रसिक गप्पांचा राजा हरपला: रसिकलाल वाणी यांचे निधन
सदैव हसतमुख असणारे आमचे श्री रसिक भाई (काकाश्री ) म्हणजे जणूकाही हास्याचा निखळ धबधबाच तळोदा शहरातीलच नव्हे तर जिल्हा मधील सर्वच राजकीय नेत्यांशी मित्रत्वाचे नाते या माणसाने जोपासले होते.
तळोदा शहरातील जुन्या पालिकेचा भिंतीला लागून असणाऱ्या त्यांचा दोन दुकान असून एक दुकान आमचे प्रेस फोटो ग्राफर श्याम सोनगड वाला उर्फ (मुन्ना) फोटोग्राफी चा व्यवसाय सांभाळतो तर दुसऱ्या दुकानात आमचे ज्येष्ठ बंधू प्रसिद्ध व्यापारी संजय भाई वाणी हे पाहतात मात्र फार पूर्वी पासून संजय भाई हे राजकारण शी निगडित असल्याने त्यांचा आस्थापना वर सर्वच राजकीय नेते . पत्रकार शहरातील प्रगतशील शेतकरी प्लॉट व्यवसायिक ठेकेदार. आजी माजी नगरअध्यक्ष नगरसेवक काय सर्वाचा राबता असतो या ठिकाणी सहज म्हणून काका जवळ गप्पा मारणारे सतत असायचे कोणीही किती हि तणावात असले तरी रसिक काका भेटले की हास्य फवारे उडवून तणाव हलके करण्याचे काम काका करत .....
अगदी १६ वर्षाचा तरुण मुलगा असो की ७० वर्षाचा जेष्ठ नागरिक सर्वच काकाचे मित्र शहरात कोणतेही राजकीय सभा समारंभ असो काका सर्वच ठिकाणी आमंत्रित असायचे शांतता कमिटी मीटिंग असली की काका हजर ८० वर्ष वय उलटूनही अगदी शिडशिडीत बांधा तरुणाला लाजवेल असा आहार तरी कोणतेही गोळी त्यांना लागली नाही.काकांचा दुःखद निधनामुळे वाणी कुटुंबावर दुःखाचे सावट पसरले असून त्यातून ते लवकर बाहेर येवो हि समस्त तळोदा शहर वासियाकडून देवा कडे प्रार्थना..... त्यांचा स्मृती सदैव आमच्या मनात राहतील
कालीचरण सूर्यवंशी

Comments
Post a Comment