अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांच्या तंबूत सर्वच पक्षाचा राजकीय नेत्यांचा वावर
तळोदा : नाशिक पदवीधर मतदान प्रक्रिया आज सकाळ पासून सुरू झाली मात्र तळोदा वरिष्ठ महाविद्यालय इथ पार पडलेल्या मतदान प्रक्रिया मतदारांना सुलभ होण्यासाठी प्रत्येक पक्ष कडून मंडप लावण्यात येतो व येणाऱ्या मतदार राजाला त्याचा यादी क्रमांक ची चिठ्ठी देण्यात येते मात्र तळोदा तालुक्यातील या मतदान वेळी राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस तसेच शिवसेना अर्थात महाविकास आघाडी कडून अशी कोणतीच सोय करण्यात आली नव्हती अर्थात अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांचा कार्यकर्ते समर्थक कडून मंडप टाकण्यात आला होता त्या ठिकाणी आमदार राजेश पाडवी. माजी जी. प.अध्यक्षा सीमा वळवी माजी मंत्री पदमाकर वळवी. माजी नगर अध्यक्ष अजय परदेशी. काँग्रेसचे माजी युवा जिल्हाअध्यक्ष जितेंद्र सूर्यवंशी. भाजपचे शहर अध्यक्ष योगेश चौधरी माजी उपनगरअध्यक्ष शिंदे गटाचे गौतम जैन माजी नगरसेवक गौरव आणि सुभाष चौधरी हेमलाल मगरे. भास्कर मराठे.शिरीष माळी.योगेश पाडवी कल्पेश चौधरी
यांच्या सह कार्यकर्ते उपस्थित होते .
राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचा मंडपच नाही....
दरम्यान महाविकास आघाडीचे उमेदवार शिवसेनेच्या शुभांगी पाटील या असून शहर काँग्रेस तसेच राष्ट्रवादी तसेच शिवसेना अर्थात महाविकास आघाडीचे कोणतेही उत्सुकता मतदान प्रक्रिया दरम्यान मतदारांच्या सोयीकरिता चिठ्ठी वाटण्यासाठी विशेष सोय करण्यात आली नव्हती तसेच काँग्रेसचे जितेंद्र सूर्यवंशी हे त्यांच्या कार्यकर्त्यासह उघडपणे अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्या मतदान प्रक्रियेत विशेष उपस्थिती राहीले मागील काही दिवसापासून सद्या काँग्रेस मध्ये असलेले जितेंद्र सूर्यवंशी यांचा सक्रिय सहभाग होताना दिसून आले तसेच उमेदवार सत्यजित तांबे व त्यांच्या कार्यकर्त्यांकडून टाकण्यात आलेला मंडपात त्यांची देखील उपस्थिती दिसून आली पदवीधर मतदारसंघाचे निवडणुकीत दरवेळी मतदान केंद्राच्या ठराविक निर्धारित अंतरावर काँग्रेस राष्ट्रवादी व राष्ट्रीय काँग्रेस यांच्या वेगळा तंबू तर भाजपच्या वेगळा तंबू अशी स्थिती दिसून येते यंदा मात्र एकाच मंडपात सर्व पक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्यासाठी काम करताना दिसून आले.
माझ्या कडे तळोदा मतदान केंद्रावर उमेदवार प्रतिनिधी बसविण्याची जबाबदारी देण्यात आली होती. त्या नुसार उमेदवार प्रतिनिधी देण्यात आले होते . या व्यतिरिक्त इतर कोणत्याही सूचना मला नव्हत्या
जितेंद्र दुबे
शहर प्रमुख शिवसेना
मागील काही दिवसापूर्वी शिवसेनेचा उमेदवार याच्याशी बोलणे झाले होते मात्र मागील आठ दिवसांपासून कोणत्याही प्रकारचा संपर्क करण्यात आला नसल्याने यावर अधिक व्यकत्व्य करणे उचित नाही
योगेश मराठे,राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष
अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांनी या निवडणुकीत मतदार नोंदणी तसेच संपर्क व प्रचाराची जबाबदारी माझ्या कडे दिली होती तसेच मी जरी सद्य स्थितीत काँग्रेस पक्षात असलो तरी डॉ तांबे यांचे ग्रामीण भागात संपर्क सतत असून आज त्यांचे पुत्र सत्यजीत तांबे हे उमेदवारी करत असून त्यांच्या व्यक्तिगत प्रेम मूळ मी अपक्ष उमेदवाराचा बाजून उघड काम करत आहे .
जितेंद्र सूर्यवंशी
माजी युवा काँगेस जिल्हा अध्यक्ष

Comments
Post a Comment