Posts

Showing posts from May, 2020

ये शहर हें अमन का यहा फिजा हे निराली यहा पे सब शांती शांती हे,,,,,,

Image
पालिकेचे राजकारण तापले आजची सभा तहकूब   कालीचरण सुर्यवंशी  तळोदा तळोदा पालिकेची सभा आज अचानक तहकूब करण्यात आली आहे,         तळोदा पालिकेची सर्व साधारण सभा  आज सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आली होती , यात काही वादग्रस्त विषयांवर खडाजंगी होणार असल्याचे संकेत काल पासून मिळत होते, याची दखल घेत अधिक वाद उद्धवु नये या करिता पीठासीन अधिकारी नगराध्यक्ष अजय परदेशी यांनी सभा तहकूब केली आहे,   दरम्यान  कायदा सुव्यस्थेचा प्रश्न  निर्माण होऊ नये म्हणून तलोद्यात पोलीस उपविभागीय अधिकारी विक्रम कदम व तळोदा पोलीस निरीक्षक राजेश शिंगोटे स्वतः  चोख पोलीस  कर्मचारी ताफा सह  उपस्थित होते,   दरम्यान पालिकेतील  कोंग्रेस चे सर्व नगरसेवक उपस्थित होते, तर शिवसेनेच्या नगरसेविका प्रतीक्षा दुबे सभा तहकूब झाल्या नंतर पालिका  आवारातून निघून गेल्या तर भाजपचे नगराध्यक्ष व सर्व नगरसेवक उपस्थित नव्हते, मुख्यधिकारी सपना वसावा यांनी   काही अपरिहार्य कारनाने पीठासीन अधिकारी नगराध्यक्ष अजय परदेशी यांनी सभा त...

आज तळोदा पालिकेची सभा गाजनार ?

Image
प्रतिनिधी तळोदा तळोदा पालिकेची सर्वसाधारण सभा आज सकाळी ११ वाजता पालिका आवारात पार पडणार असून एकूण ५४ विषयांवर असणाऱ्या या सभेत काही वादग्रस्त विषयावर जोरदारपणे खडाजंगी होणार असल्याची चर्चा तलोद्यातील राजकीय वर्तुळात आहे,   तळोदा पालिकेच्या या सभेत  सोशल डिस्टिंगसीन्स च पालन करण्यासाठी पालिका आवारात सभा होण्याची चिन्हे असून यात शहरातील विविध विकास कामा बद्दल निर्णय सभेत होणार असून त्यात सुरू असलेली कामे व प्रलंबित विषयांवर चर्चा होणार असली तरी ५४  पैकी एक विषय वादग्रस्त होणार असल्याचे समजते विरोधी नगरसेवक यांनी दिलेल्या तक्रार वरून पालिका मुख्यधिकारी व सत्ताधारी भाजप काय निर्णय घेते या कडे लक्ष लागून असले तर यात कोणती भूमिका मांडायची या बाबतीत काल रात्री एक  बड्या नेत्याकडे  चर्चा झाली तर आज सकाळी सुद्धा एक बड्या लोकप्रतिनिधी कडे या बाबत चर्चा होणार असून नतर सर्व साधरण सभेत काय भूमिका राहील याचा निर्णय भाजप नगरसेवक घेणार आहेत,तर यावेळीं कोंग्रेस च्या नगरसेवकांची काय भूमिका राहील या कडे देखील लक्ष लागून आहे, तळोदा पालिकेत अनेकदा वाद होतात  मात्र दर वेळी ते पे...

आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वन्यजीव गणना

Image
मॉर्निंग बुलेटीन तळोदा एक्सप्रेस  काल रात्री बुद्ध पौर्णिमा निमित्त  केमेऱ्या ट्रॅप च्या माध्यमातून  झाली वन्यजीव गणना  प्रतिनिधी तळोदा  कोविड १९ मूळ रोगाचा प्रसार ची काळजी घेत  प्राणी गणना रद्द करण्यात आली मात्र आता आटोमॅटिक केमेऱ्याचा ट्रॅप द्वारे प्राणी गणना होणार आहे , या निमित्त नंदुरबार वनक्षेत्रात वेगवेगळ्या पाणथळ असणाऱ्या जागी एकूण १० ट्रॅप केमरे लावण्यात आले आहेत,   बुद्ध पौर्णिमेला दरवर्षी  राज्यातील विविध वनक्षेत्रात वन्यजीव गणना रात्री मचाण लावून गेली जाते यात विविध  शहरी भागातून वन्यजीव प्रेमी हजेरी लावत असतात, मात्र यंदा कोरोना  आजार मूळ मचाण वर सोशल डिस्टिंशिंग पाळली जाणार  नाही तसेच वन्यजीव देखील बाधित होण्याची भीती पाहता गणना रद्द करण्याचे आदेश होते, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर - वनक्षेत्रात माहिती घेण्यासाठी ट्रॅप  केमेऱ्याचा वापर  इतर वेळी होत असला तरी संपूर्णपणे त्याचावर प्राणी गणना प्रथमच होत आहे , अनेकदा रात्री मचाण वर बसलेल्या व्यक्तिला आवाज वरून प्राणी ओळखावा लागतो,   ...

मॉर्निंग बुलेटीन तळोदा एक्सप्रेस

Image
अखेर वन विभागाच्या ट्रॅप केमेऱ्यात बिबट कैद प्रतिनिधी  तळोदा -     आमलाड शिवारातील नितीन वाणी   यांच्या शेतात बिबटया ने  दोन कुत्र्यावर हल्ला करून व  शेतात  काम सुरू असतानाच दिवसा आणखी एक पाळीव कुत्रावर हल्ला करत त्यास ऊसाचा शेतात घेऊन गेल्याने दिवसा मुक्त संचार मूळ दहशत पसरली आहे या बाबत नगरसेवक गौरव वाणी  यांनी  पिंजरा लावून जेरबंद करण्याची मागणी केली होती याची दखल घेत वन विभागाने दोन ट्रॅप केमॅरे लावले होते त्यात  मंगळवारी रात्री बिबट्या चे काही छायाचित्रे केमरे ने कैद केले असून बुधवारी  सकाळी या बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला  असून आता बुधवारी रात्री वन विभागाचे कर्मचारी देखील एका झोपडीत दबा धरून बसणार आहेत,  त्यामुळं आता बिबट कधी जेरबंद होतो या कडे लक्ष  लागून आहे  आमलाड येथील शेत शिवारात रात्रींच्या सुमाराला बिबट्याने त्यांचा पाळीव कुत्र्याचा फडश्या पडल्याची घटना काही दिवसापूर्वीच घडली असताना सतत त्याचा वावर वाढला होता. याबाबत परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने पिंजरे ल...

मॉर्निंग बुलेटीन तळोदा एक्सप्रेस

Image
कोरोना संकटात आमलाड येथील विलगीकरणं कक्ष ठरत आहे लाभदायी       प्रतिनिधी तळोदा  आमलाड येथील विलगीकरण कक्षात आतापावेतो तब्बल तीन हजार एकशे 71 नागरिकांची तपासणी करण्यात आली तर 73 जणांना तेथेच संस्थात्मक विलगीकरणं करून ठेवण्यात आले. त्यात तालुक्यात कोरोना बाधित क्षेत्रातून आलेल्या नागरिकांची तपासणी अव्याहतपणे आमलाड येथे सुरू आहे. यामुळे तालुक्यात कोरोनाच्या शिरकाव अजूनतरी होऊ शकलेला नाही. त्यामुळे कोरोना काळात येथील विलगीकरण कक्ष व तेथील आरोग्य पथकाची सेवा तालुक्यासाठी लाभदायी व बहुमोल ठरत आहे.        कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढत असताना तपासणी व विलगीकरणं करणे आवश्यक असल्याने तालुका प्रशासनाने आमलाड येथे विलगीकरण कक्ष कार्यान्वित केले होते. यासाठी सहाय्यक जिल्हाधिकारी अविशांत पंडा ,तहसीलदार पंकज लोखंडे ,पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण ,गटविकास अधिकारी सावित्री खर्डे ,मुख्याधिकारी सपना वसावा व तालुका आरोग्य अधिकारी महेंद्र चव्हाण यांनी तातडीने पावले उचलत विलगीकरणं कक्षाची कार्यवाही केली होती.           त्यात या विलगीकरणं कक्षात ताल...
Image
‘मौत के कुएँ मे हमारे लिए आकर ये लोग काम करते है...’ कोविड-19 संसर्गमुक्त झालेल्या रुग्णाच्या भावना  71 वर्षीय वृद्ध महिलेसह चार रुग्ण उपचाराअंती बरे होऊन घरी परतले प्रतिनिधी तळोदा  ‘ये डॉक्टर लोगोंकी बडी मेहेरबानी है, जान का खतरा होने के बावजूद ये लोग मौत के कुएँ मे हमारे लिए उतरते है’ अशा शब्दात कोविड-19 संसर्गमुक्त झालेल्या रुग्णाने आपल्या भावना व्यक्त केल्या. नंदुरबारच्या एकाच कुटुंबातील चार व्यक्तींना उपचाराअंती त्यांचे शेवटचे दोन अहवाल निगेटीव्ह आल्यानंतर घरी पाठविण्यात आले. त्यात 71 वर्षाच्या वृद्ध महिलेनेदेखील कोविड-19 वर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यातील पहिल्या रुग्णाचा दुसरा अहवाल  पॉझिटीव्ह आला होता. मात्र त्याचा तिसरा आणि चौथा अहवाल निगेटीव्ह आला. त्याच्या कुटुंबातील इतर तीघांचा दुसरा व तिसरा अहवाल निगेटीव्ह आला. त्यामुळे चौघांना आज टाळ्यांच्या गजरात आणि फुलांची उधळण करीत घरी पाठविण्यात आले. जातांना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. यावेळी सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये, डॉ.के.डी...
Image
तळोद्यात प्रभाग क्रमांक एक मध्ये एक घर एक किट च्या माध्यमातून लोकप्रतिनिधींची गरजूंना जीवनावश्यक वस्तूंची मदत प्रतिनिधी तळोदा  कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लोकडाऊनच्या कालावधीत वाढ करण्यात आली आहे. परिणामी हातावर पोट भरणाऱ्यांची  उपासमार होऊ नये, यासाठी ठीक ठिकाणी मदतीचे हात पुढे सरसावले आहेत. तळोदा येथे  देखील  लोकप्रतिनिधींनी आपले कर्तव्य पार पडत मदतीचा हात पुढे केला आहे.तळोदा शहरातील प्रभाग क्रमांक एक मध्ये    उपनगराध्यक्षा भाग्यश्री योगेश चौधरी व नगरपालिका बांधकाम सभापती रामानंद ठाकरे यांनी स्वखर्चातून जीवनावश्यक वस्तूंचे किटचे प्रभागात वाटप केले आहे. त्यांच्या या उपक्रमाचे शहरवासीयांनी विशेष कौतुक केले  आहे.  तळोदा शहरात-अनेक जण हात मजुरी तसेच हात गाडी लावून छोटे मोठे व्यवसाय करुन  आपले पोट भरतात. अशा हातावर पोट असणाऱ्या गोरगरीब जनतेची लॉक डाउनच्या काळात आर्थिक कारणास्तव उपासमार होऊ नये यासाठी उपनगराध्यक्षा भाग्यश्री योगेश चौधरी व पालिका बांधकाम सभापती रामानंद ठाकरे यांनी नगरपालिका प्रभाग क्षेत्र क्रमांक एक मध्ये स्...

तळीरामाना आवर घालण्यासाठी पोलीस नेमण्याची मागणी

Image
तळोदा:-(कालीचरण सूर्यवंशी) देशभरात कोरोनाचे वाढणारे रुग्ण आणि निर्माण होणारी परिस्थिती लक्षात घेता ४ मे ते १७ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक जिल्ह्यात कोरोनाने निर्माण झालेल्या परिस्थितीचा अंदाज घेऊन रेड, ऑरेंज आणि ग्रीन अशी विभागणी राज्य सरकारने केली आहे. तसेच या तिसऱ्या लॉकडाऊनच्या टप्प्यात काही सवलती राज्यसरकारने दिल्या आहेत. यात रेड झोनमधील कंटेन्मेंट झोन वगळता दारूची दुकाने सुरू करण्याची परवानगी जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड यांनी त्यांचा सोशल मीडियाच्या अधिकृत पेजवर दिली. सदर माहिती सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. त्यात वाइन विक्री करताना सोशल डिस्टन्स राखून विक्री करण्याबाबत मुभा देण्यात आली आहे. सदर वृत्त तळीरामाना दिलासादायक ठरले असून अनेकांनी याबाबत आनंद व्यक्त केला आहे. यासोबतच वाईन मालकांना देखील दिलासा मिळाला आहे. मात्र 40 दिवसापासून बंद असलेल्या वाईंनच्या दुकानी अचानक सुरू होणार असल्याने तळीरामाची गर्दी उसळेल याचा अंदाजा विक्रेत्यांनी घेतला असून पूर्व उपाययोजना व नियोजन म्हणून सायंकाळीच वाईन शॉप समोर 6 फूट अंतर ठेव चुन्याच्या सहाय...
लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात काही बाबींना शिथीलता जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांचे आदेश प्रतिनिधी तळोदा  कोविड-19 प्रतिबंधासाठी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या  लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात  राज्य शासनाच्या सुचनांनुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र भारुड यांनी जिल्ह्यात काही बाबीत शिथीलता देण्याचे निर्देश दिले आहेत.  शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार जिल्हा ऑरेंज झोनमध्ये येत असल्याने ही शिथीलता देण्यात आली आहे. यात प्रामुख्याने खालील बाबींचा समावेश आहे- • चालक व दोन प्रवाशांसह टॅक्सी व कॅब सुरू राहील. आवश्यक परवानगी घेऊन जिल्ह्यातल्या जिल्ह्यात व्यक्ती आणि वाहनांना फिरण्यास परवानगी असेल. • अनुज्ञेय कामासाठी वाहन नेण्यास परवानगी असेल. चारचाकी वाहनासाठी वाहनचालकाच्या मागील बाजूस केवळ दोन व्यक्तींना अनुमती असेल. दुचाकी वाहनावर सहप्रवाश्यास बंदी असेल. त्यासाठी इन्सिडंट कमांडर पासेस देतील. • अत्यावश्यक सेवा देणारे व सतत मशीन सुरू ठेवणाऱ्या औद्योगिक आस्थापना सुरू राहतील. तसेच यापूर्वी परवानगी दिलेल्या आस्थापना योग्य खबरदारी घे...

मताचा राजकारणासाठी बाहेर येणाऱ्या लोंढ्यावर कोणी बोलेना....

Image
तळोदा:- बाहेरगावाहून येणाऱ्या लोकांबद्दल शहरी व ग्रामीण भागात बाहेर भीती व्यक्त कऱण्यात येत आहे.सामाजिक व राजकिय कार्यकर्ते दुसऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे पुढे करण्याचा प्रयत्न करतांना दिसून येत आहे.मात्र,त्याचा परिमाण आपल्या "वोट बँक"वर होऊ नये म्हणून अधिकृतपणे कोणीही तक्रार करायला पुढे येत नसल्याचे चित्र आहे               मंत्रालयाने नुकतेच  परराराज्यात व मोठया शहरांमध्ये अडकलेल्या नागरिकांना  अटी-शर्तींना अधीन राहून स्वगृही आणण्याचा निर्णय घेतला आहे.काही मजूर  मिळेल त्या वाहनाने प्रसंगी पायी खाजगी वाहनाने लोक गावी परतत आहेत.यांतील अनेक जण हे कोरोनाग्रस्त भागांतून परतत आहेत.परतणाऱ्या नागरीकांना पंधरा दिवस होम कॉरटाईन राहावे लागणार आहे.परंतु परतणारे हे लोक होम कॉरटाईन कितपत पालन करतील,याबाबत शंकाच आहे. त्यामुळे या लोकांबरोबर कोरोना देखिल आपल्या गावांत शिरण्याची भीती ग्रामिण भागात दिसून येत आहे.             अश्या लोकांना गावात घेण्याबाबत ग्रामिण भागांत विविध मतमतांतरे दिसून येत आहे.राजकिय ...
नंदुरबार जिल्हयातून बाहेर जाणाऱ्या  विस्थापीत कामगार / पर्यटक / भाविक / विद्यार्थी व इतर व्यक्तींनी https://forms.gle/pyUBS65kJ1ovC3cu7 या लिंक वर माहिती भरावी. तसेच इतर राज्यात/जिल्ह्यात अडकून असलेल्या पर्यटक/विद्यार्थी/यात्रेकरू/कामगार/इतर यांना येण्याकरिता https://forms.gle/ywY7ZnsfHLagJYBu7 या लिंक वर माहिती भरावी. सदर माहिती भरल्यानंतर संबंधीत जिल्हा / राज्यासोबत संपर्क साधण्यात येईल आणि त्या जिल्हा / राज्याशी समन्वय करुन पुढील कार्यवाही करण्यात येईल.  त्यामुळे आपण उपरोक्त लिंक वर आपली माहिती भरुन प्रशासनास सहकार्य करावे,  हि विनंती.  अधिक माहीतीकरीता सपंर्क साधा  nbranticovid19@gmail.com 02564-210006 08275313833 09403618998 जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार

तलोद्यात उद मांजरावर बिबट्या चा हल्ला

Image
 प्रतिनिधी तळोदा  -  तळोदा तालुक्यातील धानोरा  पोलीस पाटील संघटना अध्यक्ष बापू पाटील यांचा  मालकीच्या शेतात   उद मांजर प्रकारातील दुर्मिळ मांजर मृतावस्‍थेत आढळल्‍याची माहिती सुत्रांनी दिली आहे.  पहाटे  त्यावर  बिबटया वाघाने हल्ला केला असल्याचे वन विभाग कडून सांगण्यात आले,  प्रामुख्‍याने रात्रीच दिसणारे हे मांजर  हल्ला  झाल्याने ठार झाले ,  धानोरा येथील शेतात काम करणाऱ्या  जागल्यास सकाळी हा प्रकार लक्षात आला, दरम्यान हे दुर्मिळ प्रकारातील मांजर पाहून आश्‍चर्य व्‍यक्‍त केले. परिसरातील नागरिकांनी मांजर पाहण्‍यासाठी गर्दी केली होती. या घटनेची माहिती त्‍वरीत वनविभागाला देण्‍यात आली.  अधिकाऱ्यांनी घटनास्‍थळी उद मांजराचा पंचनामा केला. रात्री वावरणारा प्राणी उद मांजर हा प्राणी  जंगलात बीळ करून राहतो  उद मांजर हे बहुतेकदा स्‍मशानाजवळ आढळते. राज्‍यातील घनदाट जंगलांमध्‍ये हा प्राणी आढळतो. अशी माहिती वन्‍यजीव अभ्‍यासक   यांनी दिली आहे.  हा प्राणी खातो काय ?  हा प्राण...