शहर अध्यक्ष म्हणतात भाजप मध्ये आता सर्व दुकान एकत्रित.....,पण भाजप मध्ये असलेल्या चार दुकानांचे काय ?

शहर अध्यक्ष म्हणतात भाजप मध्ये आता सर्व दुकान एकत्रित.....,पण भाजप मध्ये असलेल्या चार दुकानांचे काय ?
कालिचरण सुर्यवंशी/तळोदा
तळोदा एक्स्प्रेस नेटवर्क 


          तळोदा शहर भाजपाचे नवनियुक्त अध्यक्ष गौरव वाणी यांनी तळोदा येथे आयोजित नूतन पदाधिकाऱ्यांच्या पदग्रहण सोहळा व ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या सन्मान सोहळ्यात बोलताना,शहरात सर्व दुकान (राजकीय पक्ष)एकत्रित असल्याने सद्या प्रबळ विरोधकच शिल्लक नसल्याचे व्यक्तव्य केले . दरम्यान याचा सरळ अर्थ असा निघतो की काँगेस राष्ट्रवादी काँग्रेस दोघ शिवसेना मधील माजी नगराध्यक्ष, माजी उप नगराध्यक्ष,माजी नगरसेवक काही प्रमुख पदाधिकारी यांनी भाजप मध्ये प्रवेश केला असल्याने शहरात विरोधच शिल्लक नसल्याने १०० टक्के भाजपचा विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी या वेळी बोलताना व्यक्त केला . मात्र शहर भाजप मधील  गटबाजी उघड व सर्वश्रुत असून तळोदा पालिकेत एक हाती सत्ता असताना याचा अनुभव वेळोवेळी तळोदा शहर वासियांस आला आहे.भाजप मधील जेष्ठ नेते डॉ वाणी यांची पत्रकार परिषद हा त्याचाच परिपाक असून शहरात विविध प्रमुख नेत्यांचे स्वतचं शक्ती स्थळ असून स्वबळावर शहरात सत्ता स्थापन करू शकतात अथवा या अगोदर त्यांनी तसे करून दाखवले आहे. आता मात्र सर्व प्रमुख नेते भाजप मध्ये आले असले तरी राजकीय महत्वकांक्षा कुरघोडी चे राजकारण समतुल्य राजकीय वलय अर्थकारण अश्या विविध कारणांमुळे प्रत्येक जण संघटनेत एकमेकांना मागे टाकण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे . त्यामुळं वाणी यांनी सर्वच दुकान एकत्रित असल्याचे व्यक्तव केले असले तरीही आज शहरात चार दुकान आहेत. त्यामुळं येणाऱ्या काळात त्यांना बंड पक्ष अंतर्गत मतभेद हे दूर सारून भाजपची एकत्रित मोट जिल्हाध्यक्ष यांचा मार्गदर्शनाखाली बांधण्याचे अवघड काम येणाऱ्या काळात राहणार आहे हे मात्र निश्चित अर्थात शहरात राष्ट्रवादी काँगेस व शिवसेना (ऊ.बा. ठा) यांचं अस्तित्व अजूनही टिकून आहे.काँग्रेस देखील येणाऱ्या काळात शहरात कोणाच्या नेतृत्वात निवडून लढते यावर बरेच अवलंबून असणार आहे.
                       

Comments

Popular posts from this blog

शहादा-तळोदा मतदार संघाचा निवडणूक अंदाज लावणे अवघड निकालाची उत्सुकता शिगेला...!

शहादा मतदार संघात 69.01 टक्के मतदान

तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार राजेश पाडवी सभापती तर राष्ट्रवादी काँग्रेस चे हितेंद्र क्षत्रिय उप सभापतीपदी