चर्चा तर होणारच....माजी आमदार उदेसिंग पाडवी व खा संजय राऊत यांची भेट
कालिचरण सूर्यवंशी
तळोदा : माजी आमदार उदेसिंग पाडवी व शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या भेटीचे राजकीय संकेत काय आहेत ? याची चर्चा तलोद्यातीलच नव्हे तर जिल्हात देखील सुरू आहे.
नंदुरबार येथे शिवसेना खासदार व ज्येष्ठ नेते संजय राऊत यांनी नंदुरबार ला भेट देऊन संघटन पातळीवरील समस्या जाणून घेतल्या तसेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा केली.दरम्यान, यावेळी तळोद्याचे माजी आमदार उदेसिंग पाडवी यांनी नंदुरबार ला जाऊन त्यांची भेट घेतली या भेटीत काय चर्चा झाली हे स्पष्टपणे कळू शकले नसले तरी चर्चेस उधाण आले आहे....
सध्या राज्यात सत्तेत सोबत असणारी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना येणाऱ्या यांची 2022 मध्ये होणाऱ्या तळोदा नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेसोबत राष्ट्रवादीची युतीचे संकेत प्राप्त होत आहे.तळोदा शहरात शिवसेना व राष्ट्रवादी ची स्थिती
ही तर सदिच्छा भेट
राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष उदेसिंग पाडवी यांनी खा संजय राऊत यांनी घेतलेली भेट ही सदिच्छा भेट असल्याचे राष्ट्रवादीच्या सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले आहे....
मात्र चर्चा तर होणारच✒️
Comments
Post a Comment