तळोदा पालिकेत स्वीकृत नगरसेवक पदासाठी इच्छुकांची फिल्डिंग
स्वीकृत नगरसेवकां पदासाठी इच्छुकांचा जुगाड आता वरिष्ठांचा भूमिकेकडे लक्ष
कालीचरण सूर्यवंशी/तळोदा
तळोदा पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीला आता तीन वर्षे पूर्ण होऊन चौथे वर्ष आरंभ झाले असून भाजप गट मधील स्वीकृत नगरसेवक पदा साठी आता इच्छुकांनी पक्ष श्रेष्ठी कडे धाव घेतली असून यात प्रभाग आठ मधील पराभूत उमेदवार आनंद सोनार तर प्रभाग चार मधील उमेदवार म्हणून इच्छुक असतांना तिकीट न मिळालेले जगदीश परदेशी व प्रभाग दोन मधील पराभूत उमेदवार डॉ, स्वप्नील बैसाणे यांनी जिल्हाअध्यक्ष विजय चौधरी, तसेच आमदार राजेश पाडवी, खासदार डॉ हिना गावित यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली असल्याचे खात्रीशीर वृत्त असून आता या बाबतीत काय निर्णय होतो या कडे लक्ष लागून आहे ,
तळोदा नगर पालिकेचा सार्वत्रिक निवडणुकीत तीन वर्षे पूर्वी भाजपचे थेट नगराध्यक्ष निवडणूक पॅनल प्रमुख तत्कालीन माजी आमदार उदयसिंग पाडवी यांच्या नेतृत्वाखाली लढण्यात आली होती व त्या वेळी भाजपच्या प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थिती मध्ये सर्व पराभूत उमेदवारांना समान संधी उपलब्द्ध करून देण्यात येईल असा निर्णय झाला होता, व सर्वानुमते वरिष्ठ नगरसेवक या नात्याने हेमलाल मगरे यांना मान देण्यात आला होता ,
मात्र नंतरच्या काळात इच्छुक म्हणून कोणी संघटित पणे पुढे येऊन तशी मागणी न केल्याने तसेच बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या यात माजी आमदार उदयसिंग पाडवी यांनी एन विधानसभा निवडणुकी पूर्वी तिकीट कापल्या गेल्याने त्यांनी सरळ काँग्रेस मध्ये प्रवेश केला तर आज ते राष्ट्रवादी पक्षात आहेत त्यामुळे या नाजूक विषयावर कोणीही पुढाकार घेण्यास तयार नाही ,
मात्र निदान शेवटच्या दोन वर्षे तरी आम्हा पराभूत उमेदवारांना पक्ष कडून संधी मिळावी या करिता आता तिन्ही पराभूत उमेदवार पक्षश्रेष्ठीं कडे दाद मागत आहेत
यात आनंद सोनार प्रभाग क्र.8 ओबीसी च्या जागेवरून लढले होते तर जगदीश परदेशी पालिकेच्या मागील सार्वत्रिक निडणुकीत ते पराभूत झाले होते, यंदा प्रभाग चार मधून इच्छुक असतांना पेनल प्रमुख उदयसिंग पाडवी यांनी तिकिट नाकारत सत्ता बसल्यास स्वीकृत नगरसेवक करण्यासाठी शब्द दिला होता
तर डॉ स्वप्नील बैसाने एस, सी राखीव जागेवर लढले होते मात्र पराभूत झाले होते,
चौकट -
दरम्यान,नवीन वर्षाच्या सुरुवातीला या बाबतीत गुप्त बेठका इच्छुकांचा व काही नगरसेवकांचा होत असून या बाबतीत इतरही काही नावे पुढे येण्याची चर्चा आहे, मात्र मागणी जोर धरू लागल्याने जिल्हा अध्यक्ष विजय चोधरी व विद्यमान आमदार राजेश पाडवी लवकरच स्थानिक पातळीवर नगरसेवकांची व पदाधिकारी यांची बेठक घेऊन तोडगा काढण्यासाठी काय करतात या कडे लक्ष लागून आहे,
Comments
Post a Comment