Posts

Showing posts from 2023

शहर अध्यक्ष म्हणतात भाजप मध्ये आता सर्व दुकान एकत्रित.....,पण भाजप मध्ये असलेल्या चार दुकानांचे काय ?

Image
शहर अध्यक्ष म्हणतात भाजप मध्ये आता सर्व दुकान एकत्रित....., पण भाजप मध्ये असलेल्या चार दुकानांचे काय ? कालिचरण सुर्यवंशी/तळोदा तळोदा एक्स्प्रेस नेटवर्क            तळोदा शहर भाजपाचे नवनियुक्त अध्यक्ष गौरव वाणी यांनी तळोदा येथे आयोजित नूतन पदाधिकाऱ्यांच्या पदग्रहण सोहळा व ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या सन्मान सोहळ्यात बोलताना,शहरात सर्व दुकान (राजकीय पक्ष)एकत्रित असल्याने सद्या प्रबळ विरोधकच शिल्लक नसल्याचे व्यक्तव्य केले . दरम्यान याचा सरळ अर्थ असा निघतो की काँगेस राष्ट्रवादी काँग्रेस दोघ शिवसेना मधील माजी नगराध्यक्ष, माजी उप नगराध्यक्ष,माजी नगरसेवक काही प्रमुख पदाधिकारी यांनी भाजप मध्ये प्रवेश केला असल्याने शहरात विरोधच शिल्लक नसल्याने १०० टक्के भाजपचा विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी या वेळी बोलताना व्यक्त केला . मात्र शहर भाजप मधील  गटबाजी उघड व सर्वश्रुत असून तळोदा पालिकेत एक हाती सत्ता असताना याचा अनुभव वेळोवेळी तळोदा शहर वासियांस आला आहे.भाजप मधील जेष्ठ नेते डॉ वाणी यांची पत्रकार परिषद हा त्याचाच परिपाक असून शहरात विविध प्रमुख नेत्यांचे स्व...

जा रे बुका उचली लय....

Image
जा रे बुका उचली लय....    तळोदा शहरात पुढारी बनण्याचे स्तोम अधिकच वाढले असून स्वयं घोषित नगरसेवक पासून ते स्वयं घोषित नेत्यांनी सर्व हद्द पार केल्या असून राजकारण सोबतच सार्वजनिक कार्यक्रम असल्यास त्या ठिकाणी कोणत्या गोष्टी पाळ्ल्या पाहिजेत याची एक निश्चित अलिखित आचार संहिता असते मात्र तळोदा शहरात अश्या पुढाऱ्यांनी कहर  केला असून एखादा सार्वजनिक कार्यक्रम अथवा राजकीय कार्यक्रम असल्यास  तिथं प्रमुख मान्यवराना स्वागतासाठी अर्थताच  महागडे बुके आणले जातात मात्र सत्कार स्वीकारल्यानंतर मान्यवर बुके तिथच ठेवतात याच बुके वर काही बडे जॉव मिळवण्याची हौस  असणारे  कलाकार लक्ष ठेवून असतात कार्यक्रम संपला की आपल्या पंटर करवी ते महागडे बुके उचलेले जातात तसा आदेशच असतो.... जा रे बुका लेके आ.... जा रे बुका लई ये...... गुपचुप  शहरात अनेकांचे वाढदिवस असतात तालुक्यात अनेकांचे वाढदिवस असतात नंदुरबार या जिल्ह्याच्या ठिकाणी अनेक प्रमुख नेत्यांचे वाढदिवस असतात अशावेळी संधी साधून हा कार्यक्रम रीतसर पार पाडला जातो त्यात नंदुरबारचे बुके तळोदा  व तळोदा येथील बुके नंदुरबा...

तळोदा येथील कार्यक्रमात जिल्हा भाजपअंतर्गत सुरु असलेली गटबाजी उघड !

Image
भाजपाला लागलेले गटबाजीचे ग्रहण मिटे ना ! कालीचरण सूर्यवंशी/तळोदा         जिल्हाचे नूतन पालकमंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते आमदार राजेश पाडवी यांच्या मार्गदर्शन खाली  तळोदा शहरात विविध विकास कामांचा भूमिपूजन चा कार्यक्रम पार पडला .या कार्यक्रमात राज्याचे मंत्री डॉ विजय कुमार गावित खासदार डॉ हिना गावित जी. प. अध्यक्षा सुप्रिया गावित यांचा देखील उल्लेख आमदार कार्यालय कडून प्रसिध्दी माध्यमांना देण्यात आलेल्या पोस्ट मध्ये होते. मात्र त्यांना प्रत्यक्ष आमंत्रण होते का ? या बाबत  तळोदा एक्स्प्रेस ने प्रत्यक्ष बोलणे केले असता आमंत्रण नसल्याचे सूत्र कडून समजते. एकूणच त्याचा परिपाक भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे   यांची नुकतीच भेट खासदार डॉ हिना गावित तसेच प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ शशिकांत वाणी यांनी भेट घेतल्याचे फोटो सोशल मीडिया मध्ये टाकण्यात आल्याने हि भेट बाबत भाजप गोटात जोरदार चर्चा आहे. या भेटीचा मूळ उद्देश काय ? हे गुदस्त्यात आहे.      एकूणच भाजप मध्ये दोन गट पूर्वी पासूनच असल्याचे वेळोवेळी दिसून आले असले तरी पक्ष संघटन ...

तळोदा पोलिस प्रशासनाने चोरीचा तपास गतिमान करण्यासोबतच राजकिय दबावाला बळी न पडण्याची गरज

Image
कालीचरण सूर्यवंशी        तळोदा शहरात दिवसा ढवळ्या एक शिक्षकाचा घरी घरफोडी झाल्याने शहरातील नवीन  वसाहती मध्ये भीतीचे सावट पसरले असून पोलिसांचं भयच आता चोरांना राहिले नाही की काय असा संतप्त सवाल विचारला जात आहे.       तळोदा शहरात नवीन वसाहत परिसरात दरवर्षी घरफोडी होत असते त्या चोरीचा तपासात किती गुन्हाच छडा लागतो किती मुद्देमाल सापडतो हा निश्चितच शोधाचा विषय आहे.        तळोदा  तालुका पोलिस स्टेशन मध्ये खूप दिवसांनी पूर्ण वेळ पोलीस निरीक्षक लाभला असून त्यांचे स्वागत जरी दिवसा ढवळ्या  झालेल्या धाडसी चोरीने आज्ञात  चोरट्यांनी केले असले तरी  पहिल्याच दिवशी रुजू झाल्या नंतर मुख्य रस्त्यावरील दुचाकी वर कार्यवाही करत शिस्त लावण्याचा प्रयत्न केला . तसेच शाळा महविद्यालयात  भेटी देवून समस्या जाऊन घेत थेट संपर्क व थेट कार्यवाही होवु शकते याचा नमुना दाखवला असला तरी नुसते आरंभ म्हणून कार्यवाही नको तर त्यात सात्यत असल्याशिवाय शिस्त लागणार नाही . राजकीय दबावाला झुगारून शहरात कडक शिस्त लावावी - तळोदा शहरात कायदा काही ठर...

तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार राजेश पाडवी सभापती तर राष्ट्रवादी काँग्रेस चे हितेंद्र क्षत्रिय उप सभापतीपदी

Image
तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार राजेश पाडवी सभापती तर राष्ट्रवादी काँग्रेस चे हितेंद्र क्षत्रिय उप सभापतीपदी तळोदा : कृषी उत्पन्न बाजार समिती बिनविरोध झाली असून आज सभापती व उपसभापती बाबत  निवडणूक घेण्यात आली .   दरम्यान  भाजप व राष्ट्रवादी यांची युती या ठिकाणी पाहायला मिळाली बिनविरोध पार पडलेल्या या निवडणुकीत आमदार राजेश पाडवी व माजी आमदार उदेसिंग पाडवी यांच्यात राजकीय समन्वय प्रथमच पाहायला मिळाला असल्याने दोघ पिता व पुत्र मधील राजकीय तणाव संपले असल्याचे उघड झाले आहे . या निवडणुकीत आमदार राजेश पाडवी सभापती तर राष्ट्रवादी काँग्रेसचे हितेंद्र क्षत्रिय उप सभापती पदावर निवड करण्यात आली. बाजार समितीची इमारतीत या वेळी संचालक मंडळ उपस्थित होते.  सर्व पक्षीय फॉर्म्युला असा ठरला - भाजप ९ राष्ट्रवादी काँग्रेस ६ शिवसेना १ ठाकरे सेना १   काँग्रेस १ या निर्णयात  आमदार राजेश पाडवी माजी आमदार उदेसिंग पाडवी माजी मंत्री पदमाकर वळवी.  आमदार आमश्या पाडवी  माजी नगरअध्यक्ष भरत माळी अश्या सर्व पक्षीय नेत्यांची भूमिका अत्यंत महत्वाची होती. असे असले तरी ब...
Image
पप्पा चरण स्पर्श......... कालीचरण सुर्यवंशी/तळोदा               शहादा तळोदा मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी तसेच माजी आमदार उदयसिंग पाडवी यांच्यात असणारे असलेले राजकीय मतभेद हे सर्वश्रुत आहेत दरम्यान नुकताच झालेल्या एका साखरपुड्याच्या खाजगी कार्यक्रमात दोघ दिग्गज आमंत्रित होते या ठिकाणी उपस्थिती असताना आमदार राजेश पाडवी यांनी उदयसिंग पाडवी यांना वाकून नमस्कार केल्याने उपस्थितांमध्ये एकच चर्चा सुरू होती साहेब आणि दादांमधील वितूष्ट मिटले,असा कयास यामुळे लावण्यात येत आहे.           सविस्तर वृत्त असे की,तळोदा-शहादा मतदारसंघांमध्ये मागील काळात माजी आमदार उदेसिंग पाडवी यांनी पाच वर्ष भरपूर निधी आणून संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले होते दरम्यान मागील विधानसभेचे तिकीट त्यांनाच मिळेल असा अंदाज असताना वरिष्ठ पातळीवरील होणाऱ्या राजकीय घडामोडी तसेच स्थानिक राजकीय घडामोडी या कारणांमुळे उदेसिंग पाडवी यांचे तिकीट त्यांना न देता त्यांचे सुपुत्र मुंबई येथील पोलीस निरीक्षक राजेश पाडवी यांना दिले गेले तिकीट दिल्यानंतर माजी आमदार उदेसिंग पाडवी...

माजी-आजी आमदार पिता-पुत्राच्या भूमिकांमुळे तळोदा बाजार समिती होणार राज्यांत लक्षवेधी

Image
तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांचा बिगुल वाजला माजी-आजी आमदार पिता-पुत्राच्या भूमिकांमुळे तळोदा बाजार समिती होणार राज्यांत लक्षवेधी  तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ठरविणार तळोदा शहरातील  राजकीय भविष्य..... कालीचरण सूर्यवंशी       तळोदा येथील शेती उत्पन्न बाजार समितीची निवडणूक कार्यक्रम आज नव्याने जाहीर करण्यात आला. त्यानुसार येत्या २८ एप्रिलला मतदान आहे. मतदान झाल्यापासून पुढील तीन दिवसांत मतमोजणी व निकाल घोषित होणार आहे. तसे आदेश जिल्हा निवडणूक प्राधिकरणाने दिले आहेत. दरम्यान आजी माजी आमदार यांच्यात अर्थात पिता-पुत्र यांच्यात सामंजस्याने मार्ग निघतो की निवडणूक होते याकडे लक्ष लागले आहे.       शेती उत्पन्न बाजार समितीसाठी ग्रामपंचायत सदस्य, शेती सेवा संस्था, अडते व्यापारी व माथाडी कामगार यांचे मतदान ग्राह्य मानले जाते. त्यानुसार येथील बाजार समितीची निवडणूक चार महिन्यांपूर्वीच जाहीर झाली होती. तेव्हाच्या मतदार यादीत ग्रामपंचायतीच्या जुन्या सदस्यांनी नावे मतदार म्हणून समाविष्ठ होती. हा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर ग्रामपं...

तळोदा पालिका निवडणूकीत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसह व प्रभागात उमेदवारीसाठी भाजपच्या प्रमुख नेत्यांकडे भलीमोठी यादी....

Image
तळोदा पालिका निवडणूकीत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसह व प्रभागात उमेदवारीसाठी भाजपच्या प्रमुख नेत्यांकडे भलीमोठी यादी.... सर्वांना न्याय मिळेल का ? तळोद्यात भाजपच्या झेंडा खाली सर्वच विरोधक एका  एकत्रित..... कालीचरण सूर्यवंशी   भाजप मध्ये आता तळोदा शहरातील सर्व दिग्गज एकत्रित आल्याने प्रबळ विरोधकच शिल्लक नसल्याचे चित्र आहे.असे असले तरी सर्व प्रमुख नेत्यांना न्याय न मिळाल्यास मोठा चेहरा कधी हि भाजप मधून बाहेर देखील पडण्याची भीती राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. भाजप मध्ये सर्वांना न्याय कसा मिळणार ? तळोदा पालिका निवडणुकीत  यंदा भाजप कडून नगरअध्यक्ष व नगरसेवक म्हणून इच्छुकांची संख्या वाढली असून विषेत म्हणजे यात ओबीसी वर्गातून इच्छुकांची संख्या अधिक आहेत  तळोदा पालिकेत नवीन आराखडा नुसार  एकूण १८  जागा पैकी वाढून २१  जागा झाल्या होत्या मात्र नवीन निर्णय नुसार पूर्वी प्रमाणेच १८ जागाच असणार आहेत . त्यात ६ जागा यात अनुसूचित जमाती सर्वग  साठी राखीव असणार असून एक जागा  मागासवर्गीय संवर्ग साठी राखीव असणार आहे. शिल्लक ११  जागेवर महिला  राखीव निम...
Image
अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांच्या तंबूत सर्वच पक्षाचा राजकीय नेत्यांचा वावर तळोदा :  नाशिक पदवीधर  मतदान प्रक्रिया आज सकाळ पासून सुरू झाली मात्र तळोदा वरिष्ठ महाविद्यालय इथ पार पडलेल्या मतदान प्रक्रिया मतदारांना सुलभ होण्यासाठी प्रत्येक पक्ष कडून मंडप लावण्यात येतो व येणाऱ्या मतदार राजाला त्याचा यादी क्रमांक ची चिठ्ठी देण्यात येते मात्र तळोदा तालुक्यातील  या मतदान  वेळी  राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस तसेच शिवसेना अर्थात महाविकास आघाडी कडून  अशी कोणतीच सोय करण्यात आली नव्हती अर्थात अपक्ष  उमेदवार सत्यजीत  तांबे यांचा कार्यकर्ते समर्थक कडून  मंडप टाकण्यात आला होता त्या ठिकाणी आमदार राजेश पाडवी.  माजी जी. प.अध्यक्षा  सीमा वळवी माजी मंत्री पदमाकर वळवी. माजी नगर अध्यक्ष अजय परदेशी. काँग्रेसचे माजी युवा जिल्हाअध्यक्ष जितेंद्र सूर्यवंशी. भाजपचे शहर अध्यक्ष योगेश चौधरी  माजी उपनगरअध्यक्ष शिंदे गटाचे गौतम जैन माजी नगरसेवक गौरव आणि सुभाष चौधरी हेमलाल मगरे.  भास्कर मराठे.शिरीष माळी.योगेश पाडवी कल्पेश चौधरी   य...

काँग्रेसचे माजी युवक जिल्हाध्यक्ष जितेंद्र माळी भाजपाच्या वाटेवर

Image
काँग्रेसचे माजी युवक जिल्हाध्यक्ष जितेंद्र माळी भाजपाच्या वाटेवर  कालीचरण सूर्यवंशी तळोदा: युवा काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सत्यजीत तांबे  यांची अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यानंतर नाशिक विभागाच नाही तर राज्यात या नाट्यमय घडामोडींची एकच चर्चा असून त्याचं सोबत आता  युवा काँग्रेसचे माजी जिल्हा अध्यक्ष जितेंद्र माळी यांची देखील भाजप प्रवेशाची चर्चा शहरात सुरू झाली आहे.               नाशिक पदवीधर निवडणुकीत काँग्रेस कडून अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर देखील अपक्ष उमेदवारी करून सर्वांना आश्चर्यचां धक्का देणारे सत्यजीत तांबे यांनी साधारण आठ दिवस पूर्वी तळोदा इथ भेट             शासकीय विश्रामगृह इथ भेट घेवून स्थानिक कार्यकर्ते व पदाधिकारी यांची भेट घेतली या वेळी दिवस भर शहर व तालूक्यातील शेक्षणीक संस्थांना भेटी देताना जितेंद्र माळी तांबे यांचा सोबत होते.दरम्यान,त्यांचं नामनिर्देशन पत्र भरण्याचा दिवशी देखील जिंतेंद सूर्यवंशी  यांनी नाशिक इथ उपस्थिती लावली हे पाहता  जितेंद्र सूर्यवंशी देखील तांबे  यांचा मार्...

रसिक गप्पांचा राजा हरपला: रसिकलाल वाणी यांचे निधन

Image
         सदैव हसतमुख असणारे आमचे श्री रसिक भाई (काकाश्री ) म्हणजे  जणूकाही  हास्याचा निखळ धबधबाच  तळोदा शहरातीलच नव्हे तर जिल्हा मधील सर्वच राजकीय नेत्यांशी मित्रत्वाचे नाते या माणसाने जोपासले होते.               तळोदा शहरातील जुन्या पालिकेचा भिंतीला लागून असणाऱ्या त्यांचा दोन दुकान असून एक दुकान आमचे प्रेस फोटो ग्राफर श्याम सोनगड वाला उर्फ (मुन्ना) फोटोग्राफी चा व्यवसाय सांभाळतो तर दुसऱ्या दुकानात आमचे ज्येष्ठ बंधू प्रसिद्ध व्यापारी संजय भाई वाणी हे पाहतात मात्र फार पूर्वी पासून संजय भाई हे राजकारण शी निगडित असल्याने त्यांचा आस्थापना वर सर्वच राजकीय नेते . पत्रकार शहरातील प्रगतशील शेतकरी प्लॉट व्यवसायिक ठेकेदार. आजी माजी नगरअध्यक्ष नगरसेवक काय सर्वाचा राबता असतो या ठिकाणी सहज म्हणून काका जवळ गप्पा मारणारे सतत असायचे कोणीही किती हि तणावात असले तरी रसिक काका भेटले की हास्य फवारे उडवून तणाव हलके करण्याचे काम काका करत .....              अगदी १६ वर्षाचा तरुण मुलगा असो की ७० वर्षाचा ...