अखेर कॉग्रेसला सोडचिट्ठी देत त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
अखेर कॉग्रेसला सोडचिट्ठी देत त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
तळोदा :काँग्रेस पासून अनेक दिवसापासून नाराज असलेल्या काँग्रेसच्या त्या दोघ विद्यमान नगरसेवकांचे कुटुंबीय व मित्र परिवार यांचा आज राष्ट्रवादीत मुंबई इथं प्रवेश झाला असून या वेळी कोंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष व काँग्रेसच्या विद्यमान नगरसेविका अनिता संदिप परदेशी यांचे पती संदीप परदेशी , तसेच काँग्रेसचे शहादा तळोदा विधानसभा समन्वय योगेश मराठे, भरत चौधरी, विद्यमान नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय यांचे काका केशर क्षत्रिय, व लहान बंधू विकास क्षत्रिय यांच्या सह काही निवडक कार्यकर्ते सह आज मुंबई इथे माजी आमदार उदयसिंग पाडवी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेश अध्यक्ष जयवंत पाटील, महाराष्ट्र युवक प्रदेश अध्यक्ष महबूब शेख व एकनाथराव खडसे यांचा प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश घेतला आहे,
दरम्यान राष्ट्रवादी कोंग्रेसच्या प्रवेश शहर काँग्रेस साठी मोठा धक्का समजला जात आहे, सदर प्रवेशा प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल प्रदेश सरचिटणीस कमलेश चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेस नंदुरबार जिल्हा कार्याध्यक्ष सागर तांबोळी, महिला आघाडी माजी जिल्हाध्यक्ष सौ. हेमलता ताई शितोळे, जिल्हा संघटक एन ,डी,पाटील, नंदुरबार राष्ट्रवादी ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील, डॉक्टर सेल जिल्हाध्यक्ष डॉ.तुषार सनसे उपस्थित होते
Comments
Post a Comment