Posts

Image
जिल्हा क्रीडा अधिकारी यांची तलोद्यात भेट  खुल्या व्यायाम शाळांची केली पाहणी   तळोदा : प्रतिनिधी           काटेरी झुडपांमध्ये बसविले खुल्याजिमची पाहणी आज जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी केली.जिमच्या पाहणी करून स्थानिक रहिवाशांच्या सोयीनुसार जिमचे साहित्य बसविण्याच्या सूचना त्यांनी संबंधित ठेकेदाराला दिल्या.              तळोदा येथील तापी माँ परिसरात तळोदा नगरपालिकेच्या क्रिडा विभागाच्या माध्यमातून सन २०१९-२०२० मध्ये ओपन जीम मंजूर झाली होती.ही जीमकाटेरी झाडाझुडपांमध्ये व जमीन ओबडधोबड असणाऱ्या ठिकाणी बसविण्यात आली होती.त्यामुळे स्थानिक नागरीकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती.           या पार्श्वभूमीवर जिल्हा क्रिडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी आज तळोदा येथे भेट देत शहरांतील बसविलेल्या ओपन जिमची पाहणी केली.यावेळी त्यांच्या सोबत नगराध्यक्ष अजय परदेशी,शिवसेना शहर प्रमुख जितेंद्र दुबे,जिल्हा क्रिडा कार्यालयाचे मुकेश बारी,महेंद्र काटे,पालिकेचे राजेंद्र माळी आदींसह स्थानिक नागरीक उपस्थि...
Image
व्यायाम शाळा साठी मोकळी जागा नगरसेवकानेच दाखवली   जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे सुनंदा पाटील स्पष्टीकरण कालीचरण सुर्यवंशी:  तळोदा            तळोदा नगर पालिकेच्या एका नगरसेवकाने  साहित्य कुठं लावायचे याची जागा दाखवली होती.त्यानुसार साहित्य त्या ठिकाणी बसविण्यात आले, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी दिली आहे.  या बाबतीत  स्वतः पाहणी साठी येणार असून ज्या चुकीचा ठिकाणी साहित्य लावलं आहे ते काढून घेण्यात येईल तश्या सूचना संबधित ठेकेदाराला देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.             ठेकेदाराने व्यायाम शाळा काटेरी झुडपात लावल्या बद्दल प्रकरण तलोद्याचा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय असतांना यात दोष पालिकेचा की संबधित ठेकदाराचा  या बाबतीत आरोप प्रत्यारोप होत असताना नंदुरबार जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय चे जिल्हा क्रीडाधिकरी सुनंदा पाटील यांनी संपर्क साधून  याबाबत क्रीडा विभागाची भूमिका स्पष्ट केली. क्रीडा साहित्य बाबत पालिकेशी या पूर्वीच पत्र व्यवहार झाला असून  पालिके...
Image
"काट्यांमध्ये व्यायाम शाळेचा हट्टहास ठेकदाराच्या बिलासाठी का?"   कालिचरण सूर्यवंशी तळोदा : व्यायाम करा की करू नका आम्ही बिल काढून मोकळे होऊ अश्या पद्धतीने ठेकदाराने चुकीचा ठिकाणी व्यायाम शाळा  खुल्या जागेत बसविल्या आहेत           तळोदा येथील तापी माँ नगरच्या  परिसरात  क्रीडा विभागाकडून बसवण्यात आलेले  ओपन जिमचे साहित्य काटेरी झाडाझुडपांच्या  बसवण्यात आल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे."काट्यांमध्ये व्यायाम करायचा का?' असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.          आदिवासी उपयोजनेअंतर्गत तळोदा नगर पालिकेच्या वतीच्या वतीने क्रीडा विभागामार्फत शहरातील विविध ठिकाणी ओपन जिम चे साहित्य बसवण्यात येत आहे. शहरात आतापर्यंत आठ ठिकाणी हे साहित्य बसवण्यात आले आहे. नागरिकांना सदृढ आरोग्यासाठी आरोग्यदायी सवयी लागव्यात व  सकाळी, संध्याकाळी चालता-फिरता नागरिकांना सहजपणे व्यायामासाठी  साहित्य उपलब्ध व्हावे यासाठी ओपन जिमचे प्रस्ताव नगर पालिकेने क्रीडा विभागाकडे २०१९-२०२० वर्षी पाठवले होते.     ...
Image
वन्य जीवप्राणी गणना वाल्हेरी परिसरात आढळले मोर व घुबड   ढगाळ वातावरण मूळ आला वत्यय कालीचरण सूर्यवंशी  तळोदा: कोरोना  मूळ दरवर्षी बुधपोर्णिमाला होणारी वन्यजीव गणना साठी प्राणी मित्र व विविध वन्यजीव प्रेमी यांना न बोलवता यंदा  . मात्र, प्रथमच ट्रॅप कॅमेऱ्याद्वारे दोन ते तीन दिवस प्राणी गणना होणार आहे वन्यजीवांच्या अधिवासाच्या परीक्षेत्रातील पाणवठ्याजवळ ट्रॅप कॅमेऱ्याच्या मदतीने दोन ते तीन दिवस वन्यजीव पशुंच्या हालचालीवर सूक्ष्म पद्धतीने निरीक्षण करण्यात येणार आहे. या नोंदींचा वन्यजीव गणतीसाठी उपयोग होणार आहे. दरवर्षीची पशुगणना व यंदाच्या ट्रॅप कॅमेऱ्यातील नोंदीचा अभ्यास करण्यात येणार आहे. यंदा प्रथमच वन्यजीव प्रेमी, हौशी पर्यटक या वन्यजीवांच्या गणनेला मुकले सहाय्यक वनसंरक्षक सोनाली गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्र पाल तळोदा निलेश रोडे, तसेच राजविहिरी वनक्षेत्र अधिकारी वासुदेव माळी, वनरक्षक सुनिल पाडवी, मारघ्या पाडवी, देवराम पाडवी, वनमजुर व कर्मचारी उपस्थित होते वाल्हेरी क्षेत्रात ट लावला होता ट्रॅप कमेरे -  वन्यजीव गणना साठी अधूनिक तंत्राचा वापर करत वाल्हेरी...
Image
  तळोद्यातील कालिका मातेचा प्रसिध्द यात्रोत्सव कोरोणामुळे सलग दुसऱ्या वर्षी रद्द कालीचरण सूर्यवंशी/तळोदा                  ऐतिहासिक परंपरा लाभलेली तळोदा येथिल कालिका मातेचा यात्रोत्सव कोरणा विषाणूचा प्रादुर्भावामुळे सलग दुसऱ्या वर्षी रद्द करण्यात आला आहे.शहराच्या खर्डी नदीकाठावर सुमारे 225 वर्षांपूर्वी बारगळ जहागीरदारनी सुरू केलेली  कालिकादेवीची यात्रोत्सवाच्या परंपरेत खंड पडला पडला आहे.               तळोदा शहराच्या खर्डी नदीकाठावर सुमारे 225 वर्षांपूर्वी बारगळ जहागीरदारनी कालिका मातेच्या मंदिराची उभारणी केली होती.तेव्हापासून तळोदा शहरात कालिका मातेचा  यात्रोत्सव  भरविण्यात येतो. त्या काळातील खान्देशातील ही वर्षातील शेवटची यात्रा म्हणून बघीतले जाते.                यावर्षी यात्रा रद्द झाल्याने गेल्या वर्षी प्रमाणे यावर्षी देखिल व्यावसायिक,व्यापारी यांना मोठया आर्थिक फटका बसणार आहे.तळोदा शहर महाराष्ट्र,मध्यप्रदेश व गुजरात सीमेवर असणारे शहर असून तलोद्या...

माजी आमदार उदयसिंग पाडवी यांची राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष पदी नेमणूक

Image
माजी आमदार उदयसिंग पाडवी यांची राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष पदी नेमणूक तळोदा : शहादा तळोदा मतदार संघाचे माजी आमदार यांची दखल पक्षाने घेत त्यांना राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष पदी नेमणूक केली असून तसे पत्र त्यांना प्रदेशाध्यक्ष जयवंत पाटील यांच्या हस्ते देण्यात आले,                     शहादा तळोदा मतदारसंघात भाजप कडून त्यांनी निवडणूक लढवत २०१४-१५  साली  विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार माजी मंत्री पदमकार वळवी व राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र गावित यांना पराभूत केले होते, मात्र  मागील पंच वार्षिक निवडणुकीत त्यांना तिकीट नाकारत भाजपने त्यांचे पुत्र राजेश पाडवी यांना तिकीट दिल होते,  त्यमुळे भाजपावर नाराजी व्यक्त करत त्यांनी सरळ  काँग्रेस मध्ये प्रवेश करत माजी मंत्री डॉ विजयकुमार गावित यांच्या विरुद्ध उमेदवारी केली होती, मात्र त्यात त्यांचा पराभव झाल्याने व काँग्रेस संघटन पातळीवर व काही नेत्यांशी न जुळल्याने त्यांनी राष्ट्रवादीत एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला होता, एकनाथराव खडसे यांचे नि...

अखेर कॉग्रेसला सोडचिट्ठी देत त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Image
अखेर कॉग्रेसला सोडचिट्ठी देत त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश तळोदा :काँग्रेस पासून अनेक दिवसापासून  नाराज असलेल्या काँग्रेसच्या त्या दोघ विद्यमान नगरसेवकांचे कुटुंबीय व मित्र परिवार  यांचा आज राष्ट्रवादीत मुंबई इथं प्रवेश झाला असून या वेळी  कोंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष व काँग्रेसच्या विद्यमान नगरसेविका अनिता   संदिप परदेशी यांचे पती संदीप परदेशी , तसेच काँग्रेसचे शहादा तळोदा  विधानसभा  समन्वय योगेश  मराठे, भरत चौधरी, विद्यमान नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय यांचे काका केशर क्षत्रिय, व लहान बंधू  विकास क्षत्रिय यांच्या सह काही निवडक कार्यकर्ते सह आज   मुंबई इथे  माजी आमदार उदयसिंग पाडवी यांच्या नेतृत्वाखाली  राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेश अध्यक्ष जयवंत पाटील, महाराष्ट्र युवक प्रदेश अध्यक्ष महबूब शेख व एकनाथराव खडसे  यांचा प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश घेतला आहे,           दरम्यान राष्ट्रवादी कोंग्रेसच्या प्रवेश शहर काँग्रेस साठी मोठा धक्का समजला जात आहे, सदर प्रवेशा प्रसंग...