Posts

ठेकेदाराला सहायक जिल्हाधिकारी यांचा दणका काळ्या यादीत टाकण्याचे लेखी पत्र

Image
ठेकेदाराला  काळ्या यादीत टाका,,,,,,                           उपजिल्हाधिकारी          अविशांत पांडा यांचे धुळे सार्वजनिक बांधकाम विभागास पत्र                   प्रस्तावित राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753   वाका चार रस्ता ते तळोदा तसेच तळोदा ते अक्कलकुवा रसत्याचे काम अद्यापही  सुरु न झाल्याने सहाय्यक जिल्हाधिकारी अविशांत पांडा यांनी सार्वजानिक बांधकाम धुळे विभागाचे  अभियंता यांना पत्र देऊन संबंधित कंटात्रदार यांना काळया यादीत टाकण्याचे आदेश पत्रा द्वारे निर्गमित केले आहेत.... राष्ट्रिय महामार्ग 753 ब दिनांक 18 डिसेंबर 2020 च्या बैठकीत 21 डिसेंबर पासून रस्त्याचे काम सुरू करण्यात येईल येईल असे संबंधित विभागाच्या प्रतिनिधीने सांगितले होते.  रस्त्याचे दुरुस्तीबाबत कोणतेही काम सुरू झाल्याचे दिसून येत नाही यापूर्वीही  या विभागाला संदर्भीय पत्रामुळे सदर रस्त्याचे दुरुस्तीबाबत काम ता...

नंदुरबार जिल्ह्यासाठी कोरोना लस पोहचली

Image
जिल्ह्यासाठी कोरोना लसीचे डोस प्राप्त  कोरोना लसीचे 12410 डोस प्राप्त झाले असून नाशिक येथील आरोग्य विभाग उपसंचालक कार्यालयातील शीतगृहातून विशेष वाहनाने हे डोस जिल्हा परिषद परिसरातील जिल्हा लस भांडार गृह इमारतीत आणण्यात आले. जिल्ह्यात 16 जानेवारीपासून आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणास सुरूवात होणार आहे. तोपर्यंत हे लसीचे डोस भांडारातील शीत पेटीत 2 ते 8 अंश तापमानात ठेवण्यात येणार आहेत व या ठिकाणाहून तालुका स्तरावर लसींचे वितरण करण्यात येणार आहे. जिल्ह्यात लस ठेवण्यासाठी 7 शितपेट्या असून आणखी 24 शीतपेट्या लवकरच प्राप्त होणार आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके यांनी दिली. साभार जी,मा, का, नंदुरबार 00000

तलोद्यात असेंबल सायलेन्सर आवाजाचा कहर नागरीक त्रस्त,,,,,

Image
तलोद्यात कर्कश आवाजने नागरिक त्रस्त  वाहतूक शाखेचे दुर्लक्ष  तळोदा शहरात रस्त्यांवर भरधाव वेगात आणि कर्कश ह‌ॉर्न्स वाजवीत जाणारी वाहने सर्रास दिसू लागली असताना आता त्यात बुलेट च असेंबल सायलेन्सर बसवून फटाके फोडण्याचा  आवाज  त्यात कहर म्हणजे विना सायलेन्सर च नवीन फॅड आल  यांचा आवाज आता नकोसा झाला असून जिल्हात अश्या बुलेट वर कार्यवाही होत असताना  मात्र  तळोदा पोलीस वाहतूक शाखेच्या कानांपर्यंत हा आवाज पुरेसा पोहोचत नसल्याचे चित्र आहे.   शहरातील अनेक गर्दीच्या  ठिकाणी रस्त्यांवरुन भरधाव वेगाने आणि कर्णकर्कश हॉर्न वाजवित दुचाकी पळविल्या जात असल्याचे चित्र आहे. तलोद्यात वारंवार अशी वाहने नजरेत पडत असून बाजारात पायी  चालत असणाऱ्या नागरिकांना  पाठीमागून अचानकपणे फटाके फुटण्याचा अथवा बंदूक चा गोळी सारखा मोठ्ठा आवाज एकूण जीव भांड्यात पडतो   वयस्क व्यक्तींसह अनेकांना त्याचा त्रास होत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. मात्र, अशा कर्कश हॉर्न असलेल्या वाहनांवर आणि वाहनचालकांवर  कारवाया होत नाहीत. . वाहनचालकांवर कारवाई करण्याची जबाबदारी ज...

तळोदा पालिकेत स्वीकृत नगरसेवक पदासाठी इच्छुकांची फिल्डिंग

Image
स्वीकृत नगरसेवकां पदासाठी इच्छुकांचा जुगाड आता वरिष्ठांचा भूमिकेकडे लक्ष कालीचरण सूर्यवंशी/तळोदा                तळोदा पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीला  आता  तीन वर्षे पूर्ण होऊन चौथे वर्ष आरंभ झाले असून भाजप गट मधील स्वीकृत नगरसेवक पदा साठी आता इच्छुकांनी पक्ष श्रेष्ठी कडे धाव घेतली असून यात प्रभाग  आठ मधील पराभूत उमेदवार  आनंद सोनार तर प्रभाग चार मधील उमेदवार म्हणून इच्छुक असतांना तिकीट न मिळालेले जगदीश परदेशी व प्रभाग दोन मधील पराभूत उमेदवार डॉ, स्वप्नील बैसाणे यांनी जिल्हाअध्यक्ष विजय चौधरी, तसेच  आमदार राजेश पाडवी, खासदार डॉ हिना गावित यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली असल्याचे खात्रीशीर वृत्त असून आता या बाबतीत काय निर्णय होतो या कडे लक्ष लागून आहे , तळोदा नगर पालिकेचा सार्वत्रिक निवडणुकीत तीन वर्षे पूर्वी भाजपचे थेट नगराध्यक्ष निवडणूक पॅनल प्रमुख तत्कालीन माजी आमदार उदयसिंग पाडवी यांच्या नेतृत्वाखाली लढण्यात आली होती व त्या वेळी भाजपच्या  प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थिती मध्ये  सर्व पराभूत उमेदवारांना समान...

शारिरीक शिक्षक संच मान्यता इतर प्रश्न मार्गी लावणार

Image
शारीरिक शिक्षण संचमान्यता, निवडश्रेणीसह प्रश्न मार्गी लावणार - राज्यमंत्री बच्चू कडू      शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी विविध शिक्षक संघटना समवेत शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीचे आयोजन नुकतेच बालभवन, मुंबई येथे केले होते. या बैठकीत शिक्षण विभागाच्या संबंधी प्रलंबित प्रश्न तथा विविध संघटना कडून प्राप्त निवेदना संदर्भात विचारविमर्श अन कार्यवाही संबंधी शिक्षण विभागाच्या प्रमुख अधिकारी यांचे सोबत बैठकीत विविध प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणूकीचे निर्देश संबंधित अधिकारी यांना तातडीने देण्यात आले.      शिक्षक संघटनेचे निमंत्रीत सदस्य शारीरिक शिक्षण महासंघाचे राज्याध्यक्ष राजेंद्र कोतकर, महामंडळाचे सहसचिव शिवदत्त ढवळे व मुंबई महानगरपालिका युनिटचे डाॅ जितेंद्र लिंबकर यांनी विविध अडचणी बाबत संघटनेच्या वतीने  बाजू मांडली. संचमान्यतेतील त्रुटी दूर करून संचमान्यता निकष लागू करावेत, संचमान्यतेत शारीरिक शिक्षकाचे पहिले पद हे सहावे व दुसरे पद बारावे असावे, वेळापत्रकात शिक्षकाचा कार्यभार हा सहावी ते दहावी/बारावी या वर्गांचा असावा, निवडश्रेणी साठी एम.पी.एडची अट र...

शहादा येथील आर आर पटेल सौ दुर्गाताई तांबे महाराष्ट्र भुषण प्रेरणा पुरस्काराने सन्मानित

Image
  शहादा येथील आर आर पटेल सौ दुर्गाताई तांबे महाराष्ट्र भुषण प्रेरणा पुरस्काराने सन्मानित तळोदा : निसर्ग मित्र समिती तर्फे राज्यस्तरीय पर्यावरण परिषद दि 20 रोजी मालेगाव येथील आय एम ए सभागृह येथे संपन्न झाली असून शहादा येथील आर आर पटेल यांना संगमनेर नगराध्यक्षा सौ दुर्गाताई तांबे महाराष्ट्र भुषण प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.              वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्ग मित्र समिती धुळे व बागलाण तालुक्यातील आदर्श गाव टेभे ग्रामपंचायत जि. नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण संतुलनासाठी वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन करून पर्यावरणाचे राष्ट्रीय उपक्रमाला प्रोत्साहन देणे, वृक्षारोपण मोहीम, पाणी आडवा पाणी जिरवा, जलसंधारण तसेच एक गाव एक होळी प्रदूषण मुक्त दिवाळी जलपरिषद आदी अभियान यशस्वीपणे राबविणारे कार्यकर्ते व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पर्यावरणवाद्यांना प्रेरणा म्हणून महाराष्ट्र भूषण प्रेरणा जीवन गौरव पुरस्कार देण्यात येतो.          याप्रसंगी  टेभे गावचे सरपंच रवींद्र अहिरे,निसर्ग मित्र समिती चे संस्थापक अध्य...

शहादा तालुक्यात दुर्गम भागात आमदारांची भेट

Image
शहादा-तालुक्यासह जिल्ह्यात बेमोसमी पाऊस सुरू असतांनाही रिमझिम पावसात शहादा-तळोदा मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी यांनी अतिडोंगराळ भागातील पहाडपट्ट्यात असलेल्या नागझिरी, उपलापाणि व कोटबांधणी या आदिवासी पाडयांना भेट देऊन तेथील जनजीवनाच्या समस्या जाणून घेतल्या. या गावांना जाताना अनेक ठिकाणी रस्ते नसल्याने बऱ्याच ठिकाणी त्यांना पदयात्रा करावी लागली. आ. पाडवी यांच्या या अचा नक भेटीने भारावून जात काँग्रेस पक्षाचे अनेक वर्षांपासूनचे कार्यकर्ते माजी पंचायत समिती सदस्य तथा २० वर्ष सरपंच असलेले शंकर पावरा व उपलापाणीचे कारभारी नोबल्या वळवी व त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. यावेळी ग्रामस्थांनी भावना व्यक्त करीत सांगितले की, आमच्या पाड्यांमध्ये वर्षानुवर्षे एकही खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य भेटीला आले नाहीत, त्यामुळे आमच्या समस्या कोणीही दूर करू शकले नाहीत आपण पहिले आमदार आहात या पहाड पट्ट्यात पडत्या पावसात पायी चालत आमच्या भेटीला येऊन आमच्या समस्या जाणुन घेत आणि त्या सोडविण्याचा संकल्प सोडला. आ. राजेश पाडवी यांनी पहाड पट्ट्यातील समस्या ज...