माजी आमदार उदयसिंग पाडवी यांची राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष पदी नेमणूक
माजी आमदार उदयसिंग पाडवी यांची राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष पदी नेमणूक
तळोदा : शहादा तळोदा मतदार संघाचे माजी आमदार यांची दखल पक्षाने घेत त्यांना राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष पदी नेमणूक केली असून तसे पत्र त्यांना प्रदेशाध्यक्ष जयवंत पाटील यांच्या हस्ते देण्यात आले,
शहादा तळोदा मतदारसंघात भाजप कडून त्यांनी निवडणूक लढवत २०१४-१५ साली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार माजी मंत्री पदमकार वळवी व राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र गावित यांना पराभूत केले होते, मात्र मागील पंच वार्षिक निवडणुकीत त्यांना तिकीट नाकारत भाजपने त्यांचे पुत्र राजेश पाडवी यांना तिकीट दिल होते, त्यमुळे भाजपावर नाराजी व्यक्त करत त्यांनी सरळ काँग्रेस मध्ये प्रवेश करत माजी मंत्री डॉ विजयकुमार गावित यांच्या विरुद्ध उमेदवारी केली होती, मात्र त्यात त्यांचा पराभव झाल्याने व काँग्रेस संघटन पातळीवर व काही नेत्यांशी न जुळल्याने त्यांनी राष्ट्रवादीत एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला होता, एकनाथराव खडसे यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख आहे, आता या नवीन पदाचा माध्यमातून उदयसिंग पाडवी पुढील वाटचाल कशी करतात या कडे लक्ष लागून आहे...
Comments
Post a Comment