व्यायाम शाळा साठी मोकळी जागा नगरसेवकानेच दाखवली
जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे सुनंदा पाटील स्पष्टीकरण
कालीचरण सुर्यवंशी: तळोदा
तळोदा नगर पालिकेच्या एका नगरसेवकाने साहित्य कुठं लावायचे याची जागा दाखवली होती.त्यानुसार साहित्य त्या ठिकाणी बसविण्यात आले, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी दिली आहे. या बाबतीत स्वतः पाहणी साठी येणार असून ज्या चुकीचा ठिकाणी साहित्य लावलं आहे ते काढून घेण्यात येईल तश्या सूचना संबधित ठेकेदाराला देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
ठेकेदाराने व्यायाम शाळा काटेरी झुडपात लावल्या बद्दल प्रकरण तलोद्याचा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय असतांना यात दोष पालिकेचा की संबधित ठेकदाराचा या बाबतीत आरोप प्रत्यारोप होत असताना नंदुरबार जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय चे जिल्हा क्रीडाधिकरी सुनंदा पाटील यांनी संपर्क साधून याबाबत क्रीडा विभागाची भूमिका स्पष्ट केली. क्रीडा साहित्य बाबत पालिकेशी या पूर्वीच पत्र व्यवहार झाला असून पालिकेचा कोणत्या मोकळ्या जागेत साहित्य लावायचे या बाबतीत माहिती घेतली होती.
तळोदा शहरातील तापी माँ नगरच्या परिसरात बसवण्यात आलेले ओपन जिमचे साहित्य हे काटेरी झाडाझुडपांमध्ये बसविण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत होतें.खात्यामध्ये व्यायाम करायचा का?असा सवाल उपस्थित केला जात होता.पालिकेला याबाबत विश्वासात घेतले गेले नाही,असे सांगून पालिकेने हात झटकण्याचे प्रयत्न केले.क्रीडा अधिकारी कार्यलयाकडून साहित्य बसविण्यात आले असे पालिकेकडून सांगण्यात आले होते. मात्र क्रीडा विभागाच्या स्पष्टीकरनांनातर पालिका याबाबत घोगडं झटकण्याच्या भूमिकेत असल्याचे दिसून येते.
दरम्यान,याबाबत शिवसेनेचे शहराध्यक्ष जितेंद्र दुबे यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याशी संपर्क साधून याबाबत जाब विचारला.जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील आज त्याठिकानाची पाहणी करण्यासाठी येणार असून संबंधित ठेकेदाराला तेथून साहित्य काढून दुसरीकडे चांगल्या ठिकाणी बसविण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे समजते.
Comments
Post a Comment