Posts

Image
सत्ताधारी गटाचा अंतर्गत वादामुळे विकस कामांचे आठ कोटी परत गेले  कालीचरण सूर्यवंशी✒️         तळोदा शहरातील नवीन वसाहती मध्ये रस्ते गटार विद्युत पथदिवे व मूलभूत सुविधा नसल्याने वसाहती मधील नागरिकांनी नगराध्यक्ष व आमदार यांना निवेदन देऊन मागणी केली आहे, या बाबतीत अधिक माहिती काढली असता पालिकेच्या हक्काचा निधी तब्बल आठ कोटी इतका वेळेवर खर्च करण्यास पालिकेच्या सत्ताधारी व पालिका प्रशासन असमर्थ ठरल्याने २०१८ सालीच परत गेल्याचे धक्कादायक माहिती समोर आली असून या विविध विकास कामाची प्रशासकीय मान्यता  तत्कालीन जिल्हाधिकारी मंजुळे यांनी दिली होती या कामा बाबत रीतसर वृत्तपत्र मधून टेंडर नोटीस देखील निघाली होती, मात्र  अडीच महिने या बाबतीत  काम कोणाला द्यायचे या बाबतीत मतभेद मूळ निधी परत गेल्याची चर्चा आहे, पालिकेचा निधी हा नागरिकांचा सुविधा साठी असतो मात्र त्या निधीवर डोळा ठेवून टक्केवारी साठी व ठेक्यासाठी अंतर्गत वाद वाढल्याने निधी परत गेल्याचे नुकतेच जितेंद्र दुबे यांनी पत्रकार परिषदेत आरोप केल्याने अंतर्गत राजकीय कलह चा फटका विकास कामांना बसू नये अशी अपेक्...
Image
स्वीकृत सदस्य पदासाठी तिघांची फिल्डिंग  कालीचरण सूर्यवंशी  ✒️  तळोदा:पालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदा बाबत वाद आता वरिष्ठां पावेतो गेला असून जिल्हा अध्यक्ष विजय चौधरी, आमदार राजेश पाडवी नगराध्यक्ष अजय परदेशी  व शहर अध्यक्ष योगेश चौधरी  या प्रमुख पदधिकारी व लोकप्रतिनिधी शी   या विषयावर सखोल चर्चा झाल्याचे खात्रीपूर्वक वृत्त असून विद्यमान स्वीकृत नगरसेवक  हेमलाल मगरे यांना राजीनामा घेण्या बाबत चर्चा झाली असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.         या जागेवर भाजपचे जुने कार्यकर्ते  गोकुळ पवार, तसेच युवा मोर्चा चे जगदीश परदेशी, व दिपक चौधरी यांच्या पैकी एका   नावावर शिक्का मोर्तब होऊ शकते, अन्यथा या इच्छुकांना पुढील दिड वर्षात ठराविक कालावधी साठी दोघा तिघांना संधी देण्या बाबतीत देखील विचार सुरू असल्याचे समजते,मात्र येत्या दिड वर्षात कोण कोणाला स्वीकृत नगरसेवक पद मिळते ? या कडे लक्ष लागून आहे. बेगानी शादी मे अब्दुला दिवाना ? दरम्यान या स्वीकृत  नगरसेवक स्पर्धेत आता पक्षाच्या संघटन पातळीवर     सक्रिय नसलेले ...

स्वीकृत नगरसेवक पद न मिळाल्याने भाजपला सोडचीठ्ठी : आनंद सोनार

Image
कालीचरण सूर्यवंशी तळोदा : मनसे प्रमुख पदाधिकारी सह भाजपचे उपजिल्हा अध्यक्ष यांनी सेनेत प्रवेश केल्या नंतर भाजप पक्ष का सोडला ? या बाबतीत   आनंद सोनार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की भाजपात प्रवेश केला पालिकेचा निवडणुकीत उमेदवारी देखील मिळाली  मात्र दुर्देवाने अटी तटीच्या लढतीत पराभवाचा सामना करावा लागला.त्या निकाला नंतर  तत्कालीन आमदार उदयसिंग पाडवी , लोकनियुक्त नगराध्यक्ष अजय परदेशी तसेच भाजपचे प्रमुख पदाधिकारी यांच्या बैठकित पराभूत उमेदवार व निवडणुकीत परिश्रम घेणारे  अश्या सक्रिय सदस्यांना दरवर्षी नंदुरबार पालिका पॅटर्न प्रमाणे स्वीकृत सदस्य म्हणून संधी देण्याचा निर्णय झाला होता मागील काळात  स्थानिक व वरिष्ठांना या बाबतीत दाद मागितली मात्र माझ्या कडून वेगळीच अपेकक्षा व्यक्त करण्यात आली असल्याने तसेच जिल्हा उपाध्यक्ष पद असून देखील सन्मान न देता सतत डावलल्यामुळे मी भाजपला सोडचिठी देत असल्याचे त्यांनी तळोदा एक्सप्रेसशी बोलतांना सांगितले...           प्रमुख पदाधिकारी संजय राऊत यांच्या उपस्थितीत नंदुरबार येथे प्रव...

चर्चा तर होणारच....माजी आमदार उदेसिंग पाडवी व खा संजय राऊत यांची भेट

Image
कालिचरण सूर्यवंशी तळोदा : माजी आमदार उदेसिंग पाडवी व शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या भेटीचे राजकीय संकेत  काय आहेत ?  याची चर्चा तलोद्यातीलच नव्हे तर जिल्हात देखील सुरू आहे.            नंदुरबार येथे शिवसेना खासदार व ज्येष्ठ नेते संजय राऊत यांनी  नंदुरबार ला भेट देऊन संघटन पातळीवरील समस्या जाणून घेतल्या तसेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा केली.दरम्यान, यावेळी तळोद्याचे माजी आमदार  उदेसिंग  पाडवी यांनी नंदुरबार ला जाऊन त्यांची भेट घेतली या भेटीत काय चर्चा झाली हे  स्पष्टपणे  कळू शकले नसले तरी चर्चेस उधाण आले आहे....            सध्या राज्यात सत्तेत सोबत असणारी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना येणाऱ्या यांची 2022 मध्ये होणाऱ्या तळोदा नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेसोबत राष्ट्रवादीची  युतीचे संकेत प्राप्त होत आहे. तळोदा शहरात शिवसेना व राष्ट्रवादी ची स्थिती            ...
Image
पक्ष प्रवेश तारखेच्या असाही योगायोग कल्पेश सूर्यवंशी यांचा मनसेत प्रवेश घेतल्याच्या दिवशीच सातवर्षानंतर शिवसेनेत प्रवेश कालीचरण सूर्यवंशी ✒️ तळोदा : तलोद्यातील भाजप व  मनसे मधील पदाधिकारी यांच्या सेनेत आज प्रवेश झाला असून राजकारणात पक्ष परिवर्तन हे आता नवीन राहिले नाही, मात्र आज एक राजकीय योग जुळून आला असून मनसेचे तालुका अध्यक्ष ज्यांनी इंजिन मधून उडी घेत धनुष्यबाण हाती धरला आहे,  योग असा की त्यांना मनसे कडून  तालुका प्रमुख दिनांक ११ जून २०१४ ला मिळाले होते आणि त्यांनी पक्ष देखील त्याच दिवशी म्हणजे आज दिनांक ११ जून ला पक्ष सोडला हा निव्वळ योगायोग असला तरी काही वेळा  आकड्यांचा खेळ असाच जुळून येतो,,,, कोण आहेत कल्पेश सूर्यवंशी ? तळोदा शहरातील भाजी बाजारात मन्या काका नावाचे भाजी व्यापारी होते, आडत दुकानातून त्यांचा उदर निर्वाह चाले दुर्देवाने सर्पदंश होऊन काही वर्ष पूर्वीच त्यांच् दुःखद निधन झालं...घराची जबाबदारी कल्पेश वर येऊन पडली म्हणून मग त्यांना अश्या संकट काळी हात दिला तो महाकाली  फ्लॉवर भांडारचे मालक  सुनील भाऊ व शिरीष उर्फ बब्बू फुलांचा व्यवसाय  स...
Image
मनसेला खिंडार  प्रमुख पदाधिकारी संजय राऊत यांच्या उपस्थितीत नंदुरबार येथे करणार प्रवेश भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष आनंद सोनारही हाती बांधणार शिवबंध कालीचरण सूर्यवंशी ✒️             तळोदा येथील शहर व तालुक्यातील  प्रमुख पदाधिकारी सह कार्यकर्ते आज शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे खात्रीशीर वृत्त असून  यात सेनेचे तालुका प्रमुख कल्पेश सूर्यवंशी शहर प्रमुख सूरज माळी, यांच्या सह रुपेश  माळी, जयेंद्र कर्णकार, गणेश कर्णकार, भागेश वाघ, कुलदीप वाघ यांचा सह काही कार्यकर्ते नंदुरबार कडे रवाना झाले असून शिवसेनेचे जेष्ठनेते संजय राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे, मनसे पक्ष स्थापने पासुन  जिल्हात तलोद्यात मनसे सुरूवातीचा काळात सक्रिय पक्ष म्हणून ओळखली गेली मात्र कालांतराने  संघटन पातळीवर पक्ष मागे पडत गेला, मनसे सोबतच अनेक दिगग्ज  नेत्यांची  चर्चा होती मात्र मध्येच कुठतरी ब्रेक लागल्याने काहीचा प्रवेश लांबणीवर पडला आहे , पालिका निवडणूक अजून दिड वर्ष लांब असली तरी आता पासून सेनेची पूर्वतयारी दिसत आहे, दरम्यान राज्यात काँग्...
Image
जिल्हा क्रीडा अधिकारी यांची तलोद्यात भेट  खुल्या व्यायाम शाळांची केली पाहणी   तळोदा : प्रतिनिधी           काटेरी झुडपांमध्ये बसविले खुल्याजिमची पाहणी आज जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी केली.जिमच्या पाहणी करून स्थानिक रहिवाशांच्या सोयीनुसार जिमचे साहित्य बसविण्याच्या सूचना त्यांनी संबंधित ठेकेदाराला दिल्या.              तळोदा येथील तापी माँ परिसरात तळोदा नगरपालिकेच्या क्रिडा विभागाच्या माध्यमातून सन २०१९-२०२० मध्ये ओपन जीम मंजूर झाली होती.ही जीमकाटेरी झाडाझुडपांमध्ये व जमीन ओबडधोबड असणाऱ्या ठिकाणी बसविण्यात आली होती.त्यामुळे स्थानिक नागरीकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती.           या पार्श्वभूमीवर जिल्हा क्रिडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी आज तळोदा येथे भेट देत शहरांतील बसविलेल्या ओपन जिमची पाहणी केली.यावेळी त्यांच्या सोबत नगराध्यक्ष अजय परदेशी,शिवसेना शहर प्रमुख जितेंद्र दुबे,जिल्हा क्रिडा कार्यालयाचे मुकेश बारी,महेंद्र काटे,पालिकेचे राजेंद्र माळी आदींसह स्थानिक नागरीक उपस्थि...