तळोदा येथील कार्यक्रमात जिल्हा भाजपअंतर्गत सुरु असलेली गटबाजी उघड !


भाजपाला लागलेले गटबाजीचे ग्रहण मिटे ना !
कालीचरण सूर्यवंशी/तळोदा
        जिल्हाचे नूतन पालकमंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते आमदार राजेश पाडवी यांच्या मार्गदर्शन खाली तळोदा शहरात विविध विकास कामांचा भूमिपूजन चा कार्यक्रम पार पडला .या कार्यक्रमात राज्याचे मंत्री डॉ विजय कुमार गावित खासदार डॉ हिना गावित जी. प. अध्यक्षा सुप्रिया गावित यांचा देखील उल्लेख आमदार कार्यालय कडून प्रसिध्दी माध्यमांना देण्यात आलेल्या पोस्ट मध्ये होते. मात्र त्यांना प्रत्यक्ष आमंत्रण होते का ? या बाबत तळोदा एक्स्प्रेसने प्रत्यक्ष बोलणे केले असता आमंत्रण नसल्याचे सूत्र कडून समजते. एकूणच त्याचा परिपाक भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांची नुकतीच भेट खासदार डॉ हिना गावित तसेच प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ शशिकांत वाणी यांनी भेट घेतल्याचे फोटो सोशल मीडिया मध्ये टाकण्यात आल्याने हि भेट बाबत भाजप गोटात जोरदार चर्चा आहे. या भेटीचा मूळ उद्देश काय ? हे गुदस्त्यात आहे.


     एकूणच भाजप मध्ये दोन गट पूर्वी पासूनच असल्याचे वेळोवेळी दिसून आले असले तरी पक्ष संघटन पातळीवर त्याचा कायम स्वरुपी तोडगा निघालेला नाही. मागील सात वर्ष पासून हा अंतर्गत तणाव व लोकप्रतिनिधी मधील गट मूळ सर्व सामान्य कार्यकर्ते ना नेमका कुठ जावं ? कुठ जावू नये हे कळेनास झालं आहे. कारण एका कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली की एक गट नाराज होणार मात्र तळोदा शहादा तालुक्यात स्थानिक आमदार असल्याने शहर तालुक्यातील स्थनिक नगरसेवक सरपंच जी प.सदस्य यांना निधी साठी व इतर विकास कांमसाठी सतत संपर्क ठेवून प्रश्न मार्गी लावावा लागतात तर राज्याचे मंत्री पद असल्याने विविध प्रश्न घेऊन तसेच निधी साठी डॉ विजय कुमार गावित तसेच जी. प अध्यक्ष पद सुप्रिया गावित व खासदार डॉ हिना गावित यांच्याशी संपर्क ठेवतात . त्यामुळं संपर्क दोघा कडे ठेवायचे आहे मात्र कोणाला एकाची नाराजी ओढून घ्यावी लागते.

संघटात्मक प्रयत्न अपूर्ण ?
         दरम्यान भाजप संघटन पातळीवर या बाबत ठोस भूमिका घेतली जात नसल्याने हे अंतर्गत वाद अधून मधून उफाळून येतात व त्याचा फटका कार्यकर्त्यांना बसतो अनेकदा अधिकारी देखील अडचणीत येतात २०१४ पासून हिच स्थिती आहे. दरम्यान या लोकप्रतिनिधी मध्ये हा वाद असाच वाढत रहावा म्हणून काही स्वतचा पक्ष मधील काही जण सतत विषय वाढवतात असे देखील एका कार्यकर्त्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.
    माजी आमदार उदेसिंग पाडवी यांचे देखील वेळोवेळी डॉ हिना गावित यांच्याशी विविध विकास कामांचा उद्घाटन वरून वाद झालेले सर्वश्रुत आहेत.तर काही विकास कामाचे भूमिपूजन दोन वेळा देखील झाले आहे.तसेच विद्यमान आमदार यांना आमंत्रण न देता त्यांचा गावाला जोडणाऱ्या रस्त्याचा भूमिपूजन प्रसंगी असाच वाद उफाळला होता. त्यावर पत्रकार परिषद घेत आमदार राजेश पाडवी यांनी आपली भूमिका मांडत जाणीवपूर्वक डावलले जात असल्याचा आरोप केला होता.मागील काळात तळोदा शाहादा मतदार संघात विविध विकास कामांचे अथवा वाटप कार्येक्रम मध्ये आमदार राजेश पाडवी यांना आमंत्रण नसल्याने त्यांची देखील नाराजी असून आता नूतन पालकमंत्री यांच्या हस्ते भूमिपूजन कार्यक्रम मध्ये राज्याचे मंत्री डॉ विजय कुमार गावित खासदार डॉ हिना गावित. जी. प. अध्यक्षा सुप्रिया गावित स्थानिक भाजपचे जेष्ठ नेते डॉ शशिकांत वाणी यांची अनुपस्थिती निश्चितच भाजप मधील अंतर्गत राजकीय युद्ध नक्कीच सुरू असल्याचे चित्र दिसते. या बाबत तळोदा एक्स्प्रेसने प्रतिक्रिया घेत लोकप्रतिनिधी व संघटन पदाधिकारी यांची भूमिका समजून घेतली


राज्याचे मंत्री डॉ विजय कुमार गावित हे आमच्या साठी आदर स्थानी असून माझी त्यांच्याशी कोणतेही स्पर्धा नाही. मात्र आमच्या माझ्या मतदार संघात विकास कामाचे कोणतेही भूमिपूजन होत असल्यास आम्हाला देखील नियोजनात घेतल्यास आम्ही स्वतः उपस्थित राहून कार्यक्रम अधिक उत्तम रित्या करण्यासाठी स्वतः नियोजन करून विकास कामासाठी सोबत राहू. शकतो मात्र. मागील काळात तसे होताना दिसत नाही.त्यामुळं आमची नाराजी असून
शहादा तळोदा मतदार संघात त्यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून द्यावा एकच पक्षचे आमदार व मंत्री सोबत आल्यास तर या भागाचा विकास होईल कार्यक्रमात पक्ष म्हणून सर्व लोकप्रतिनिधी सोबत दिसल्यास सर्वसामान्य कार्यकर्ते मध्ये देखील संम्रभ राहणार नाही. पक्ष अधिक बळकट होण्यास मदत होईल

आमदार राजेश पाडवी



मी व डॉ गावित साहेब मागील
२०१४ पासून भाजप संघटनेत असून पक्षशिस्त आम्ही सदैव राखली असून सर्वांना सन्मान दिला आहे पक्ष अंतर्गत आम्ही कधीही गटबाजी केली नाही मात्र. काही विरोधक जाणीवपूर्वक आमच्या पक्षात व लोकप्रतिनिधी मध्ये गटबाजी कशी होईल या साठी
आमच्याच पक्षच्या लोकप्रतिनिधी ना दिशाभूल करून विरोधात कृती करण्यास प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करतात . या कडे निश्चित पने पक्ष संघटन कडून लक्ष देणे आवश्यक असून जेणे करून पक्ष संघटनेत मतभेद वाढणार नाहीत व विकासाला नवीन दिशा मिळेल......
पक्ष संघटना ने या कडे लक्ष देणे आवश्यक
 मा.डॉ हिना गावित खासदार नंदुरबार

भूमिपूजन कार्यक्रम मध्ये आमंत्रण होते का नव्हते या बाबत मला अधिकृत माहिती नाही .मात्र संघटन पातळीवर लोकप्रतिनिधी मध्ये कोणतेही वाद नाहीत
निलेश माळी.
जिल्हा अध्यक्ष नंदुरबार भाजप

Comments

Popular posts from this blog

शहादा-तळोदा मतदार संघाचा निवडणूक अंदाज लावणे अवघड निकालाची उत्सुकता शिगेला...!

शहादा मतदार संघात 69.01 टक्के मतदान

तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार राजेश पाडवी सभापती तर राष्ट्रवादी काँग्रेस चे हितेंद्र क्षत्रिय उप सभापतीपदी