माजी-आजी आमदार पिता-पुत्राच्या भूमिकांमुळे तळोदा बाजार समिती होणार राज्यांत लक्षवेधी
तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांचा बिगुल वाजला
माजी-आजी आमदार पिता-पुत्राच्या भूमिकांमुळे तळोदा बाजार समिती होणार राज्यांत लक्षवेधी
तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ठरविणार तळोदा शहरातील राजकीय भविष्य.....
कालीचरण सूर्यवंशी
तळोदा येथील शेती उत्पन्न बाजार समितीची निवडणूक कार्यक्रम आज नव्याने जाहीर करण्यात आला. त्यानुसार येत्या २८ एप्रिलला मतदान आहे. मतदान झाल्यापासून पुढील तीन दिवसांत मतमोजणी व निकाल घोषित होणार आहे. तसे आदेश जिल्हा निवडणूक प्राधिकरणाने दिले आहेत. दरम्यान आजी माजी आमदार यांच्यात अर्थात पिता-पुत्र यांच्यात सामंजस्याने मार्ग निघतो की निवडणूक होते याकडे लक्ष लागले आहे.
शेती उत्पन्न बाजार समितीसाठी ग्रामपंचायत सदस्य, शेती सेवा संस्था, अडते व्यापारी व माथाडी कामगार यांचे मतदान ग्राह्य मानले जाते. त्यानुसार येथील बाजार समितीची निवडणूक चार महिन्यांपूर्वीच जाहीर झाली होती. तेव्हाच्या मतदार यादीत ग्रामपंचायतीच्या जुन्या सदस्यांनी नावे मतदार म्हणून समाविष्ठ होती. हा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. त्यामुळे नव्याने सदस्य झालेल्यांची नावे यादीत असावीत, यासाठी न्यायालयात याचिका दाखल झाल्या. त्यानंतर जाहीर निवडणूक रद्द करून नव्याने ग्रामपंचायत सदस्यांची नावे संकलित करून सुधारित यादी निवडणूक प्राधिकरणास द्यावी, असे आदेश निवडणूक प्राधिकरणाने दिले. त्यानुसार गेल्या महिन्यात सुधारित मतदारांची यादी बाजार समितीने प्राधिकरणाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे..
अर्ज छाननी ता. ५ वैध अर्ज प्रसिद्धी
ता. ६ अर्ज माघाराची मुदत ता. २० चिन्हे वाटप ता. २१ मतदान ता. २८ मतमोजणी निकाल जाहीर करण्याचा दिवस मतदान दिवसापासून पुढील तीन दिवसांच्या आत निकालाचे काम काज पार पडणार आहे...
राज्यभरातील ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी नुकतीच पार पडली. यासाठी निवडणुकीकरिता जाहीर कार्यक्रमानुसार नव्याने निवडून येणारे ग्रामपंचायत सदस्य हे बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणूकीत मतदान करण्यापासून वंचित राहू नये. याशिवाय ग्रामपंचायतीचे नवीन निवडून येणाऱ्या सदस्यांची नावे कृषि उत्पन्न बाजार समितीच्या मतदार यादीत समाविष्ट करून मतदार यादी अंतिम होईपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूका स्थगितीसाठी राज्य सहकार प्राधिकरनाने केलेली विनंती मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मान्य केली असून, बाजार समित्यांच्या निवडणुका दि.१५ मार्च २०२३ पर्यंत पुढे ढकलण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीसह राज्यभरातील बाजार समित्यांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या.
तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील २५ वर्ष पासून बिनविरोध करणारे माजी आमदार उदेसींग पाडवी यांनी भूमिका मांडली असली तरी विद्यमान आंमदार राजेश पाडवी यांनी निवडणूक लढवणार असल्याचे अनेकदा सांगितले आहे त्यामुळं कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक तळोदा शहराची पुढील राजकीय दिशा दाखवणारी ठरणार आहे.
"तळोदा कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये पक्ष आदेश नुसार सर्व जागेवर निवडणूक लढविणार असून मी स्वतः उमेदवारी करणार असून राज्य शासनाचा नवीन धोरणनुसार बाजार समिती साठी पायाभूत सुविधा उपलब्ध केल्या जातील यात शेतकरी भवन. शौचालय. उपहारगृह सभागृह इत्यादी सुविधा राज्य शासन कडून पुरविण्यात येतील या बाबत मी स्वतः बाजार समितीला भेट देवून पाहणी करून आलो आहे."
आमदार राजेश पाडवी
"तळोदा कृषी उत्पन्न बाजार समिती ची आर्थिक स्थिती अत्यंत वाईट असून कोरोना महामारी सोबतच पंकी सारख्या आजार मूळ कर्मचाऱ्यांचे नियमित वेतन देणे अवघड झाले आहे. त्यात निवडणुकीत साधारण १० लाख इतका खर्च येणार आहे. तितकी आर्थिक स्थिती समितीची अजिबात नाही त्या मूळ परिस्थिती पाहता आमदार राजेश पाडवी यांच्या कडे शिष्टमंडळ पाठवून या बाबत सर्व पक्षीय बिनविरोध निवडणूक घेण्याचा प्रयत्न असेन"
उदेसिंग पाडवी,माजी आमदार
Comments
Post a Comment