तलोद्यात असेंबल सायलेन्सर आवाजाचा कहर नागरीक त्रस्त,,,,,

तलोद्यात कर्कश आवाजने नागरिक त्रस्त  वाहतूक शाखेचे दुर्लक्ष


 तळोदा शहरात रस्त्यांवर भरधाव वेगात आणि कर्कश ह‌ॉर्न्स वाजवीत जाणारी वाहने सर्रास दिसू लागली असताना आता त्यात बुलेट च असेंबल सायलेन्सर बसवून फटाके फोडण्याचा  आवाज  त्यात कहर म्हणजे विना सायलेन्सर च नवीन फॅड आल  यांचा आवाज आता नकोसा झाला असून जिल्हात अश्या बुलेट वर कार्यवाही होत असताना  मात्र  तळोदा पोलीस वाहतूक शाखेच्या कानांपर्यंत हा आवाज पुरेसा पोहोचत नसल्याचे चित्र आहे.
 

शहरातील अनेक गर्दीच्या  ठिकाणी रस्त्यांवरुन भरधाव वेगाने आणि कर्णकर्कश हॉर्न वाजवित दुचाकी पळविल्या जात असल्याचे चित्र आहे. तलोद्यात वारंवार अशी वाहने नजरेत पडत असून बाजारात पायी  चालत असणाऱ्या नागरिकांना  पाठीमागून अचानकपणे फटाके फुटण्याचा अथवा बंदूक चा गोळी सारखा मोठ्ठा आवाज एकूण जीव भांड्यात पडतो   वयस्क व्यक्तींसह अनेकांना त्याचा त्रास होत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. मात्र, अशा कर्कश हॉर्न असलेल्या वाहनांवर आणि वाहनचालकांवर  कारवाया होत नाहीत. .


वाहनचालकांवर कारवाई करण्याची जबाबदारी जशी वाहतूक पोलिसांची आहे त्याचप्रमाणे परिवहन विभागालाही यासाठी जबाबदार  आहे. 
ध्वन‌िप्रदूषण करणाऱ्या वाहनांसदर्भात राज्य सरकारने  काही वर्षापूर्वी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. त्या आदेशांनुसार इतर विभागांसह परिवहन विभागाचीही जबाबदारी असल्याचे या आदेशांमध्ये म्हटले आहे. मात्र, वाहनांच्या हॉर्न्समुळे होणारे ध्वनिप्रदूषण थांबविण्यासाठी तळोदा पोलीस वाहतूक शाखा पुरेसे लक्ष दिले नसल्याचे दिसून येत आहे,

कर्कश हॉर्नविरुद्ध   संबधित विभाग आणि वाहतूक पोलिसांनी नेमकी काय कारवाई केली   हा शोधांचा विषय आहे,

 दररोज सामान्य  नागरिकांचा  शेजारून कर्कश हॉर्न वाजवीत भरधाव वेगात वाहने जात असताना कारवाई करण्याचे अधिकार ज्यांच्याकडे आहेत त्यांच्या नजरेस ती कशी पडत नाहीत, असा प्रश्न निर्माण झाला आहे.


 कर्कश आवाज करणाऱ्या शहरात बुलेटचं फॅड दिसतं.  गोळी झाडल्याचा किंवा फटाका वाजल्याचा आवाज काढण्याचं बुलेटवाल्यांचा कहर झाला असून. पोलिसांनी त्यावर कारवाई करुन  जरब बसविणे आवश्यक आहे,

 कारण बेदरकारपणे बुलेट चालवून कर्कश हॉर्न वाजवत रपेट मारणाऱ्यांची संख्या वाढतच आहे विशेषतः शाळा महाविद्यालय सुटण्याचा वेळी व भरण्याचा वेळी तर जाणीवपूर्वक  संध्याकाळी व रात्री उशिरा शहादा रस्त्यावर  तीन ते चार सीट बसून  परत परत  गाडी वळवून  याच रस्त्यावर आणली जाते पायी फिरायला जाणाऱ्या कुटुंबासह जेष्ठ नागरिकांना याचा भयंकर त्रास होतो, या बाबत वाहन चालक अतिशय उद्दामपणे उत्तर देतात,

चॉकट -
वेग मर्यादेची ऐशी तेशी करत शाळा , महाविद्यालय, प्रमुख बाजारपेठ , कॉलेज रस्ता,
भाजी बाजार , बस स्थानक रस्ता, शहादा रस्ता, कॉलनी, 
 मधील रस्ते, अश्या भागात वेग मर्यादा बद्दल मार्गदर्शक सूचना असताना त्या कडे दुर्लक्ष केले जाते, तसा एकही फलक तळोदा शहर हद्दीत दिसून येत नाही, त्यामुळे आता असे फलक कोण लावेल हा शोधाचा विषय आहे,

 कालीचरण सूर्यवंशी

Comments

Popular posts from this blog

शहादा मतदार संघात 69.01 टक्के मतदान

शहादा-तळोदा मतदार संघाचा निवडणूक अंदाज लावणे अवघड निकालाची उत्सुकता शिगेला...!

शहर अध्यक्ष म्हणतात भाजप मध्ये आता सर्व दुकान एकत्रित.....,पण भाजप मध्ये असलेल्या चार दुकानांचे काय ?