
जिल्हा क्रीडा अधिकारी यांची तलोद्यात भेट खुल्या व्यायाम शाळांची केली पाहणी तळोदा : प्रतिनिधी काटेरी झुडपांमध्ये बसविले खुल्याजिमची पाहणी आज जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी केली.जिमच्या पाहणी करून स्थानिक रहिवाशांच्या सोयीनुसार जिमचे साहित्य बसविण्याच्या सूचना त्यांनी संबंधित ठेकेदाराला दिल्या. तळोदा येथील तापी माँ परिसरात तळोदा नगरपालिकेच्या क्रिडा विभागाच्या माध्यमातून सन २०१९-२०२० मध्ये ओपन जीम मंजूर झाली होती.ही जीमकाटेरी झाडाझुडपांमध्ये व जमीन ओबडधोबड असणाऱ्या ठिकाणी बसविण्यात आली होती.त्यामुळे स्थानिक नागरीकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर जिल्हा क्रिडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी आज तळोदा येथे भेट देत शहरांतील बसविलेल्या ओपन जिमची पाहणी केली.यावेळी त्यांच्या सोबत नगराध्यक्ष अजय परदेशी,शिवसेना शहर प्रमुख जितेंद्र दुबे,जिल्हा क्रिडा कार्यालयाचे मुकेश बारी,महेंद्र काटे,पालिकेचे राजेंद्र माळी आदींसह स्थानिक नागरीक उपस्थि...