जिल्हा क्रीडा अधिकारी यांची तलोद्यात भेट 
खुल्या व्यायाम शाळांची केली पाहणी

 तळोदा : प्रतिनिधी
          काटेरी झुडपांमध्ये बसविले खुल्याजिमची पाहणी आज जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी केली.जिमच्या पाहणी करून स्थानिक रहिवाशांच्या सोयीनुसार जिमचे साहित्य बसविण्याच्या सूचना त्यांनी संबंधित ठेकेदाराला दिल्या.
             तळोदा येथील तापी माँ परिसरात तळोदा नगरपालिकेच्या क्रिडा विभागाच्या माध्यमातून सन २०१९-२०२० मध्ये ओपन जीम मंजूर झाली होती.ही जीमकाटेरी झाडाझुडपांमध्ये व जमीन ओबडधोबड असणाऱ्या ठिकाणी बसविण्यात आली होती.त्यामुळे स्थानिक नागरीकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. 




         या पार्श्वभूमीवर जिल्हा क्रिडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी आज तळोदा येथे भेट देत शहरांतील बसविलेल्या ओपन जिमची पाहणी केली.यावेळी त्यांच्या सोबत नगराध्यक्ष अजय परदेशी,शिवसेना शहर प्रमुख जितेंद्र दुबे,जिल्हा क्रिडा कार्यालयाचे मुकेश बारी,महेंद्र काटे,पालिकेचे राजेंद्र माळी आदींसह स्थानिक नागरीक उपस्थित होते.
                 यावेळीं जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी स्थानक नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले.पाहणी दरम्यान स्थानिक नागरिकांनी जिल्हा क्रिडा अधिकाऱ्यांना निवेदन देत काटेरी झाडे काढून तापी माँ नगर मधील जीम इतरत्र न हलविता त्याठिकाणी असू द्यावी अशी मागणी केली. 
          सिताई नगरमधिल ओपन जिमची पाहिणी केली.त्याठिकाणी असणारे काटेरी झाडे देखिल काढण्याची आवश्यकता असल्याचे दिसून आले.नगराध्यक्ष परदेशी यांनी तात्काळ ते काढण्याच्या सूचना दिल्या.त्यानंतर जिल्हा क्रिडा अधिकाऱ्यांना शहरात बसविलेल्या सर्व ओपन जिमची पाहणी केली व ठेकेदाराला स्थानिक राहिवाशीची मते जाणून घेत त्यानुसार कामात दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्यात.



शहरातील खुल्या जागेत बसविण्यात आलेल्या सर्व व्यायाम शाळांना  आज पाहणी केली. यावेळी नगराध्यक्ष व शिवसेना शहर प्रमुख तसेच स्थानिक रहिवाशांशी चर्चा करून त्यांच्या सूचनेनुसा साहित्याचा जागेत बदल करण्याच्या सूचना दिल्या आहेत

                         
सुनंदा पाटिल ,
जिल्हा क्रिडा अधिकारी, नंदुरबार




Comments

Popular posts from this blog

शहादा मतदार संघात 69.01 टक्के मतदान

शहादा-तळोदा मतदार संघाचा निवडणूक अंदाज लावणे अवघड निकालाची उत्सुकता शिगेला...!

शहर अध्यक्ष म्हणतात भाजप मध्ये आता सर्व दुकान एकत्रित.....,पण भाजप मध्ये असलेल्या चार दुकानांचे काय ?