच वर्षे साठी नगराध्यक्षा म्हणून निवडुन आलेल्या हेमलता डामरे यांचे पती प्रा, विलास डामरे यांनी विजया नंतर एक वाक्य वापरलं होत ते मला आजही आठवत ,,,,
पराभव दिसत असतांना देखील शेवटचा क्षण पावेतो जो पावेतो जाहीर होत नाही तो पावेतो प्रयत्न करणारा असा लढवय्या नेता जिद्दी नेता मी पाहिला नाही मला आज त्या माणसाचा राजकीय ताकद चा अंदाज आला ,,,,
फार पॉवर फुल माणूस आहे
असं वाक्य होत प्रा ,विलास डामरे यांच वास्तविक त्या वेळी जिल्ह्यातील सर्व ताकद डामरे यांचा पाठीमागे होती तरी देखील त्यांना विजय साठी संघर्ष करावा लागला यातच भाई ची राजकारण किती खोल व गूढ आहे याची प्रचिती येते,
तळोदा पालिकेत वर्षानुवर्षे असलेली त्यांची सत्ता विरोधकांच्या दृष्टीने आव्हान राहिले आहे त्यांना सत्ते पासून लांब राखण्यासाठी. सर्व विरोधकांना एकत्र यावे लागेल मात्र २००२ व २००७ वगळता ते होऊ शकले नाही मात्र यावेळी देखील त्यांना सत्ता पासून लांब ठेवण्यासाठी किती राजकीय शक्ती लागली याचा अंदाज तळोदा नव्हे तर जिल्ह्याला माहित आहे भरतभाईंच्या या प्रसंगात शांत, संयमी,धिरोदत्त, लढावूवृत्ती वेळोवेळो दिसून आली आहे भरतभाईंकडे त्यांचे पिताश्री बबनराव पहेलवान यांचा समर्थ वारसा आहे. ते राज्यातील नामांकीत कुस्तीपटू होते. १९६५ साली तळोद्याचे नगराध्यक्ष होते. मातोश्री विमलताई माळीही नगरसेविका होत्या. पत्नी सौ.योजनाताई माळी ह्या विद्यमान नगराध्यक्षा होत्या तसेच
बंधू संजय माळी हे नगरसेवक असून त्यांची साथ भरतभाईंना नेहमी असते. माळीयांचे नेतृत्व स्वःकर्तृत्वावर पुढे आले आहे. कोणीही गॉडफादर शिवाय ते राजकारणात यशस्वी झाले आहेत, ही विशेष बाब आहे ,
मागील काळात त्यांना एक गंभीर आजाराला सामोरे जावे लागले त्याला देखिल पराभूत करून ते आज पुन्हा नवीन राजकीय वाटचालीस सज्ज झाल्याचा आत्मविश्वास त्यांच्यात दिसून येतो एक नवीन राजकीय अध्याय लिहण्यासाठी ते सज्ज आहेत,
आज त्यांचा वाढदिवस निमित्ताने येणाऱ्या काळात ईश्वर त्यांना निरोगी ठेवो हिच प्रार्थना
राज्याचे माजी मुख्यमंत्री जेष्ठ नेते शरदचंद्र पवार साहेबांचा सोबत भरत भाई एक दुर्मिळ क्षण एक महाराष्ट्र राज्य चे राजकीय भीष्माचार्य तर दुसरे तळोदा तालुक्यातील राजकीय भीष्माचार्य म्हणजेच भाई
दमदार 👑 नेतृत्वाचे 💪 दर्जेदार 🙏 शब्दांकन ✒️💐👌
ReplyDelete👌👌👌👌👍
ReplyDeleteफार सुंदर लेख
ReplyDelete100%+++सत्य
ReplyDeleteअतिशय समर्पक शब्दात वर्णन
एवढे प्रदीर्घ काळ नेतृत्व असंभवनीय