शारिरीक शिक्षक संच मान्यता इतर प्रश्न मार्गी लावणार

शारीरिक शिक्षण संचमान्यता, निवडश्रेणीसह प्रश्न मार्गी लावणार - राज्यमंत्री बच्चू कडू



     शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी विविध शिक्षक संघटना समवेत शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीचे आयोजन नुकतेच बालभवन, मुंबई येथे केले होते. या बैठकीत शिक्षण विभागाच्या संबंधी प्रलंबित प्रश्न तथा विविध संघटना कडून प्राप्त निवेदना संदर्भात विचारविमर्श अन कार्यवाही संबंधी शिक्षण विभागाच्या प्रमुख अधिकारी यांचे सोबत बैठकीत विविध प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणूकीचे निर्देश संबंधित अधिकारी यांना तातडीने देण्यात आले. 
    शिक्षक संघटनेचे निमंत्रीत सदस्य शारीरिक शिक्षण महासंघाचे राज्याध्यक्ष राजेंद्र कोतकर, महामंडळाचे सहसचिव शिवदत्त ढवळे व मुंबई महानगरपालिका युनिटचे डाॅ जितेंद्र लिंबकर यांनी विविध अडचणी बाबत संघटनेच्या वतीने  बाजू मांडली. संचमान्यतेतील त्रुटी दूर करून संचमान्यता निकष लागू करावेत, संचमान्यतेत शारीरिक शिक्षकाचे पहिले पद हे सहावे व दुसरे पद बारावे असावे, वेळापत्रकात शिक्षकाचा कार्यभार हा सहावी ते दहावी/बारावी या वर्गांचा असावा, निवडश्रेणी साठी एम.पी.एडची अट रद्द करावी, राजीव गांधी अपघात विम्यात खेळाडू अपघात विम्याचा समावेश करावा, वरीष्ठ व निवडश्रेणीसाठी क्रीडा प्रशिक्षण धरण्यात यावीत, आश्वासीत प्रगती योजना शिक्षकांना लागू करावी, नोकरभरतीत पवित्र पोर्टलमधील सर्व त्रुटी दूर करून वंचित बीपीएड-एमपीएड धारकांना न्याय देऊन भरती करण्यात यावी, न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे अंशकालीन शिक्षकांना कायम शिक्षक म्हणून घ्यावे, या व इतर विषय पत्रिकेतील  मागण्यांसदर्भात बैठकीत बाजू मांडली असता, राज्यमंत्र्यांनी या संदर्भात संबंधित अधिकारी यांना तातडीने निर्देश दिले.
      शिक्षणाविषयक प्रलंबित प्रश्ना संदर्भात विविध समितीमार्फत व निमंत्रित पदाधिकारी यांचेकडून प्राप्त सूचनाधारे, अहवाल शिक्षण मंत्री महोदयांना सादर करून बैठक घेण्यात येईल. अर्थ विभागाशी निगडीत तसेच धोरणात्मक निर्णय मा.उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्री यांचेशी बैठक घेऊन सोडवणूक केली जाईल. तसेच शालार्थ आय-डी व संचमान्यता दुरुस्ती संबंधी तात्काळ संबंधित अधिकार क्षेत्रात बदल करून शाळांची ससेहोलपट थांबविण्यात येईल. तसेच 15 जानेवारी नंतर प्रत्येक विभागीय उपसंचालक कार्यालयात संघटना प्रतिनिधी सोबत बैठका घेऊन तात्काळ प्रश्न निकाली काढण्यात येतील असे नामदार बच्चू कडू यांनी संघटनेच्या पदाधिका-यांना आश्वासीत केले. 
    या बैठकीस आमदार कपिल पाटील, डाॅ. नितीन चवाळे, धन्यकुमार हराळ, दिनेश भालेराव, घनश्याम सानप, संगीता शिंदे, सुभाष मोरे, डाॅ संजय शिंदे, शेखर भोयर, आनंद पवार, राजेश जाधव, राजेंद्र पवार, विलास घोगरे, रणजित देशमुख, महेश ठाकरे, सचिन ढवळे, दत्ता काळे यांच्यासह विविध राज्य संघटनांचे प्रतिनिधी तसेच शिक्षण विभाग, बालभारती, समग्र शिक्षा अभियान, शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परीषदेचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते अशी माहिती शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचे जिल्हा अध्यक्ष सुनील सूर्यवंशी,  राज्य युवा  कार्यकारीणी अध्यक्ष मयूर ठाकरे, पंकज पाठक यांनी दिली

Comments

Popular posts from this blog

शहादा मतदार संघात 69.01 टक्के मतदान

शहादा-तळोदा मतदार संघाचा निवडणूक अंदाज लावणे अवघड निकालाची उत्सुकता शिगेला...!

शहर अध्यक्ष म्हणतात भाजप मध्ये आता सर्व दुकान एकत्रित.....,पण भाजप मध्ये असलेल्या चार दुकानांचे काय ?