पक्ष प्रवेश तारखेच्या असाही योगायोग
कल्पेश सूर्यवंशी यांचा मनसेत प्रवेश घेतल्याच्या दिवशीच सातवर्षानंतर शिवसेनेत प्रवेश
कालीचरण सूर्यवंशी ✒️
तळोदा : तलोद्यातील भाजप व मनसे मधील पदाधिकारी यांच्या सेनेत आज प्रवेश झाला असून राजकारणात पक्ष परिवर्तन हे आता नवीन राहिले नाही, मात्र आज एक राजकीय योग जुळून आला असून मनसेचे तालुका अध्यक्ष ज्यांनी इंजिन मधून उडी घेत धनुष्यबाण हाती धरला आहे, योग असा की त्यांना मनसे कडून तालुका प्रमुख दिनांक ११ जून २०१४ ला मिळाले होते आणि त्यांनी पक्ष देखील त्याच दिवशी म्हणजे आज दिनांक ११ जून ला पक्ष सोडला हा निव्वळ योगायोग असला तरी काही वेळा आकड्यांचा खेळ असाच जुळून येतो,,,,
कोण आहेत कल्पेश सूर्यवंशी ?
तळोदा शहरातील भाजी बाजारात मन्या काका नावाचे भाजी व्यापारी होते, आडत दुकानातून त्यांचा उदर निर्वाह चाले दुर्देवाने सर्पदंश होऊन काही वर्ष पूर्वीच त्यांच् दुःखद निधन झालं...घराची जबाबदारी कल्पेश वर येऊन पडली म्हणून मग त्यांना अश्या संकट काळी हात दिला तो महाकाली फ्लॉवर भांडारचे मालक सुनील भाऊ व शिरीष उर्फ बब्बू फुलांचा व्यवसाय सांभाळत सांभाळत गाडी रुळावर आली कल्पेश याने मोठे लहान बंधू शिवाजी याला पण सोबत घेऊन फुलांचा व्यवसाय असणाऱ्या दुकानात दररोज विविध फुलांचा माळा ओवून आपला रोजगार व्यवस्थित बसविला दरम्यान याच काळात राज ठाकरे यांनी शिवसेना पक्षाला सोडत स्वतः पक्ष म्हणजेच महाराष्ट्र नवं निर्माण सेना स्थापन केला.
राज ठाकरे च्या रोखठोकपणे भाषण एकूण मनसे पक्षात सक्रिय सदस्य म्हणून काम करू लागला, कालांतराने शहर प्रमुख जागा रिक्त झाल्याने कल्पेश कडे तालुका प्रमुख पद आलं संघटनेत संपर्क वाढत गेला मात्र पठ्ठाने फुलांचा व्यवसाय काही सोडला नाही व्यवसाय करत असताना वेळ मिळेल तस संघटना साठी वेळ देऊ लागला.संघटना जिल्हात खूप सक्रिय नसल्याने आज त्यांनी सेनेत प्रवेश केला.
संघटन राजकारण म्हटलं की पांढरे कपडे, वाढदिवसाच्या निमित्त मोठं मोठं फ्लेक्स आज नेते सोडा कार्यकर्ते चे देखील पाहायला मिळतात.मात्र आभासी दुनियेपासुन लांब वास्तव जीवन जगणारे तरुण नेते खुप कमी असतात त्याला आता आर्थिक कारण देखील कारणीभूत असेल हे वास्तव असले तरी,मात्र तालुका प्रमुख असताना देखील महाकाली फ्लोवर भांडार चे च्या दुकानात बसलेला पक्ष पदाधिकारी आगळा वेगळाच म्हणावं लागेल
आज सेनेत जरी त्यांनी प्रवेश केला असला तरी फुलांचा दुकानात बसलेला मनसे तालुका तलोद्यातील राजकीय प्रेमी कधीही विसरणार नाही.तालुका प्रमुख असून देखील फुलांचा माळा विंणणारा कल्पेश सध्याचा चकाचोंद राजकिय विश्वात वेगळाच......
Comments
Post a Comment