"काट्यांमध्ये व्यायाम शाळेचा हट्टहास ठेकदाराच्या बिलासाठी का?" 

कालिचरण सूर्यवंशी

तळोदा : व्यायाम करा की करू नका आम्ही बिल काढून मोकळे होऊ अश्या पद्धतीने ठेकदाराने चुकीचा ठिकाणी व्यायाम शाळा  खुल्या जागेत बसविल्या आहेत

         तळोदा येथील तापी माँ नगरच्या  परिसरात  क्रीडा विभागाकडून बसवण्यात आलेले  ओपन जिमचे साहित्य काटेरी झाडाझुडपांच्या  बसवण्यात आल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे."काट्यांमध्ये व्यायाम करायचा का?' असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
         आदिवासी उपयोजनेअंतर्गत तळोदा नगर पालिकेच्या वतीच्या वतीने क्रीडा विभागामार्फत शहरातील विविध ठिकाणी ओपन जिम चे साहित्य बसवण्यात येत आहे. शहरात आतापर्यंत आठ ठिकाणी हे साहित्य बसवण्यात आले आहे. नागरिकांना सदृढ आरोग्यासाठी आरोग्यदायी सवयी लागव्यात व  सकाळी, संध्याकाळी चालता-फिरता नागरिकांना सहजपणे व्यायामासाठी  साहित्य उपलब्ध व्हावे यासाठी ओपन जिमचे प्रस्ताव नगर पालिकेने क्रीडा विभागाकडे २०१९-२०२० वर्षी पाठवले होते.
              शहरात विविध आठ ठिकाणी अशा पद्धतीच्या ओपन जिम बसवण्यात येत आहेत.मात्र,तळोदा शहरातील तापी माँ नगरच्या  परिसरात बसवण्यात आलेले ओपन जिमचे साहित्य हे काटेरी झाडाझुडपांमध्ये बसविण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
           या ठिकाणी बसवण्यात आलेल्या ओपन जिमच्या साहित्य जवळ मोठी बाबळीची काटेरी झाडे आहेत. जमिनीच्या भागदेखील असमतोल व ओबडधोबड स्वरूपाचा आहे. याठिकाणी बसविण्यात आलेल्या साहित्य पर्यंत सहजपणे कुणी पोहचू शकणार नाही अशी स्थिती आहे.तेथे पर्यत जाण्यासाठी चांगला रस्ता देखिल नाही.जरी कुणी काटेरी झाले झुडपांचा सामना करत साहित्यापर्यत व्यायाम करण्यासाठी पोहचला तरी तेथे व्यायाम करता यावे यासाठी आवश्यक प्रसन्न वातावरण देखिल नसून काटेरी झाडांमूळे व्यायाम करणे शक्य नाही.
       दरम्यान, या शहरात अनेक ठिकाणी बसवण्यात आलेल साहित्य हे नागरिकांना सहजपणे पोहचता येईल व त्यांना त्याचा वापर करता येईल,अशा रहिवासी भागांत बसविण्याला प्राधान्य देण्यात आले आहे.मात्र याठिकाणी बसविण्यात आलेल्या साहीत्याचा परिसरात,जवळपास इतर ठिकाणा सारखी स्थिति नाही.ज्याठिकाणी हे साहित्य बसविण्यात आले आहे,त्याठिकाणी जवळपासच्या परिसरात  कचरा देखिल विखुरलेल्या स्वरूपात दिसून येतो.अनेक नागरिकांकडून त्यांच्या रहिवासी भागांत,ओपन स्पेसमध्ये हे ओपन जिमचे बसवावे अशी मागणी असतांना, तापी माँ परीसरात काटेरी झाडे झुडपांमध्ये साहीत्य बसविण्यासाठी जागेची निवड कुणी केली? याचा देखिल शोध घेणे आवश्यक आहे.  दरम्यान एका नगरसेवका कडून जा गा दाखवली असल्याचे खात्रीपूर्वक माहिती असून ज्या ठिकाणी काटेरी झुडपं आहेत अशी जागा नगरसेवकाने दाखवली कशी ? असा देखिल प्रश्न उपस्थित होतो
      दरम्यान, या प्रकाराबाबत नगराध्यक्ष अजय परदेशी यांनी क्रीडा विभागाच्या अधिकाऱ्यांशी बोलून सदर ठेकेदार बद्दल त्रिव नापसंती व्यक्त केली आहे,ओपन जिमचे साहित्य शहरात बसविण्याची प्रक्रिया क्रीडा विभागाकडून राबविण्यात आली आहे. तापी माँ परिसरात बसविण्यात आलेल्या साहीत्य हे क्रीडा विभागाचे कर्मचारी व संबंधित ठेकेदार हे पालिकेला अनभिज्ञ ठेवून परस्पर बसवून गेले असल्याचे नगराध्यक्ष परदेशी यांनी सांगितले आहे. 



शिवसेनेची आक्रमक भूमिका
      तापी माँ परिसरात काटेरी झाडा-झुडपांमध्ये बसविण्यात आलेल्या ओपन जिमच्या प्रकारावरून शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे.तापी माँ ओपन प्लेसच्या ठिकाणी जिथे कोणत्याही ओपन प्लेस ला पक्के वाल कम्पाउंड नाही किंवा सिमेंट चे तारयुक्त असे कम्पाउंड नाही लोक जिथे पाय ठेऊ शकत नाही अश्या ठिकाणी सदर साहित्य बसून साहित्यासाठी लागलेल्या पैश्याचां आपवय करताना दिसत आहे हे सर्व  मूळ होत आहे पालिकेचे अधिकारी हे झोपलेले आहेत ? 
ज्या तापी माँ नगर मध्ये हे ओपन जिम बसवल्या जात आहे त्या ठिकाणी कोणतीही सुविधा नसतांना  कोणाचा मेहेरबानीमुळे या ठिकाणी साहित्य बसविण्यात आले?असा सवाल शिवसेनेचे शहराध्यक्ष जितेंद्र दुबे यांनी उपस्थित केला आहे.लवकरात लवकर जर हे साहित्य योग्य ठिकाणी बसवावे अन्यथा शिवसेना ते सर्व साहित्य उखडून योग्य ठिकाणी लावेल,असा इशारा देखील देण्यात आला आहे.



---------
            तापी माँ परिसरात क्रीडा विभागाकडून साहित्य बसविण्यात आले असतांना पालिकेला कळविण्यात आले नाही.या प्रकाराबाबत क्रीडा विभागाला कळविण्यात आले आहे.अद्याप क्रीडा विभाग व संबंधित ठेकेदाराला पालिकेकडून ताबा पावती देण्यात आलेली नाही.नागरिकांना गैरसोय होणार नाही या दृष्टीने सोय करण्यात येईल.
                अजय परदेशी, नगराध्यक्ष, तळोदा
                    
          

Comments

Popular posts from this blog

शहादा मतदार संघात 69.01 टक्के मतदान

शहादा-तळोदा मतदार संघाचा निवडणूक अंदाज लावणे अवघड निकालाची उत्सुकता शिगेला...!

शहर अध्यक्ष म्हणतात भाजप मध्ये आता सर्व दुकान एकत्रित.....,पण भाजप मध्ये असलेल्या चार दुकानांचे काय ?