तळोदा पालिका निवडणूकीत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसह व प्रभागात उमेदवारीसाठी भाजपच्या प्रमुख नेत्यांकडे भलीमोठी यादी....
तळोदा पालिका निवडणूकीत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसह व प्रभागात उमेदवारीसाठी भाजपच्या प्रमुख नेत्यांकडे भलीमोठी यादी....
सर्वांना न्याय मिळेल का ?
तळोद्यात भाजपच्या झेंडा खाली सर्वच विरोधक एका एकत्रित.....
कालीचरण सूर्यवंशी
भाजप मध्ये आता तळोदा शहरातील सर्व दिग्गज एकत्रित आल्याने प्रबळ विरोधकच शिल्लक नसल्याचे चित्र आहे.असे असले तरी सर्व प्रमुख नेत्यांना न्याय न मिळाल्यास मोठा चेहरा कधी हि भाजप मधून बाहेर देखील पडण्याची भीती राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
भाजप मध्ये सर्वांना न्याय कसा मिळणार ?
तळोदा पालिका निवडणुकीत यंदा भाजप कडून नगरअध्यक्ष व नगरसेवक म्हणून इच्छुकांची संख्या वाढली असून विषेत म्हणजे यात ओबीसी वर्गातून इच्छुकांची संख्या अधिक आहेत
तळोदा पालिकेत नवीन आराखडा नुसार एकूण १८ जागा पैकी वाढून २१ जागा झाल्या होत्या मात्र नवीन निर्णय नुसार पूर्वी प्रमाणेच १८ जागाच असणार आहेत . त्यात ६ जागा यात अनुसूचित जमाती सर्वग साठी राखीव असणार असून एक जागा मागासवर्गीय संवर्ग साठी राखीव असणार आहे. शिल्लक ११ जागेवर महिला राखीव निम्मे अथवा अधिक असणार आहेत.
त्यात मागील निवडणुकीत विजयी झालेले अर्थात माजी नगरसेवक एकूण १३ असून काँग्रेस मधून भाजप मध्ये काँग्रेस मधून पांच माजी नगरसेवक यांनी प्रवेश केला असून विद्यमान ११ नगरसेवक आणि नवीन प्रवेश केलेले पांच इच्छुक असतील त्यामुळं भाजप या दिग्गज राजकीय लोकांना कसे समावून घेईल या कडे लक्ष लागले आहे.
भाजप मधील तरुण इच्छुकांची धडपड ....
दरम्यान मागील पंच वार्षिक निवडणुकीत अनेक तरुण इच्छुक होते. त्या वेळी घेण्यात आलेल्या मुलाखतीत एकूण ६० जणांनी तिकीट ची मागणी केली होती.
त्यात अनेकांना पुढील पंच वार्षिक तर अनेकांना स्वीकृत नगरसेवक पद बाबत शब्द देण्यात आला होता. व विषयवार पडदा टाकण्यात आला होता
मात्र यंदा भाजप मध्ये अनेक वर्ष पासून काम करणारे इचुकांचे समायोजन करणे पक्ष संघटन समोर आव्हान असेल.
सध्या विरोधक एकत्रित -
भाजप पक्षात पालिका निवडणुकीत मुख्य केंद्र बिंदू असणार आहे. असे पाहिले तर आज मागील काळात एकमेकांचा विरोधात गरळ ओकणारे सर्वच जन एकत्रित आले आहेत. त्या मूळ पक्ष मधील व विविध कार्यक्रमात व्यासपीठावर मान सन्मान विविध कार्यक्रम मध्ये यादीत क्रमवारी नावाची निश्चिती करणे अवघड होणार आहे. कारण अगोदरच गट तट असणाऱ्या भाजप पक्षात अती महत्त्वकांक्षा या मूळ पक्ष संघटनेत तसेच निवडणुकी पूर्वी तिकीट वाटप करताना व रणधुमाळीत कुरघोडी चे राजकारण होण्याचे दाट संकेत आहेत.
भाजप चार दिग्गज गट एकत्रित -
तळोदा भाजप मध्ये मागील काळात डॉ शशिकांत वाणी. अजय परदेशी. असे निवडक लोक होते. मात्र त्या नंतर योगेश चौधरी. यांचा प्रवेश मुळे भाजपची ताकद अजून वाढली होती आता शहरातील सर्वात शक्तीशाली नेते म्हणून परिचित असणारे भरत माळी सुद्धा भाजप मध्ये आल्याने.
त्यांचा येण्याचा पूर्वी
भाजप मध्ये वरकरणी शांतता दिसत असली तरी गटबाजी मागील पांच सहा वर्षात अनेकदा उघडपणे समोर आली आहे.
यात
डॉ शशिकांत वाणी. हे जेष्ठ नेते भाजप मध्ये असून त्या व्यतिरिक्त अजय परदेशी यांचा गट. योगेश चौधरी यांचा गट आणि आता भारत माळी यांचा गट एकत्रित असणार आहे. त्या मूळ इतक्या दिग्गज नेत्यांना गटाला सांभाळून घेणे पक्ष समोर निश्चितच डोकेदुखी असणार आहे .
राष्ट्रवादी काँगेस शिवसेना. ठाकरे सेना यांच्या भूमिकेकडे लक्ष -
तळोदा शहरात सर्वच दिग्गज भाजप मध्ये एकत्रित झाल्याने या तिन्ही पक्ष मध्ये राष्ट्रवादी दोन नगरसेवक ठाकरे गट एक तर शिंदे गट एक असे चार नगरसेवक आज तिन्ही पक्ष कडे असले तरी प्रतीक्षा दुबे व्यत्रिरीक्त पक्षाचा चिन्ह वर निवडणूक लढले नव्हते
काँग्रेस मधून राष्ट्रवादीत गेलेले हितेंद्र क्षत्रिय व अनिता परदेशी दोघ काँग्रेस चीन्हवर निवडणूक जिंकली होते . तर सुनयना अनुप उदासी या भाजप चिन्हवर जिंकून नंतर शिवसेनेत प्रवेश केला असून
एकमेव प्रतीक्षा दुबे या शिवसेना चिन्ह वर जिंकून आता देखील ठाकरे सेनेतच आहेत. सद्या स्थिती बिकट असली तरी भाजप मधील ईचुकांची रांग पाहता शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला भाजप मधील नाराज गट बाहेर निघून मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आरक्षण वर सर्व अवलंबून -
नगर अध्यक्ष आरक्षण कोणती निघते या कडे अधिक राजकीय गणित अवलंबून असून एस. टी. एस.सी.राखीव निघाल्यास इतकी स्पर्धा दिसणार नाही. मात्र ओबीसी निघाल्यास नगरअध्यक्ष पदासाठी या संवर्गात इच्छुक अधिक असून ओबीसी आरक्षण नगरअध्यक्ष निघाल्यास फुटीची भीती असणार आहे. त्यामुळं इतर पक्षांना देखील बळ मिळून निवडणूक रंगत येणार आहे


Comments
Post a Comment