स्वीकृत नगरसेवक पद न मिळाल्याने भाजपला सोडचीठ्ठी : आनंद सोनार

कालीचरण सूर्यवंशी


तळोदा : मनसे प्रमुख पदाधिकारी सह भाजपचे उपजिल्हा अध्यक्ष यांनी सेनेत प्रवेश केल्या नंतर भाजप पक्ष का सोडला ? या बाबतीत   आनंद सोनार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की भाजपात प्रवेश केला पालिकेचा निवडणुकीत उमेदवारी देखील मिळाली  मात्र दुर्देवाने अटी तटीच्या लढतीत पराभवाचा सामना करावा लागला.त्या निकाला नंतर  तत्कालीन आमदार उदयसिंग पाडवी , लोकनियुक्त नगराध्यक्ष अजय परदेशी तसेच भाजपचे प्रमुख पदाधिकारी यांच्या बैठकित पराभूत उमेदवार व निवडणुकीत परिश्रम घेणारे  अश्या सक्रिय सदस्यांना दरवर्षी नंदुरबार पालिका पॅटर्न प्रमाणे स्वीकृत सदस्य म्हणून संधी देण्याचा निर्णय झाला होता मागील काळात  स्थानिक व वरिष्ठांना या बाबतीत दाद मागितली मात्र माझ्या कडून वेगळीच अपेकक्षा व्यक्त करण्यात आली असल्याने तसेच जिल्हा उपाध्यक्ष पद असून देखील सन्मान न देता सतत डावलल्यामुळे मी भाजपला सोडचिठी देत असल्याचे त्यांनी तळोदा एक्सप्रेसशी बोलतांना सांगितले...



          प्रमुख पदाधिकारी संजय राऊत यांच्या उपस्थितीत नंदुरबार येथे प्रवेश केला तसेच भाजपचे उपजिल्हाअध्यक्ष आनंद सोनार यांनी भाजपला सोडचिठी देत सेनेत प्रवेश केला,तर मनसेचे तालुका प्रमुख कल्पेश  सूर्यवंशी तसेच  शहर प्रमुख सूरज माळी  यांच्याशी संपर्क साधला असता मनसे पक्षची शहर व तालुक्यात वाढविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केलेत मात्र संघटनेचे जिल्हाकडे लक्ष नसून  राजकारणात अधिक सक्रिय होण्यासाठी शिवसेना पक्ष निवडला तळोदा येथील शहर व तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी सह कार्यकर्ते आज शिवसेनेत संजय राऊत तसेच चंद्रकांत रघुवंशी सेनेचे जिल्हाध्यक्ष विक्रांत मोरे, जिल्हा अध्यक्ष आंमश्या पाडवी , जितेंद्र दुबे , रुपसिंग पाडवी संजय पटेल यांच्या उपस्थितीत प्रवेश झाला.सेनेचे तालुका प्रमुख कल्पेश सूर्यवंशी शहर प्रमुख सूरज माळी, यांच्या सह रुपेश माळी, जयेंद्र कर्णकार, गणेश कर्णकार, भागेश वाघ, कुलदीप वाघ , यादव मराठे,यांचा सह काही कार्यकर्ते यांनी सेनेत प्रवेश केला मनसे पक्ष स्थापने पासुन  जिल्हात तलोद्यात मनसे सुरूवातीचा काळात सक्रिय पक्ष म्हणून ओळखली गेली मात्र कालांतराने  संघटन पातळीवर पक्ष मागे पडत गेला, मनसे सोबतच अनेक दिगग्ज  नेत्यांची  चर्चा होती मात्र मध्येच कुठतरी ब्रेक लागल्याने काहीचा प्रवेश लांबणीवर पडला आहे , पालिका निवडणूक अजून दिड वर्ष लांब असली तरी आता पासून सेनेची पूर्वतयारी दिसत आहे......

Comments

Popular posts from this blog

शहादा-तळोदा मतदार संघाचा निवडणूक अंदाज लावणे अवघड निकालाची उत्सुकता शिगेला...!

शहादा मतदार संघात 69.01 टक्के मतदान

तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार राजेश पाडवी सभापती तर राष्ट्रवादी काँग्रेस चे हितेंद्र क्षत्रिय उप सभापतीपदी