तळोद्यातील कालिका मातेचा प्रसिध्द यात्रोत्सव कोरोणामुळे सलग दुसऱ्या वर्षी रद्द
कालीचरण सूर्यवंशी/तळोदा
ऐतिहासिक परंपरा लाभलेली तळोदा येथिल कालिका मातेचा यात्रोत्सव कोरणा विषाणूचा प्रादुर्भावामुळे सलग दुसऱ्या वर्षी रद्द करण्यात आला आहे.शहराच्या खर्डी नदीकाठावर सुमारे 225 वर्षांपूर्वी बारगळ जहागीरदारनी सुरू केलेली कालिकादेवीची यात्रोत्सवाच्या परंपरेत खंड पडला पडला आहे.
तळोदा शहराच्या खर्डी नदीकाठावर सुमारे 225 वर्षांपूर्वी बारगळ जहागीरदारनी कालिका मातेच्या मंदिराची उभारणी केली होती.तेव्हापासून तळोदा शहरात कालिका मातेचा यात्रोत्सव भरविण्यात येतो. त्या काळातील खान्देशातील ही वर्षातील शेवटची यात्रा म्हणून बघीतले जाते.
यावर्षी यात्रा रद्द झाल्याने गेल्या वर्षी प्रमाणे यावर्षी देखिल व्यावसायिक,व्यापारी यांना मोठया आर्थिक फटका बसणार आहे.तळोदा शहर महाराष्ट्र,मध्यप्रदेश व गुजरात सीमेवर असणारे शहर असून तलोद्याच्या यात्रेत महाराष्ट्रासह गुजरात व मध्यप्रदेश राज्यातील छोटे-मोठे व्यापारी विविध वस्तूंच्या विक्रीसाठी येते असतात.गेल्या वर्षी यात्रेच्या पार्श्वभूमीवर शहरातील अनेक व्यापाऱ्यांनी काही महिन्यांपूर्वी यात्रेत खप असणाऱ्या माल खरेदी केला होता.परंतू यात्राच रद्द झाल्याने त्यांना मोठा आर्थिक झळ बसणार आहे.हा अनुभव लक्षात घेता यावर्षी व्यापाऱ्यांनी कोणत्याही प्रकारचा धोका पत्करला नव्हता.
दरम्यान, यात्रोत्सवाच्या काळात पालिकेला कर रूपातून मोठ्या प्रमाणात आर्थिक उत्पन्न मिळत असते.परंतु सलग दुसऱ्या वर्षी कोरोनामुळे यात्रोत्सवाच्या रद्द करण्यात आल्यामुळे यात्रेच्या माध्यमातून पालिकेला मिळणारे लाखोंचे उत्पन्नावर पाणी सोडावे लागणार आहे.
दरम्यान,तळोदा येथिल कालिका मातेच्या यात्रोत्सवाच्या इतिहासात आता तिसऱ्यांदा यात्रा रद्द झाली आहे.पहिल्यांदा 1967 साली गंगाराम तुकाराम सूर्यवंशी हे नगराध्यक्ष असताना मलेरिया सदृश साथ सुरू होती. त्याकाळी नदी वाहती होती. परिणामी सदर साथ पसरण्याची भीती असल्याने यात्रा नदीत भरण्याची परवानगी धुळे जिल्ह्याधिकारी यांनी नाकारली. तसेच यात्रेचे महत्व व त्याकाळाचा गरजा लक्षात घेता सदर यात्रा ही आठवडे बाजारात भरण्याची परवानगी देण्यात आली. त्यावेळ पासून सदर यात्रा ही त्याठिकाणी भरत होती. त्यानंतर गेल्या वर्षी व यावर्षी अशा सलग दोनदा यात्रोत्सव रद्द झाला आहे.
तळोदा शहरात भरणारी मनीषापुरी मातेची यात्रा 19 शतकाच्या सुरुवातीला तळोदा परिसरात प्लेगच्या साथीने घातलेल्या थैमानामुळे ही यात्रा बंद करण्यात आली व तेव्हापासून ही यात्रा भरतच नाही..
बैल,शेती अवजार व मसाल्यांसाठी प्रसिध्द यात्रा
तळोदा येथे अक्षय तृतीयेला भरणारी कालिका मातेची यात्रा ही यात्रेत भरणारा बैल बाजार,विक्रीला येणारी शेतीची अवजारे व मसाल्यांसाठी प्रसिद्ध आहे.पूर्वीच्या काळी दळणवळणाची साधने नसल्याने अनेक महिने पुरेल एवढे मसालेचे पदार्थ ,मीठ, कांदे आदीना मोठी मागणी असल्याने यात्रेत ते पदार्थ विक्री करण्यासाठी लांब लांबहून व्यापारी येत असत.या शिवाय पावसाळ्यात शेतकरी नवीन पीके लागवडीसाठी शेती औजारे कुसा वखराची कोळपणीची पास,नांगर, वख्खर, कोळपे पेरणीसाठी पाबंर, बैल गाडी, लहान छकडे, मोठी गाडी, यांसारखे शेतीच्या साहीत्याची मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री केली जाते.बैलासाठी देखिल ही यात्रा प्रसिद्ध आहे. लहान मोठे,देशी माळवी गुजरातचे गीर थापर वगैरे जातीचे बैलाची खरेदी विक्री मोठ्या प्रमाणात होते.
आर्थिक नुकसान व रोजगार ही गेला
ReplyDelete