- Get link
- X
- Other Apps
मनसेला खिंडार
प्रमुख पदाधिकारी संजय राऊत यांच्या उपस्थितीत नंदुरबार येथे करणार प्रवेश
भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष आनंद सोनारही हाती बांधणार शिवबंध
कालीचरण सूर्यवंशी ✒️
तळोदा येथील शहर व तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी सह कार्यकर्ते आज शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे खात्रीशीर वृत्त असून यात सेनेचे तालुका प्रमुख कल्पेश सूर्यवंशी शहर प्रमुख सूरज माळी, यांच्या सह रुपेश माळी, जयेंद्र कर्णकार, गणेश कर्णकार, भागेश वाघ, कुलदीप वाघ यांचा सह काही कार्यकर्ते नंदुरबार कडे रवाना झाले असून शिवसेनेचे जेष्ठनेते संजय राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे,
मनसे पक्ष स्थापने पासुन जिल्हात तलोद्यात मनसे सुरूवातीचा काळात सक्रिय पक्ष म्हणून ओळखली गेली मात्र कालांतराने संघटन पातळीवर पक्ष मागे पडत गेला, मनसे सोबतच अनेक दिगग्ज नेत्यांची चर्चा होती मात्र मध्येच कुठतरी ब्रेक लागल्याने काहीचा प्रवेश लांबणीवर पडला आहे , पालिका निवडणूक अजून दिड वर्ष लांब असली तरी आता पासून सेनेची पूर्वतयारी दिसत आहे,
दरम्यान राज्यात काँग्रेस , शिवसेना राष्ट्रवादी अशी महाआघाडी असल्याने त्यांना कोण कोण भेटायला जात या कडे लक्ष लागून आहे,
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment