स्वीकृत सदस्य पदासाठी तिघांची फिल्डिंग
कालीचरण सूर्यवंशी ✒️
तळोदा:पालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदा बाबत वाद आता वरिष्ठां पावेतो गेला असून जिल्हा अध्यक्ष विजय चौधरी, आमदार राजेश पाडवी नगराध्यक्ष अजय परदेशी व शहर अध्यक्ष योगेश चौधरी या प्रमुख पदधिकारी व लोकप्रतिनिधी शी या विषयावर सखोल चर्चा झाल्याचे खात्रीपूर्वक वृत्त असून विद्यमान स्वीकृत नगरसेवक हेमलाल मगरे यांना राजीनामा घेण्या बाबत चर्चा झाली असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.
या जागेवर भाजपचे जुने कार्यकर्ते गोकुळ पवार, तसेच युवा मोर्चा चे जगदीश परदेशी, व दिपक चौधरी यांच्या पैकी एका नावावर शिक्का मोर्तब होऊ शकते, अन्यथा या इच्छुकांना पुढील दिड वर्षात ठराविक कालावधी साठी दोघा तिघांना संधी देण्या बाबतीत देखील विचार सुरू असल्याचे समजते,मात्र येत्या दिड वर्षात कोण कोणाला स्वीकृत नगरसेवक पद मिळते ? या कडे लक्ष लागून आहे.
दरम्यान या स्वीकृत नगरसेवक स्पर्धेत आता पक्षाच्या संघटन पातळीवर सक्रिय नसलेले व भाजपचे प्राथमिक सदस्य देखील नसलेले काही इच्छुकांनी वेगळ्या माध्यमातून प्रयत्न सुरू केले असल्याचे देखील बोलले जाते,
पालिका निवडणूकिला अद्याप दिड वर्षाचा कालावधी शिल्लक असला तरीही शिवसेना व राष्ट्रवादीत नाराज मंडळी जाण्याची शकत्या पहाता
भाजप कडून सतर्कता बाळंगण्यात येत आहे, त्याचाच एक भाग म्हणून नवीन पदाधिकारी यांच्या नेमणुका करण्यात येत आहेत,संघटन पातळीवर
रिक्त पदे नेमणुका केल्या जात आहेत,
तळोदा पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून अजय परदेशी हे पदावर थेट बसले होते, तर
प्रचारात आघाडीवर असणारे योगेश चौधरी यांच्या पत्नी भाग्यश्री योगेश चौधरी यांची सर्व नगरसेवकांचा पाठिंब्याने उपनगराध्यक्ष पद देण्यात आले तर
तर स्वीकृत नगरसेवक भाजप कडून जेष्ठ कार्यकर्ते म्हणून हेमलाल मगरे यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड करण्यात आली होती,
दरम्यान निवडणुकी नंतर झालेल्या बैठकीत पराभूत भाजप उमेदवार व भाजपचे तिकीट न मिळालेले इच्छुकांना व निवडणूक काळात परिश्रम घेणाऱ्या भाजप कार्यकर्ताला नंदुरबार पालिका पेटर्न प्रमाणे दरवर्षी स्वीकृत नगरसेवक पद विभागुन पुढील चार वर्षे देण्यात येणार होते,
मात्र माजी आमदार उदयसिंग पाडवी आता राष्ट्रवादीत असल्याने या विषयाची कोंडी फुटत नव्हती, अनेकदा स्वीकृत पदासाठी असणारे इच्छुक उमेदवार यांनी वरिष्ठांची भेट घेऊन दाद मागण सुरू होत, मात्र यांच इच्छुकांपैकी असणारे उपजिल्हा अध्यक्ष आनंद सोनार यांनी स्वीकृत नगरसेवक पद न योग्य मान सन्मान न मिळाल्यानेच भाजप पक्ष सोडत असल्याचे तळोदा एक्सप्रेस जवळ बोलताना सांगितले होते,
दरम्यान येणाऱ्या काळात संघटन पातळीवर नाराज कार्यकर्ते ना कुठंतरी न्याय देण्याचा प्रयत्न संघटन करत असून त्याचाच एक भाग म्हणून स्वीकृत नगरसेवक असणारे हेमलाल मगरे यांचा राजीनामा मागितला असल्याचे खात्रीशीर वृत्त असून आता त्या ऐवजी संघटन पातळीवर जिल्हाअध्यक्ष , विजय चौधरी, आमदार राजेश पाडवी,शहर अध्यक्ष योगेश चोधरी, व नगराध्यक्ष अजय परदेशी तालुका अध्यक्ष बळीराम पाडवी तसेच भाजपचे नगरसेवक आता
कोणा कोणाला संधी देतात या कडे भाजप मधील स्थानिक इच्छुक तसेच विरोधकांचे लक्ष लागुन आहे
स्वीकृत नगरसेवकांचा हालचालीत महत्वाची भूमिकेत असणारे शहर अध्यक्ष योगेश चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले स्वीकृत नगरसेवक पद बाबत इच्छुक असणारे गोकुळ पवार व दिपक चौधरी यांनी शहर अध्यक्ष म्हणून माझ्याकडे दाद मागितली या बाबत जिल्हा अध्यक्ष यांच्या कडे मागणी पोहचवली आहे,पालिका निवडणुकीत व संघटना पातळीवर परिश्रम घेणारे कार्यकर्त्यांना न्याय मिळावा कारण शहरात संघटन मजबूत टिकून राहण्यासाठी कार्यकर्तेना न्याय देणे आवश्यक असून या कोणत्याही कार्यकर्ता वर अन्याय होणार नाही या साठी प्रयत्न करणार असल्याचे तसेच संघटना पातळीवर न्याय देण्यासाठी आपण शहर अध्यक्ष म्हणून कटिबद्ध आहोत.
योगेश चौधरी
शहर अध्यक्ष (भाजप) तळोदा
Comments
Post a Comment